Ahilyabai Holkar Information in Marathi: अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे, ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही, त्यामुळेच भारत सरकारने त्यांचा सन्मानही केला, त्यांच्या नावाने टपाल तिकीटही काढण्यात आले आणि आज त्यांनी अहिल्याबाई यांच्या नावाने पुरस्कारही दिला जाते.

अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठी – Ahilyabai Holkar Information in Marathi

Table of Contents

अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठी-Ahilyabai Holkar Information in Marathi
अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठी-Ahilyabai Holkar Information in Marathi

महाराणी अहिल्याबाई या प्रसिद्ध सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म 1725 मध्ये झाला आणि 13 ऑगस्ट 1795 रोजी मृत्यू झाला; त्या दिवशी भाद्रपद कृष्ण चतुर्दशी होती. अहिल्याबाई कोणत्याही मोठ्या जड राज्याच्या राणी नव्हत्या. त्यांचा कार्यक्षेत्र तुलनेने मर्यादित होता. तरीही त्यांनी जे केले ते थक्क करणारे आहे.

महाराणी अहिल्याबाई होळकर या भारतातील माळवा राज्याच्या मराठा होळकर राणी होत्या. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर, महाराष्ट्रातील चोंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे हे त्यांच्या गावचे पाटील होते. त्या काळी स्त्रिया शाळेत जात नव्हत्या, पण अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवलं. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर 1754 च्या कुंभेर युद्धात शहीद झाले. 12 वर्षांनंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले. एका वर्षानंतर, तिला माळवा राज्याची सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.

तिने नेहमीच मुस्लिम आक्रमकांपासून आपले साम्राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला. उलट युद्धाच्या वेळी ती स्वतः तिच्या सैन्यात सामील होऊन लढत असे. त्यांनी तुकोजीराव होळकरांना आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून नेमले. राणी अहिल्याबाईंनीही आपल्या राज्यात महेश्वर आणि इंदूरमध्ये अनेक मंदिरे बांधली होती.

यासोबतच त्यांनी लोकांना राहण्यासाठी अनेक धर्मशाळाही बांधल्या, गुजरातमधील द्वारका, काशी विश्वनाथ, वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपद मंदिर आणि बैजनाथ या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या आसपास त्यांनी या सर्व धर्मशाळा बांधल्या. मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पाहून त्यांनी सोमनाथमध्ये शिवमंदिर बांधले. ज्याची हिंदू आजही पूजा करतात.

इंदूर राज्याचे संस्थापक महाराज मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी तिचा विवाह झाला. अहिल्याबाईंना 1745 मध्ये एक मुलगा आणि तीन वर्षांनी मुलगी झाली. मुलाचे नाव मालेराव आणि मुलीचे नाव मुक्ताबाई. तिने कुशलतेने पतीचा अभिमान जागृत केला. काही दिवसातच खंडेराव आपल्या थोर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चांगला शिपाई बनला. मल्हाररावांनाही पाहून त्यांचेही समाधान झाले. ते सुनेला व सून अहिल्याबाईंनाही राज्यकारभाराचे शिक्षण देत असत.

तिची हुशारी आणि हुशारी पाहून तो खूप खूष झाला. मल्हाररावांच्या हयातीत त्यांचा मुलगा खंडेराव 1754 मध्ये मरण पावला. त्यामुळे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर राणी अहिल्याबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेतली. राणी अहिल्याबाईंनी 1754 मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत अत्यंत कुशलतेने राज्य केले. त्यांची गणना आदर्श राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. तो त्याच्या औदार्य आणि उदारतेसाठी ओळखला जातो. त्यांना एकुलता एक मुलगा होता, मलाराव जो 1766 मध्ये मरण पावला. 1767 मध्ये अहिल्याबाईंनी तुकोजी होळकरांना सेनापती म्हणून नियुक्त केले.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म व बालपण

इ.स. 1725 सालचा तो दिवस प्रभातकाळच्या सूर्यकिरणांनी सुवर्णकांतीने झळाळत होता. त्या सोनेरी किरणांनी संपूर्ण वातावरणच सुवर्णमय होऊन गेले होते. त्यातच डोगरदऱ्यांमध्ये वसलेल्या चौंडी गावचे दृश्य फारच विलोभनीय वाटत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सवाचे तेज झळकत होते. सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. सगळीकडे अद्‌भुतरम्य दृश्य पहावयास मिळत होते. नेहमीपेक्षा त्या दिवसाचे महत्त्व अधिक होते; कारण तो दिवस उजेडला त्याच दिवशी भारतामध्ये पुढे घडणाऱ्या वैभवशाली इतिहासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दिवसाचे सोनेरी किरण म्हणजे देशाच्या वैभवशाली इतिहासाचे सोनेरी पानच होते. तो दिवस म्हणजे भविष्यकालीन सुप्रसिद्ध ऐतिहासिक घटनांची नांदी होता. कारण त्या दिवशी एका महान ‘कर्मयोगिनी’ने या भूतलावर जन्म घेतला होता.

मराठवाडा विभागातील चौंडी हे एक गाव. गाव तसं छोटंसंच; पण नाना प्रकारच्या वनस्पतींनी आणि लहान मोठ्या टेकड्यांनी नटलेले रमणीय आणि मनमोहक. जणू काही निसर्गाने आपल्या सहस्र बाहूंनी त्या गावाला सौंदर्य प्रदान केले होते. याच गावामध्ये सद्भावी आणि सात्त्विक आचरणशील मनोवृतीचे आदर्श गृहस्थ श्री. मानकोजी शिंदे आपल्या पत्नी सौ. सुशीलाबाई शिंदे यांच्यासहित राहत होते. त्यावेळेस चौंडी गावची पाटीलकी त्यांच्याकडेच होती. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. गावचा कारभार ते उत्तमरीतीने हाताळत असत. मानकोजी शिंदे हे स्वत: धार्मिक वृतीचे गृहस्थ होते. सुशीलाबाई शिंदे या धार्मिक, विनयशील, ज्ञानी त्याचबरोबर आदर्श कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. पूजाअर्चा करणे, पोथ्या वाचणे, कीर्तन तसेच भागवत सप्ताहात सहभागी होणे, गोरगरिबांची दुःखे दूर करून त्यांना मदत करणे, असा त्यांचा नित्यक्रम होता.

इस. 1725 साली अशा या आदर्श गृहस्थाश्रमींच्या उदरी एक कन्यारत्न जन्मास आले. या बाळाचे नाव अहिल्या ठेवण्यात आले. बाल अहिल्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन लागली होती. दिवसामागून दिवस जात होते. बाल अहिल्येने शिशु अवस्थेतून बाल्यावस्थेत पदार्पण केले होते.

मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असूनदेखील ते विद्वान आणि दूरदर्शी गृहस्थ होते. त्या काळामध्ये म्हणजे इ. सनाच्या 18व्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यातच चौंडी हे तर छोटंसं खेडेगाव. तेथे शाळेचीदेखील व्यवस्था नव्हती. मुलाच्या शिक्षणाचा फार बिकट प्रश्न होता. त्या काळच्या समाजामध्ये शिक्षणाविषयी प्रेम, आस्था व जागृती झालेली नव्हती. त्यातच मुलीला शिक्षण देणे म्हणजे त्या समाजाला अमान्य बाब होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये मानकोजी शिंदे यांनी बाल अहिल्येला शिक्षण देण्याचे ठरविले. अहिल्येच्या शिक्षणाची त्यांनी घरीच व्यवस्था केली. तिच्या अभ्यासात ते नियमित लक्ष देत होते.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात. मुलांच्या जीवनाला आकार देण्याची, घडविण्याची सर्वांत मोठी जबाबदारी ही त्याच्या मातापित्यांवर असते. मुले राष्ट्राची संपत्ती आहेत. उद्या राष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. भावी पिढीचा आधारस्तंभ तेच आहेत. त्यांच्यावरच संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांना जगद्निर्माता परमेश्वराने आपल्याला दान स्वरूपात प्रदान केलेले आहे. म्हणून सत्कार्यासाठीच त्यांचा उपयोग करून घेण्यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे. म्हणून बालकांचे जीवन एक आदर्श जीवन करणे हे आपणा सर्वांचे परमकर्तव्य आहे; परंतु मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फारच वेगळा आहे.

आपण त्यांना आपल्या सुखाचे भांडार आणि वृद्धापकाळातील आधारस्तंभ समजून त्यांचा सांभाळ करतो. त्यांना सुखीसमाधानी ठेवून त्यांच्या उपजीविकेच्या योग्य त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या लायक बनवण्यातच आपल्या संपूर्ण कर्तव्याची इती समजतो. आपण त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना जागृत करून वाव देण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. परिणामी मुलांचा विकास खुंटतो आणि राष्ट्राची त्याचबरोबर संपूर्ण मानवजातीची हानी होते.

वास्तविक पाहता बालवयातच मनुष्याचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित झालेले असते. बालवयात त्याच्यावर होणारे संस्कार हे टिकणारे असतात. म्हणून बालवयात त्याच्यावर सुसंस्कार करण्याचे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. याच वयामध्ये त्याच्यातील सुप्तक्षमता जागृत होतात. ज्ञानग्रहण करण्याची क्षमता याच वयामध्ये वाढीस लागते. मानवाच्या आदर्श जीवनाची बीजे याच वयात रोवली जातात. ज्यांच्यातील सुप्त शक्ती प्रकट करण्यास वाव दिला जातो, तीच मुले यशस्वी होतात. कारण अनेक मुले जन्मास येतात; परंतु उच्चावस्थेत फारच मोजकी मुले गेलेली आपण पाहतो.

हे सर्व मानकोजी शिंदे जाणून होते. कारण अहिल्यामातेचे जीवन घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बालवयात मुले आचरणशील असतात. मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे हे धार्मिक मनोवृत्तीचे असल्यामुळे घरामध्ये धार्मिक कार्य होत होते. पूजाअर्चा, कीर्तन, प्रवचन, पोथीपठण आदी धार्मिक कार्य सुरू असत. त्याचबरोबर दीनदुबळ्यांच्या प्रति प्रेमभाव व गोरगरिबांना मदत करीत होते. हे सर्व सत्कार्य करत असताना बाल अहिल्या आपल्या मातापित्यांबरोबर असत व त्याही कार्यक्रमात सहभागी होत. जे पाहिले ते आत्मसात करून आचरणात ठसवत होत्या. बालवयातच त्यांच्यावर सात्त्विक आणि धार्मिक सुसंस्कार घडवले गेले होते. म्हणूनच पुढे त्यांचे जीवन ‘यावश्चंद्र दिवाकरौ’ आदर्श बनले.

होळकरशाहीची स्थापना

मल्हारराव होळकर हे होळकरशाहीचे प्रमुख संस्थापक होत. त्यांचा जन्म इ.स. 1693 साली रामनवमीच्या शुभमुहूर्तावर झाला. त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी होळकर, तर आईचे नाव जिवाई होते. खंडोजी होळकर हे गावपाटलाचे मदतनीस म्हणून काम पाहत होते. होळकर हे पुण्याजवळील होळ या गावचे राहणारे, म्हणून त्यांना होळकर नाव पडले.

मल्हाररावांच्या जन्मानंतर केवळ तीन वर्षांतच त्यांचे वडील खंडोजीराव होळकर निवर्तले. बाळ मल्हार हे त्यांचे एकुलते एक अपत्य. खंडोजीरावांच्या मृत्यूने माता जिवाईवर दु:खाचा डोंगरच कोसळला. चोहीकडे अंधारच अंधार पसरला होता. बाळ मल्हारला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माता जिवाईवर पडली होती. सासरच्या आप्तेष्टांचा कोणताच आधार नव्हता. उलट विधवा माता जिवाई आणि बाळ मल्हारचा सांभाळ करावयाचे सोडून त्यांनी मल्हारची संपत्ती आपल्या गळी उतरवण्याचा खटाटोप सुरू केला होता.

हे सर्व काही घडत असताना माता जिवाईला बाळ मल्हारसहित तेथे राहणे पूर्णत: असुरक्षित आणि धोक्याचे वाटू लागले होते. एकतर तेथे बाळ मल्हारचा सांभाळ करणे कठीण होते आणि त्याच्या जीवितालादेखील धोका होता. म्हणून माता जिवाईने आपल्या भावाकडे तळोदा गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या मल्हारला घेऊन त्या मल्हारच्या मामाकडे तळोद्याला गेल्या. तळोदा हे खानदेशामध्ये आहे. तेथे मल्हारचा मामा भोजराज हा पेशव्यांचे सरदार कंठाजी कदम बांडे यांच्या पदरी पन्नास घोडेस्वारांचा नायक होता.

रक्ताचे अतूट नाते असलेल्या आणि राखीच्या बंधनाने बांधलेल्या भाऊरायाने आपल्या बहिणीस आश्रय देऊन बाळ मल्हारचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. जसजसे दिवस जात होते, तसा मल्हार मोठा होत होता. मल्हार आता बराच मोठा झाला होता. मामाने मल्हारकडे मेंढ्या चारावयाचे काम सोपवले. बाळ मल्हार सकाळी उठून स्नानसंध्या आटोपून मेंढ्या चारावयास शेतात जात असे आणि तिसऱ्या प्रहरी मेंढ्या घेऊन पुन्हा घरी येत असे. असा त्याचा नित्यक्रमच बनला होता.

हे चालू असतानाच मल्हारच्या जीवनाला कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण घटना घडली. ती अशी – एके दिवशी बाळ मल्हार नेहमीप्रमाणे मेंढ्या घेऊन शेतात गेला असता दुसऱ्या प्रहरी वामकुक्षी घेण्यासाठी एका झाडाखाली आडवा झाला. थोड्याच वेळात तो निद्राधीन झाला. बाळ मल्हार जेथे झोपला होता तेथेच शेजारी एक बीळ होते. काही वेळाने त्या बिळामधून नागराज बाहेर आले व मल्हारच्या डोक्याजवळ वेटोळे करून आपला फणा काढून डोक्यावर धरला. काही वेळानंतर मल्हारची आई जिवाई मल्हारचे दुपारचे जेवण घेऊन तेथे आली. समोरचे दृश्य पाहून त्या माऊलीची तर भीतीने गाळणच उडाली. माता जिवाई तशीच मागे फिरली व झपझप गावात येऊन तिने पाहिलेली हकिगत भावाला सांगितली. गावातील काही माणसे बरोबर घेऊन ती शेतात पोहोचली. समोरचे दृश्य पाहून ती माणसे अवाक्च झाली. समोर माणसांची गर्दी झालेली पाहून नागराजांनीही आपल्या बिळात प्रस्थान केले.

या घटनेमागे अनेकांनी तर्क-वितर्क लावले; परंतु मल्हारच्या आईचे काही समाधान झाले नाही. अखेर तिने एका ब्राह्मणाला विचारले असता ब्राह्मणाने तिला सांगितले, ‘‘बाई, तुझा मुलगा फारच भाग्यवान आहे. तो स्वपराक्रमाने पृथ्वीपती होईल आणि एका पृथ्वीपतीची आई म्हणून तुला प्रसिद्धी मिळेल.’’

आपल्या मुलाबद्दलचे शुभ भाकीत ऐकून माता जिवाईच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. मामानेही मल्हारला मेंढ्या चारण्याचे काम बंद करून त्याला पंचवीस घोडेस्वाराचा नायक बनवले. नंतर थोड्याच दिवसात माता जिवाईचे निधन झाले.

मल्हार ज्या शुभदिनी घोड्याच्या पाठीवर चढला तो जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याने घोड्याची पाठ सोडली नाही. हातामध्ये तळपणारी तलवार घेऊन पुण्यापासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अटकेपर्यंत स्वपराक्रमाने साम्राज्य प्रस्थापित करून आपले नाव अजरामर केले. अतिसामान्य परिस्थितीत जन्माला येऊन मेंढपाळ मल्हार प्रजापाल झाला आणि भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून इतिहासाची गौरवशाली आणि सामर्थ्यशाली परंपरा कायम ठेकली.

बाल अहिल्याबाई होळकर यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश

मल्हारराव होळकर यांना द्वारकाबाई, बनाबाई व गौतमीबाई अशा तीन बायका होत्या. इ.स. 1725 मध्ये गौतमीबाईंच्या उदरी एक पुत्ररत्न जन्मास आले. त्याचे नाव खंडू ठेवण्यात आले. खंडू हा मल्हाररावांचा एकुलता एक मुलगा होता.

दिवसामागून दिवस जात होते. खंडू हळूहळू मोठा होत होता. बालपणापासूनच तो हट्टी, भांडखोर आणि चिडखोर स्वभावाचा होता. त्याला राज्यकारभारामध्ये जरादेखील स्वारस्य नव्हते. खंडू जसजसा मोठा होऊ लागला तशी त्याला दुर्व्यसने जडू लागली. अतिशय खर्चीक आणि उधळेपणाची वृत्ती असणाऱ्या आपल्या एकुलत्या एक खंडूला मल्हाररावांनी समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु त्याच्यावर काहीदेखील इष्ट परिणाम झाला नाही. उलट त्याचे वेडे चाळे कमी न होता उत्तरोत्तर वाढतच राहिले. अशावेळी खंडूचे लग्न करण्याचा मल्हारराव विचार करत होते आणि खंडूही लग्नाला साजेसा झाला होता. आपल्या दुर्व्यसनी मुलाला इष्ट मार्गावर आणील अशा सुनेच्या ते शोधात होते.

तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. लढायांचे सत्र सर्वत्र चालू होते. मल्हाररावदेखील काही कारणास्तव उत्तर हिंदुस्थानची सफर करून चालले असता चौंडी या गावी रात्र झाली. त्या दिवशी चौंडी येथेच मुक्काम करून नंतर पुढे प्रयाण करण्याचा त्यांचा बेत ठरला. चौंडी येथेच त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह तळ ठोकला. रात्र उलटल्यानंतर पहाटेच्या सुमारास स्नान वगैरे आटोपून ते चौंडी गावी असणाऱ्या महादेवाच्या दर्शनास्तव मंदिरामध्ये गेले.

पहाटेच्या वेळचे प्रफुल्ल वातावरण आणि हवेमध्ये असणारा गारवा यामुळे मन उल्हसित होत होते. मंदिरामध्ये आरती चालू होती. आरतीच्या वेळेस होणारा घंटानाद कानाला गोड वाटत होता. काहींची पूजाअर्चा चालली होती, काही मंडळी नामस्मरण करत होती, तर काही देवाला फुले वाहून भक्तिभावाने परमेश्वरास नमस्कार करून चालली होती. परमेश्वराला वाहिलेल्या विविध रंगीबेरंगी फुलांचा सुवास मंदिरामध्ये दरवळत होता. या संपूर्ण प्रफुल्लमय वातावरणामध्ये काही मंडळी मंदिराबाहेर मोकळ्या मैदानात बसलेली होती. देवभक्तीत रममाण झाली होती आणि त्याच मंडळीमध्ये पेशव्यांचे महापराक्रमी सरदार मल्हारराव होळकरदेखील होते.

एवढ्यात एक बालिका आपल्या सुकोमल हातामध्ये पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे एक तबक घेऊन आली. तिने मंदिरामध्ये प्रवेश केला. देवाची भक्तिभावाने पूजा करून ती बाहेर आली. जमलेल्या सर्व मंडळीस तिने आदराने वंदन केले आणि निघून गेली.

सावळा वर्ण, सरळ नाक, गोल चेहरा आणि सुडौल शरीर असणाऱ्या त्या बालिकेच्या सात्त्विक सौंदर्याने सर्व मंडळी तिच्याकडे मंत्रमुग्ध झाल्यागत पाहतच राहिली. तिचे सुशील आचरण, विनम्रभाव आणि आदरार्थी भावना पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये त्या बालिकेबद्दल श्रद्धा निर्माण झाल्यावाचून राहिली नाही. मल्हाररावांनी त्या सुशील, बुद्धिमान बालिकेला पाहिले आणि तत्क्षणी तिला आपली सून करून घेण्याचा निर्णय केला आणि त्या दृष्टीने प्रयत्नास सुरुवात केली.

त्यावेळेस बाल अहिल्या नऊ (9) वर्षांची होती. मल्हाररावांनी अहिल्येसाठी केलेली मागणी ऐकून मानकोजी शिंदे यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांना आभाळ ठेंगणे वाटू लागले. त्यांनी एका क्षणाचादेखील विलंब न लावता तत्काळ मल्हाररावांच्या मागणीला स्वीकृती दिली. इ. स. 1733 (सतराशे तेहतीस) मध्ये अहिल्याबाई आणि खंडेरावांचा विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.

जेव्हा अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या घरामध्ये त्यांची सून म्हणून प्रवेश केला तेव्हापासून होळकरांच्या घरामध्ये आनंद आणि उत्साहाला जणू उधाण आले होते. त्यांच्या प्रेमळ वागण्याने त्यांनी सर्वांची मने जिंकली. कोठल्याही प्रकारचा भेदभाव न करता विनम्रतेने आणि निष्पक्षपातीपणे त्या सर्वांची कामे चोख बजावत असत. आपल्या सासू – सासऱ्यांची त्या माता-पित्याप्रमाणे सेवाशुश्र्रूषा करीत. त्यांच्या अंगी असणाऱ्या सद्भावनेने आणि विनयशील आचरणाने थोड्याच दिवसात त्या सर्वांच्या लाडक्या बनल्या.

अहिल्यामाता भल्या पहाटे उठत असत. स्नानसंध्या वगैरे आटोपून पूजाअर्चा, पोथीपठण करून सर्वांच्या सेवेस तत्पर राहणे असा त्यांचा नित्यक्रम बनला होता. त्या सर्वांची मनोभावे सेवा करून सर्वांना प्रसन्न ठेवत. अहिल्याबाईंनां देखील कोणी त्रास देत नसे.

खंडेराव हे अत्यंत दुर्गुणी आणि दुर्व्यसनी होते. त्यांचे राहणीमानदेखील अत्यंत खर्चीक होते. घरामधील शिक्षण उच्चप्रतीचे असूनदेखील खंडेरावांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. खंडेराव एक आदर्श प्रजापाल आणि राजहितदक्ष व्हावा या मल्हाररावांच्या अपेक्षेवर पाणी फेरले होते; परंतु अहिल्यामातेने ज्या दिवशी खंडेरावांच्या जीवनामध्ये त्यांची सहचारिणी म्हणून प्रवेश केला, तेव्हापासून अहिल्यामातेच्या अप्रतिम बुद्धिमत्तेने आणि अष्टपैलुत्वाने त्यांच्या जीवनामध्ये इष्ट परिवर्तन होत चालले होते.

आपला पती हा दुर्व्यसनी आणि दुर्गुणी आहे हे माहीत असूनदेखील अहिल्यामातेने कधीच त्याचा अनादर केला नाही किंवा त्यांना वाईट वाटेल असे वर्तन केले नाही. उलट आपल्या पतीची मनोभावे सेवाशुश्रूषा करून त्यांना आनंदी ठेवण्याचा त्या प्रयत्न करीत. खंडेरावांना वेगवेगळ्या प्राचीन इसापनीतीच्या आणि शूरवीरांच्या कथा सांगून त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचा त्या प्रयत्न करीत. त्या एक आदर्श हिंदू नारी होत्या. हिंदू संस्कृतीतील सर्व सद्गुण त्यांच्या अंगभूत होते. पतिव्रता धर्माचे पालन करून त्या आपल्या पतीला सदैव प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत.

अहिल्यामातेच्या सुशील आचरणाने आणि प्रेमळ वागण्याने खंडेराव नेहमी प्रसन्न राहत असत. त्यांच्यामधील दुर्व्यसने आणि दुर्वर्तने हळूहळू लोप पावत चालली होती. आता ते एक आदर्श गृहस्थाश्रमी बनत चालले होते. अहिल्यामातेच्या प्रेरणेने त्यांनी राज्यकारभारात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि युद्धविद्येतही नैपुण्य संपादन केले होते. अविरत आणि अथक परिश्रमाने निर्माण झालेल्या होळकरशाहीचा वटवृक्ष फुलवण्यास थोडेफार योगदान तेदेखील देऊ लागले होते. यामुळे घरातील सर्व मंडळी आनंदात होती. अहिल्यामातेच्या गृहस्थाश्रमातील प्रवेशाने होळकर घराण्यातील सर्व मंडळी स्वर्गसुख अनुभवीत होती.

अशातच इ.स. 1745 मध्ये अहिल्यामातेला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मालेराव ठेवण्यात आले. राज्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. तीन वर्षांनंतर एक कन्या झाली. तिचे नाव मुक्ताबाई ठेवण्यात आले.

अकाली वैधव्य

खंडेराव होळकर हे होळकरशाहीचे खरेखुरे वारसदार; परंतु राज्यकर्त्यांसाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्या अंगी नव्हते. ते एक स्वच्छंदी, दुर्व्यसनी आणि चिडखोर, तापट स्वभावाचे होते. यामुळे मल्हारराव होळकर नेहमी चिंतित राहत असत. शेवटी त्यांनी खंडेरावाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि इस.1733 मध्ये अहिल्येबरोबर खंडेरावाचा विवाह केला. त्याचा खंडेरावावर इष्ट परिणाम झाला. खंडेरावांमध्ये आदर्श जोपासण्याची संपूर्ण जबाबदारी अहिल्येवर आली. त्यांनीदेखील आपल्या बिघडलेल्या पतीराजाचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न सुरू केला. अहिल्याबाईचे शुद्ध प्रेम, विनम्र सेवाभाव आणि उच्चकोटीतील जीवन, यामुळे खंडेरावांच्या वाईट वर्तनात इष्ट परिवर्तन घडू लागले. त्यांची दुर्व्यसने हळूहळू सुटू लागली. राज्यकारभारामध्ये लक्ष देण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या मुलात झालेला बदल पाहून मल्हाररावाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि मनोमन त्यांनी अहिल्यामातेचे आभार मानले.

अहिल्यामातेने ज्या दिवशी होळकरांच्या घरात पदार्पण केले त्या दिवसापासून घरात आनंद आणि उत्साह संचारला होता. खंडेरावदेखील ताळ्यावर आले होते. मल्हाररावांनी त्यांना राज्यकारभाराची कामे सांगण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर लढाईला बरोबर नेण्यासदेखील सुरुवात केली होती. कारण हातात तळपणारी तलवार घेऊन रणांगणात उतरून शत्रुपक्षाला पाणी पाजणाराचेच त्यावेळचे राजकारण होते. अहिल्यामातेच्या प्रेरणेने खंडेरावांनी युद्धकलेतही नैपुण्य संपादन केले होते. मल्हाररावांसोबत एक-दोन लढायात त्यांनी चांगलीच मर्दुमकी माजवली होती. त्याचबरोबर घरातील कुटुंबीयांनादेखील घरामध्ये स्वर्गसुख अवतरल्याचा भास होत होता; परंतु हे सर्व विधात्याला मान्य नव्हते.

इ.स.1754 साली अजमेर येथे जाट लोकांकडून चौथाई वसूल करण्यासाठी मल्हारराव खंडेरावांना घेऊन गेले असता, जाटांनी चौथाई देण्यास विरोध दर्शविला. खंडेरावांनी जाट लोकांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु जाटांनी त्यांना उलट उत्तर दिले. मल्हाररावांसारख्या महापराक्रमी, स्वाभिमानी वीरपुरुषाला हा उलट जवाब सहन करून घेणे शक्य नव्हते. साम-दाम याचा काही उपयोग होत नाही हे पाहून मल्हाररावांनी शेवटचा पर्याय म्हणून युद्धाची घोषणा केली. आणि कुंभेरच्या किल्ल्यास वेढा दिला.

इकडे सुरजमल जाटानेदेखील आपली फौज तयार केली होती. रणमैदानावर खंडेराव, अहिल्यामाता सर्व तयारीनिशी हजर होते. शेवटी युद्धास तोंड फुटले. धुमश्चक्री सुरू झाली. दोहोंकडच्या सैन्याने रणधुमाळी गाजवली. सतत चार महिने युद्ध सुरू होते. सुरजमल जाट शरण येण्यास तयार नव्हता आणि शत्रूला धूळ चारल्याखेरीज माघारी फिरणे मल्हाररावांच्या रक्तात नव्हते. दोहोबाजूंनी तुंबळ युद्ध चालू होते.

अखेर 24 मार्च, 1754 चा दिवस उजेडला. खंडेरावाच्या जीवनातील तो शेवटचा दिवस होता. अहिल्यामातेच्या कपाळावरील कुंकवाचं लेणं, त्यांचं सौभाग्य त्या दिवसाला मान्य नव्हते. नेहमीप्रमाणे लढाईस प्रारंभ झाला. घनघोर युद्ध सुरू झाले. एवढ्यात कुंभेरच्या किल्ल्यावरून जाटांनी गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी काळरूपाने सनसनत खंडेरावांच्या छातीत घुसली. जणूकाही तिला खंडेरावांचे प्राणच हवे होते. खंडेराव धारातीर्थी कोसळले आणि काही क्षणातच त्यांना वीरगती प्राप्त झाली. हा हा म्हणता बातमी वाऱ्यासारखी चोहीकडे पसरली. मल्हारराव धावतच एकुलत्या एक खंडूच्या प्रेताजवळ आले. त्यांनी खंडेरावांच्या शवाला उराशी कवटाळले. त्यांना पुत्रशोक आवरेना. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. ते पुन: पुन्हा शवाला कवटाळीत होते. छातीशी धरत होते. पाषाणाला पाझर फुटेल अशा आर्तस्वरात शोक करीत होते.

खंडेरावांच्या मृत्युची वार्ता अहिल्याबाईंना समजताच आपल्या पायाखालची जमीन सरकते की काय असे त्यांना वाटले. त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. खंडेरावांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या मनावर वज्राघात झाला होता. त्या तत्क्षणी मूर्च्छा येऊन पडल्या. शुद्धीवर येताच आर्त अतिविकल स्वरात आक्रोश करीत त्या खंडेरावांच्या प्रेताजवळ आल्या. पतीशिवाय त्यांचे पूर्ण जीवन शून्य झाले होते. चोहीकडे अंधार पसरल्याचा त्यांना भास होत होता. प्रकाशाचा सूतभर किरणदेखील त्यांच्या जीवनात उरला नव्हता. त्यांनी सती जाण्याची तयारी सुरू केली.

मल्हारराव पुत्रशोकाच्या महासागरात बुडाले होते. त्यांची ती अतिविकल अवस्था प्रत्येकाला असह्य होत होती. तेथील काही सरदार मंडळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होती. या जगात प्रत्येक वस्तू नाशवंत आहे, प्रत्येकाची कालमर्यादा ठरलेली आहे, आपण तर मनुष्यप्राणी आहोत. साक्षात परमेश्वरालाही मृत्यू टळला नाही, आपण तर सामान्य आहोत! ज्याने जन्म घेतला तो ठराविक अवधीनंतर मृत्यूच्या अधीन होणारच! कारण मृत्यू अटळ आहे आणि जी गोष्ट या संसारामध्ये अटळ तिच्यासाठी व्यर्थ शोक का करावा? ज्याच्यासाठी शोक करणे आणि न करणे सारखेच आहे त्यासाठी रडायचं कशाला? दुःखी होऊन किंवा शोक करून कालवश झालेली व्यक्ती का आपल्याला परत मिळणार आहे? तेव्हा आपण व्यर्थ शोक करत बसू नका, ते सर्व निरर्थक आहे. कारण काळ हा फार सामर्थ्यशाली आहे. त्याच्यासमोर सर्व समानच आहेत. एक ना एक दिवस तो सर्वांचा नाश करणारच, हे त्रिकाल सत्य आहे. त्याच्यापुढे कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. आज किंवा उद्या आपल्या सर्वांना त्याच्या आधीन व्हावेच लागणार आहे.

अशा प्रकारे सरदारमंडळी मल्हाररावांना समजावत होती. इकडे अहिल्यामातेची सती जाण्याची तयारी सुरू झाली होती. ते पाहून मल्हाररावांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. अगोदरच पुत्रनिधनाने शोकाकुल झालेले मल्हारराव अधिकच व्याकूळ झाले. आता अहिल्याच होळकर राज्याचा आधारस्तंभ होती. तिच्यावरच त्यांची संपूर्ण भिस्त होती. ती नात्याने जरी मल्हाररावांची सून असली तरी त्यांची आवडती शिष्या आणि लाडकी मुलगी होती. गुरू-शिष्या आणि पिता-पुत्रीचे अतूट नाते त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. अहिल्यामातेशिवाय होळकरशाही पूर्णपणे पोरकी होती. कारण खंडेरावांनंतर होळकरशाहीला तिचाच पूर्णत: आधार होता. आपली सून, आवडती शिष्या आणि लाडकी मुलगी सती चाललेली पाहून मल्हाररावांची अवस्था अतिविकल झाली. चोहीकडे अंधारच अंधार त्यांना दिसत होता. ते दु:खातिरेकाने पूर्णत: खचून गेले होते. जीवनभर अनेक लढायात मर्दुमकी गाजवून, पूर्ण देशभरात स्वत:च्या नावाचा वचक बसवून, त्रिखंडात कीर्ती संपादन करणारा तो महापराक्रमी योद्धा, अनेक संकटांना सामोरे जाऊन कधीही न डगमगणारा तो मुत्सद्दी रणधुरंधर आज मात्र एक याचक म्हणून अहिल्येसमोर उभा होता. अहिल्याबाईला कळवळून विनवीत होता.

‘‘आता माझा मुलगा तूच आहेस पोरी. तू गेल्यावर मला कोणाचा आधार! आज तू गेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजतो. या म्हाताऱ्याची कीव येऊ दे पोरी, दया येऊ दे!’’

दगडाला पाझर फोडणारे त्यांचे शब्द ऐकून पाषाणहृदयी मनुष्यालादेखील रडू कोसळले असते. ती तर साधी-भोळी माणसं! सर्वांच्या नेत्रकमलामधून आसवे येऊ लागली. मल्हारराकांना दुःखावेग आवरणे कठीण होते. कसेबसे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडत होते. कधी बोलत होते, तर कधी ओक्साबोक्सी रडत होते. अहिल्याबाईंना सती जाऊ नये म्हणून विनवीत होते.

मध्येच अंत:करणाला पीळ पडणारा टाहो फोडत होते. सुकोमल हृदयाच्या अहिल्यामातेचे अंतःकरण भरून आले. आपल्या पितृसमान सासऱ्याच्या विनंतीला त्यांनी मान दिला. लोकनिंदेचा विचार न करता प्रजाहितासाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला. अहिल्यामातेचा सती न जाण्याचा निर्णय ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनोमन संतोष वाटला. त्यानंतर खंडेरावांची उत्तरक्रिया आटोपण्यात आली.

मल्हाररावांचा मृत्यू

अहिल्यामातेच्या जीवनात एकामागून एक असे अनेक दुःखद प्रसंग येत होते. साहजिकच दुःखदप्रसंगी प्रत्येकाच्या जीवनामध्ये नैराश्य येते आणि निराशेने आपले जीवनच नकोसे होऊन जाते. मग मनुष्याला आपल्या सभोवतालचे जग नकोसे वाटू लागते आणि त्याला हवा असतो तो एकांत. त्याला दु:खित स्थळापासून दूर जावंसं वाटतं आणि वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये काही क्षण घालवावेसे वाटतात. जोपर्यंत त्याची सदसद्‌विवेकबुद्धी जागृत होत नाही. तोपर्यंत त्याच्या मनामध्ये निरसभावना निर्माण झालेली असते. असाच प्रकार अहिल्यामातेच्या जीवनामध्ये घडला; परंतु प्रत्येक वेळेस हताश न होता आपल्या सदसद्विवेकाने प्रजा आणि धर्मार्थ सर्व दुःखे बाजूस सारून प्रजेच्या कल्याणात आणि राज्यकारभारात रमून जात असत. कारण त्या जगत असत परार्थासाठी. त्यांचे जीवन स्वत:साठी नसून दुसऱ्याचे हित आणि कल्याणासाठीच होते, असे त्या मानत असत. त्या प्रजाहितदक्ष, कर्तव्यनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि परोपकारी असल्यामुळे त्यांनी मोठमोठ्या दुःखद प्रसंगीदेखील खचून न जाता त्यावरून यशस्वी वाटचाल केली.

खऱ्या अर्थाने इ.स. 1754 पासूनच अहिल्यामातेच्या दुःखी जीवनास सुरुवात झाली. 1754 मध्ये खंडेरावांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्यात मृत्यूची अखंड मालिका सुरू झाली. स्वत:च्या पोटच्या मुलाच्या मृत्यूने माता-पित्याला होणारे दु:ख हे कधीही न संपणारे असते. खंडेरावांच्या मृत्यूने मल्हाररावांवर दु:खाचा प्रचंड डोंगर कोसळला होता. ते अत्यंत दु:खी झाले होते. वृद्धापकाळातील त्यांचा मोठा आधारस्तंभ काळाच्या अधीन झाला होता. अवेळी त्यांच्या मनावर झालेल्या वज्रघाताने ते अत्यंत खचून गेले आणि त्यांची मन:स्थिती बिघडली. काही काळ एकांतात घालवावा असे त्यांना वाटत होते.

परंतु तो काळ अत्यंत अराजकतेचा आणि अंदाधुंदीचा होता. 1761 च्या पानिपतच्या महासंग्रामात मराठ्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. देशामध्ये सर्वत्र अशांततेचे वादळ सुटले होते. मराठ्यांच्या पराभवाने त्यांचे विरोधक हर्षोल्हसित झाले होते. मराठ्यांना परास्त करण्याचे त्यांचे खटाटोप चालू होते. मराठेशाहीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. माळव्यातून मराठा साम्राज्याचा अस्त करण्याचा विरोधक प्रयत्न करत होते. सर्वत्र अशांती, अराजकता, अंदाधुंदी नांदत होती.

अशा अतिशय बिकट प्रसंगी मल्हाररावांसारख्या महापराक्रमी वीरपुरुषाला शांत बसणे केवळ अशक्य होते. मराठेशाहीची बिघडलेली घडी व्यवस्थित करण्यासाठी मल्हाररावांनी माळव्यापासून प्रारंभ केला. एखाद्या झंझावाताप्रमाणे ते देशात शांतता प्रस्थापित करत होते. पोटच्या मुलाच्या निधनाचे दुःख उरात ठेवून ते देशासाठी अहोरात्र अथक परिश्रम करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत होते. थोड्याच दिवसांमध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वाने विरोधकांची आग शमवून जवळजवळ संपूर्ण देशामध्ये शांतता प्रस्थापित केली.

आता उत्तर भारतामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले; परंतु त्यांच्या हातून घडणारी देशसेवा विधात्याला मान्य नव्हती. विधिलिखित वेगळेच होते. मुलाच्या मृत्यूने संसारामध्ये न मावणारे दुःख त्यांनी अंत:करणात साठवले होते. त्याचबरोबर वृद्धत्वाकडे झुकलेल्या मल्हाररावांना रोजची होणारी दगदग आणि नेहमी होणारी युद्धे यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. आता आणखी परिश्रम पेलवणे त्यांना कठीण जात होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस आणखीच बिघडत होती. उत्तमोत्तम औषधोपचार केले जात होते; परंतु सर्व निष्कळ ठरत होते. नामांकित वैद्याने केलेल्या उपचारानेदेखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी 26 मे 1766 रोजी त्या महापराक्रमी वीरपुरूषाने जगाचा कायमस्वरूपी निरोप घेतला.

महापराक्रमी मल्हाररावांच्या मृत्युने मराठेशाहीचे अपरिमित नुकसान झाले. अगोदरच वैधव्याने खचलेल्या अहिल्यामातेवर तर दुःखाचे आभाळच कोसळले होते. त्यांचे दुःख अनावर झाले होते. त्या दु:खसागरात पूर्णत: बुडाल्या होत्या. एक सासराच नाही, तर आदर्श गुरू, महान पथदर्शक व प्रेमळ पिता त्यांना दुःखाच्या प्रचंड महासागरात लोटून काळाच्या आधीन झाला होता. मल्हाररावांच्या मृत्यूने होळकरशाहीची संपूर्ण धुरा त्यांच्यावर येऊन पडली होती. मराठेशाहीचा महान आधारस्तंभ काळाच्या अंधारात विलीन झाला होता.

मालेरावाचा मृत्यू

अहिल्यामातेला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. मुलाचे नाव मालेराव होते. त्याला सर्वजण लाडाने मालबा म्हणत. अहिल्यामातेचे एकुलत्या एक मुलावर जिवापाड प्रेम होते. होळकरांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून निर्माण झालेल्या वैभवशाली होळकरशाहीचा मालबाच वारसदार होता. अहिल्यामातेच्या सर्व आशा-आकांक्षा मालबावरच निर्धारित होत्या.

परंतु मालबा दुराचारी आणि खट्याळ होता. इतरांच्या खोड्या करण्यात त्याला आनंद मिळत असे. राज्यकारभार आणि प्रजा याकडे त्याचे फारसे लक्ष नव्हते. शून्यातून निर्माण केलेल्या होळकर राज्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी आवश्यक असणारे गुण मालेरावांमध्ये नव्हते. उलट त्याच्यामध्ये दुर्गुणच फार होते. अशा या दुर्गुणी मुलास समजावून जीवनाच्या इष्ट मार्गावर आणण्यासाठी अहिल्यामातेने प्रयत्नांची पराकाष्टा केली; परंतु ते सर्व प्रयत्न विफल ठरले.

4 जून, 1766 रोजी अहिल्यामातेने मालेरावला समजुतीखातर एक पत्र पाठवले. ते खालीलप्रमाणे –

श्री. ए. मोहर्रम,
मुक्काम चारोळी, प्रांत गोद्ध.

चि. राजेश्री मालबा यांस,

अहिल्याबाईचा आशीर्वाद. इकडे सर्व कुशल आहे. तुझे क्षेमकुशल कळवीत असावे. तुझे पत्र नसल्यामुळे वर्तमान कळले नाही, म्हणून मन उद्विग्न आहे. असे करीत जाऊ नये. नेहमी वरचेवर पत्र लिहून सविस्तर वर्तमान कळवीत असावे. मी तुला दोन-तीन पत्रे पाठविली आहेत. त्यात लिहिल्याप्रमाणे मन शांत कर. आता शोक करीत बसण्याची वेळ नाही. सरदारकीचा विचार करून राज्य चालविले पाहिजे. विवेक बाळगून कामकाजात मन घातले पाहिजे आणि कै. मल्हाररावांनी राज्य केले त्याप्रमाणे आपलीही कीर्ती पसरेल अशाच प्रकारे तुला वागले पाहिजे. आणि कै. मल्हाररावांनी राज्य केले त्याप्रमाणे आपलीही कीर्ती पसरेल अशाच प्रकारे तुला वागले पाहिजे. आता शोक आवरून, दूरदर्शीपणे काम करून आजोबांपेक्षाही जास्त कीर्ती संपादन करण्यातच तुझा खरा गौरव आहे. राजेश्री गंगाधरपंत तात्या यांच्या इच्छेनुसार चालावे. जास्त काय लिहिणे. आशीर्वाद.

या पत्रावरून अहिल्यामातेची सदसद्‌विवेकबुद्धी त्याचप्रमाणे पुत्रप्रेम स्पष्ट होते.आईने अत्यंत ममतेने केलेल्या या उपदेशाकडे मालेरावने जरादेखील लक्ष दिले नाही. आपल्या वाईट वर्तणुकीमध्ये जराही परिवर्तन न करता उलट आपला वेडाचार वाढवला.

शेवटी अहिल्यामातेने मालेरावचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. 23 ऑगस्ट 1766 रोजी मालेरावांचा राज्याभिषेक संपन्न झाला. एका वैभवशाली, संपन्न होळकर राज्याचे मालेराव सर्वाधिकारी बनले; परंतु मालेरावांनी राज्यकारभाराकडे यत्किंचितही लक्ष दिले नाही. प्रजेचे रक्षण करण्याऐवजी त्यांचा छळ करण्याचे सत्र त्यांनी अवलंबले. मद्यपान करणे आणि पशूंच्या सहवासात राहणे मालेरावांचा नित्यक्रमच बनला होता.

राज्याभिषेकानंतर आठ महिनेदेखील मालेराव व्यवस्थित राज्यकारभार करू शकले नाही. काही दिवसातच ते आजारी पडले. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी अहिल्यामातेने उत्तमोत्तम औषधोपचार केले; परंतु मालेरावांचा आजार विकोपाला गेला आणि काही दिवसातच ते काळाच्या अधीन झाले.

मालेरावांच्या मृत्यूने अहिल्यामातेला अतीव दुःख झाले. अतिकरुणामय अवस्थेत दगडाला पाझर फोडणारा त्या आक्रोश करत होत्या. संपूर्ण वातावरण दु:खमय झाले होते. शेवटी या वातावरणातच मालेरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन बायकाही सती गेल्या.

आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ अहिल्यामातेने इंदौर येथे छत्री उभारली.

मुक्ताबाईचा विवाह

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ याप्रमाणे अहिल्यामातेने आपले जीवन सदासर्वकाळ प्रजेच्या हितासाठी आणि सुखासाठी वाहिलेले होते. प्रजेला दैवत मानून त्या त्यांची सेवा करत असत. आपल्या राज्यामध्ये कोणी दुःखी, कष्टी राहून नये, असे त्यांना वाटत असे. कोणी दुःखी असला तर त्याला सर्वतोपरी सुखी करण्यासाठी त्या प्रयत्न करत. कारण राजा हा प्रजेसाठी असतो आणि प्रजेच्या हितातच राजाचे हित असते. त्यासाठी राजाने सर्वस्व अर्पण करून प्रजेच्या हिताचे रक्षण केले पाहिजे, असे त्या मानत असत. प्रजेच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्या तत्पर राहत असत. त्यांच्या राज्यातील प्रजा ही सदैव स्वर्गसुख अनुभवीत होती.

अहिल्यामातेला दोन अपत्ये होती. एक मुलगा होता. त्याचे नाव मालेराव होते, तर एक मुलगी होती तिचे नाव मुक्ताबाई होते. मालेरावांच्या मृत्युनंतर मुक्ताबाई हीच मातेची सर्वस्व होती. अहिल्यामातेप्रमाणेच मुक्ताबाईदेखील बुद्धिमान, शीलवान आणि गुणवान होती. अहिल्यामातेचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते.

मालेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यामातेने राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. तो काळ अत्यंत अंदाधुंदी आणि अराजकतेचा होता. सर्वत्र अशांतता धगधगत होती. जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. चोर- दरोडेखोरांच्या त्रासामुळे रयत हैराण झाली होती. सामान्य जनतेला जीवन जगणे मुश्कील झाले होते. उत्तरेत मोंधी आणि सिंधी लोकांनी धुमाकूळ घातला होता, तर दक्षिणेत नेमाड आणि खानदेशात भिल्ल लोकांनी प्रजेचा छळ सुरू केला होता. चोर-दरोडेखोरांची सर्वत्र दहशत पसरली होती. अहिल्यामातेच्या कानावर रोज चोर-दरोडेखोरांची कटकारस्थाने येत होती. अहिल्यामाता चोर-दरोडेखोरांच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्याचा आणि त्यांचा बंदोबस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या; परंतु त्यांना यश मिळत नव्हते. चोर-दरोडेखोर तर प्रजेला त्रास देण्याचे कमी न करता वाढतच होते.

प्रजेच्या सुखातच आपले सुख मानणाऱ्या अहिल्यामातेला चोरचिलटांचा प्रजेला होणारा त्रास आता अधिक काळ खपवून घेणे अशक्य झाले. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी अहिल्यामातेने एक योजना बनवली. त्या योजनेअंतर्गत प्रजाजनांसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी त्या तत्पर झाल्या.

आपली राजधानी महेश्वर येथे अहिल्यामातेने सेनाप्रमुख, सरदारमंडळी, अधिकारी व गावोगावचे प्रमुखमंडळी यांना बोलावून विशाल दरबार भरवला. या विशाल दरबारात राज्यात चोर-दरोडेखोरांनी मांडलेल्या उच्छादाचे वर्णन करून शेवटी जाहीर केले –

‘‘माझ्या राज्यातून चोर-दरोडेखोरांचा होणारा त्रास जो वीर दूर करील, त्याच्याशी मी माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह करीन.’’

ही घोषणा ऐकताच संपूर्ण दरबारामध्ये स्मशान शांतता पसरली. कोणीही पुढे येण्यास धजत नव्हते. तेवढ्यात एक तेजस्वी वीर उभा राहिला आणि त्याने हा मानाचा विडा उचलला.

अहिल्यामातेने एका क्षणाचाही विलंब न करता त्या वीरपुरुषाला आवश्यक ती सर्व मदत दिली. तो तेजस्वी वीर, फौजफाटा बरोबर घेऊन एखाद्या झंझावाताप्रमाणे राज्यात पोहोचला आणि पूर्ण चोर-दरोडेखोरांचे अत्यंत निर्दयतेने पारिपत्य केले व विजयश्री मिळवून तो महेश्वरला पोहोचला. तो तेजस्वी महापराक्रमी वीरपुरुष म्हणजेच यशवंतराव फणसे होय.

यशवंतराव फणसे महेश्वरला पोहोचताच अहिल्यामातेने त्यांचा उचित सत्कार केला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यामातेने दिलेल्या वचनाप्रमाणे यशवंतरावांशी मुक्ताबाईचा विवाहयोग घडवून आणला. मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसमारंभ साजरा करण्यात आला. प्रजेच्या सुखासाठी सदैव सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान कर्मयोगिनीचा तो विवाह म्हणजे सत्त्वपरीक्षाच होती. कारण त्या दिवशी आपल्या एकुलत्या एक मुलीला त्या विदा करणार होत्या. त्याचबरोबर तो अहिल्यामातेच्या जीवनातील आनंदाचाही क्षण होता. कारण स्त्रीचे स्त्रीत्व ज्यामध्ये सामावलेले आहे असा विवाहयोग त्या दिवशी घडून आला होता; परंतु काही असले तरी मुक्ताबाई अहिल्यामातेच्या पोटचा गोळा होता. एका मातेचे हृदय बाळाशिवाय किती वेळ तग धरणार? वासराविना हंबरडा फोडणाऱ्या गाईप्रमाणे मातेची अतिविकल अवस्था झाली होती. शेवटी अतिशय दु:खी अंत:करणाने अहिल्यामातेने आपल्या एकुलत्या एक मुलीला माहेरचा निरोप दिला.

वास्तविक पाहता मुक्ताबाई ही एका वैभवशाली होळकरराज्याच्या राज्यकर्त्या अहिल्यामातेची कन्या होती. तिचा विवाह एखाद्या राजपुरुषाबरोबरच व्हावयास हवा होता; परंतु प्रजेचे रक्षण करणाऱ्या प्रजाहितदक्ष अहिल्यामातेने प्रजेच्या हितासाठी आपली एकुलती एक कन्यादेखील पणास लावली, ही त्यांच्या थोरपणाची केवढी मोठी साक्ष आहे.

अहिल्याबाई होळकर यांची राजधानी महेश्वर

खंडेरावांच्या मृत्यूने अहिल्यामातेस आलेले वैधव्य आणि त्यानंतर सासरे मल्हारराव व मुलगा मालेराव यांच्या मृत्यूने अहिल्यामाता पूर्णत: खचून गेल्या होत्या. जिवापाड प्रेम असणारी आप्तेष्ट मंडळी एकापाठोपाठ एक अशी निघून गेली होती. अहिल्यामातेवर दुःखाचे डोंगर कोसळत होते. त्यांचे मन खिन्न आणि उदास झाले होते. कोठेतरी दूर निघून जावे असे त्यांना वाटत होते; परंतु त्यांची सदसद्‌विवेकबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे त्या पुन्हा राज्यकारभाराकडे वळत असत; परंतु अशा दु:खदसमयी इंदौरमध्ये राहणे त्यांना डोईजड वाटत होते. त्यांच्या दु:खी अंतःकरणाला शांतता हवी होती आणि यामुळे त्या अशा राजधानीच्या शोधात होत्या की, जेथे त्यांच्या अंतःकरणाला शांती लाभेल.

अहिल्यामाता मूळत: धार्मिक प्रवृत्तीच्या असल्यामुळे एखाद्या धार्मिक स्थळास होळकर राज्याची राजधानी बनवण्याचा त्यांचा मानस होता. नर्मदा मातेला त्या पूज्य मानत असत. त्यामुळे नर्मदेच्या तीरावरच एखादे पवित्र स्थान शोधून त्याला आपली राजधानी बनवावी असे त्यांना वाटत असे. म्हणून नर्मदाकाठी वसलेल्या महेश्वरनगरीस सर्व दृष्टीने योग्य ठरवून आपल्या वैभवशाली होळकर राज्याची राजधानी बनवली.

अहिल्यामातेने महेश्वरला आपली राजधानी बनवून त्याचे झोपलेले भाग्य उदयास आणले. त्यांनी ज्या दिवशी महेश्वरात प्रवेश केला तेव्हापासून महेश्वरची अखंड प्रगती सुरू झाली. अहिल्यामातेने तेथील जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, देवालये उभारली, नवीन वास्तू उभारल्या.

त्यामुळे साहजिकच धार्मिक वृत्तीचे लोक आणि आध्यात्मिक विषयावर प्रभुत्व असणाऱ्या मंडळींची महेश्वरकडे रीघ लागली. होमहवन, मंत्रजागर, कीर्तने, प्रवचने होऊ लागली. साहित्य आणि कला यावर अहिल्यामातेचे प्रेम होते. साहित्यिक, कलाकार आणि विद्वान यांना अहिल्यामातेने राजाश्रय दिला. कलाकार, शिल्पकार, पाथरवट आणि कारागीर यांची संख्या कासवगतीने वाढू लागली. कारागिरांच्या कारागिरीने महेश्वरची देवालये आणि मूर्ती यांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली. महेश्वरची प्रगती दिवसेंदिवस वाढतच होती. थोड्याच दिवसांत महेश्वर सुंदर, धार्मिक आणि सांस्कृतिक नगरीत गणले जाऊ लागले आणि महेश्वरचे नाव भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील दुमदुमले.

अहिल्यामाता केवळ पारमार्थिक, धर्मपरायण किंवा दानधर्मच करत असे नाही, तर श्रमप्रतिष्ठेलादेखील त्या महत्त्व देत. महेश्वरमध्ये त्यांनी उद्योगवाढीस प्रोत्साहन दिले. वस्त्रोद्योगासहित इतर उद्योगधंदे वाढवण्यात मदत केली. मजूर, कारागीर, विणकर आदींना मोफत घरे वाटली. त्यांना हवी असणारी मदत पुरवली. त्यामुळे थोड्याच दिवसात उद्योगधंदे भरभराटीस आले. आपल्या श्रमांना मिळणारी प्रतिष्ठा पाहून जो तो उत्कृष्ट प्रकारचे काम करू लागला. त्यांच्या श्रमातून निर्माण होणारे साहित्य सुंदर, टिकाऊ आणि उत्कृष्ट प्रतीचे बनू लागले. त्यामुळे थोड्याच दिवसांत महेश्वरच्या कारागिरांची ख्याती देशभर पसरली.

तत्कालीन महेश्वरचे वर्णन करताना त्या काळचे प्रसिद्ध शाहीर व कवी अनंत फंदी लिहितात,

‘‘नर्मदातटनिकट घाट बहुत अफाट,
पायऱ्या दाट, चिरेबंदी वाट, मुक्तीची शिवालये।
कैलास साम्यता, नानापरीची रचना, रचली रामकृष्ण मंदिरे।
बहुत सुंदर बांधिली घरे, रम्य रमकुल हवेल्या नयनी पाहिल्या॥
नूतन घाट, प्रताप, अहिल्या किल्ल्यावर तळवटी।
शहर गुलजार, बहुत बाजार, हजारो दुकाने।’’
लक्षापती सावकार, भारीभारी माल, खजिना स्वस्त।
स्वस्ता सुकाळ, नाही दुष्काळ, बाळ-वृद्ध-प्रतिपाळ करिती।
गरीब-गुरीब कंगाल, गांजले, अडले निडले त्या देखोनिया अन्नछत्र सर्वत्र।
सारखे नाही पाहिले पारखे नयनी।
महेश्वर क्षेत्रपूर ॥1॥
दानधर्म करी, नित्य शिवार्चन सत्त्वशील ऐकून धावती देशोदेशीचे
कर्नाटक, तैलंग, द्रविड, कऱ्हाड, वऱ्हाड, कोल्हापूर, कृष्णतीर, गंगातीर, कोकण, काशीकर। गयावळ माळवे, बीऱ्हांगडे, योती, कानडे, वेडे बागडे गुजराती मैथुली पुरी, भारती दिगांबर जटाधारी।
बैरागी, योगी, कानफाडे दर्शना येती हरिदासाचे प्रेमळ भक्त-संप्रदाय पुष्कळ पाहिले नयनी सर्व।
महेश्वर क्षेत्रपूर ॥2॥

अहिल्यामातेने महेश्वरला आपल्या वैभवशाली साम्राज्याची राजधानी करून ते समृद्ध व संपन्न बनवले. ते किती समृद्ध होते याची कल्पना अनंत फंदीच्या कवनावरून येते. महेश्वरचे निसर्गसौंदर्य म्हणजे निसर्गदेवतेने आपल्या सहस्रबाहूंनी प्रदान केलेले असावे असे अप्रतिम होते. तेथे प्रेक्षणीय स्थळे मोठ्या प्रमाणात होती. तेथील निसर्ग अत्यंत रमणीय आणि मनमोहक असल्यामुळे जणू काही तो देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत होता. त्यामुळे महेश्वर हे त्यावेळच्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळात गणले जाऊ लागले. त्यातच महेश्वरला एक मोठी बाजारपेठदेखील लाभली होती शिवाय महेश्वर वैभवशाली होळकर राज्याच्या राजधानीचे स्थान असल्यामुळे इतर राज्याचे वकील, मुत्सद्दी, सरदार, अधिकारी यांची ये-जा असायची. त्याचबरोबर तेथे व्यापारी, धनवान, श्रमिक, कलाकार, कारागीर, विद्वान, साहित्यिक, कवी कायमस्वरूपी स्थायिक झाले होते. इतर राज्याचे वकीलदेखील तेथेच राहत असत. त्यामुळे महेश्वरचे महत्त्व फार वाढले आणि ते एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले होते.

अहिल्यामाता एका विशाल आणि वैभवशाली राज्याच्या प्रमुख सत्ताधारी होत्या; परंतु त्यांना आपल्या सत्तेची जरादेखील धुंदी वा गर्व नव्हता. नर्मदेकाठच्या मनमोहक निसर्गसौंदर्याने नटलेल्या महेश्वरात अहिल्यामातेचे निवासस्थान हे प्रभू रामचंद्रांच्या पंचवटीला साजेसेच होते. दिसायला साधेच; परंतु आटोपशीर व त्याची रचना अत्यंत सुंदर पद्धतीने केलेली होती. सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या अहिल्यामातेचे राहणीमानदेखील सर्वसामान्यच होते. त्यात अजिबात भपकेबाजपणा नव्हता. हवं तर त्याप्रमाणे त्या राहू शकत होत्या. इतर राजामहाराजांप्रमाणे मोठा राजवाडा बांधू शकत होत्या; परंतु अहोरात्र त्या सामान्य प्रजाजनांचीच काळजी घेत होत्या. त्यांना राजवाडा वा इतर कशाचीदेखील अपेक्षा नव्हती. त्यांना हवी होती फक्त सुखी-समाधानी रयत. शृंगार, भोगविलास यासारखे शब्द तर त्यांच्या घराच्या प्रांगणातदेखील प्रवेश करू शकत नव्हते.

अहिल्यामातेचे जीवन हे अत्यंत साधे, सरळ आणि स्फूर्तिस्थान देणारे, मार्गदर्शक जीवन होते. त्यांच्या जीवनचरित्रामुळे मनुष्याच्या जीवनास योग्य दिशा मिळते. त्यांचे जीवन म्हणजे सात्त्विक जीवन होते. धार्मिकता, कर्तव्यदक्षता आणि प्रजाहित या बाबींना त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व होते.

अहिल्यामातेने महेश्वरला एका संपन्न वैभवशाली होळकर राज्याच्या राजधानीचा दर्जा देऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आणि स्वत:च्या जीवनाप्रमाणे महेश्वराचे नाव हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अजरामर केले.

अंतर्गत बंडाचा बीमोड

मालेरावांच्या मृत्यूने अहिल्यामाता पुत्रशोकात बुडाल्या होत्या. आता राज्यकारभाराची संपूर्ण धुरा त्यांच्यावरच येऊन पडली होती. त्यांना एक मुलगी मुक्ताबाई होती; परंतु हिंदूधर्मशास्त्राप्रमाणे त्या मुक्ताबाईला राजगादीवर बसवू शकत नव्हत्या. अहिल्यामाता स्वत: धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्या धर्म व नीती याला अनुसरूनच सर्व कार्य करत होत्या. मालेरावाला मूलबाळ नव्हते. त्यामुळे होळकरशाहीतील काही लोकांना असे वाटायचे की, अहिल्यामातेने त्यांच्यातील एखाद्या मुलाला दत्तक घेऊन होळकरशाहीचे सर्वाधिकार त्याच्याकडे सोपवावेत. यासाठी त्या चांडाळचौकडींनी होळकर राज्य गिळंकृत करून अहिल्यामातेची तेथून उचलबांगडी करण्याची योजना आखली. या योजनेनुसार राघोबादादा पेशवे आणि गंगाधर यशवंत चंद्रचूड हे दोघे प्रमुख सूत्रधार होते. हे दोघेही होळकरशाहीतील पूर्वीचे इमानदार; परंतु नंतर बेइमान झालेली कावेबाज माणसे होती.

अहिल्यामाता या अबला आहेत आणि ही सुवर्णसंधी आपण सोडायची नाही, असे दोघांनी पक्के ठरवले. कारण यावेळेस अहिल्यामाता पुत्रशोकात बुडालेल्या आहेत आणि आपण ठरवू तीच पूर्व दिशा होईल असे राघोबाला वाटत होते. त्यादृष्टीने कटकारस्थान करण्यास त्यांनी सुरुवात केली.

राघोबाने मोठे सैन्य बरोबर घेऊन होळकरराज्याचे स्वामी बनल्याचे दिवास्वप्न पाहत पुण्याहून इंदौरकडे कूच केली. इकडे होळकर राज्यातील संपूर्ण प्रजाजनांना अहिल्यामाताच होळकर राज्याच्या स्वामिनी हव्या होत्या. त्यांनीच राज्यकारभार चालवावा अशी त्यांची मनेच्छा होती कारण अहिल्यामाता किती उत्तम प्रशासनकर्त्या होत्या याची त्यांना प्रचीती आली होती. म्हणूनच प्रजा त्यांच्या आधिपत्याखाली राहण्यास आतुर होती. एवढेच नव्हे तर अहिल्यामातेच्या विरोधात राहणारांशी लढून प्राण अर्पण करण्याइतपत त्यांची तयारी होती.

अहिल्यामातेला या चांडाळचौकडीच्या कटकारस्थानाचा सुगावा लागताच त्यांनी आपल्या नयन श्चक्षूंची आसवे पुसली. त्यांचा क्रोधाग्नी उफाळून आला. येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाऊन त्यांच्याशी टक्कर देण्यास त्या सज्ज झाल्या. त्यांनी ताबडतोब होळकर राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे जाहीर केले. यामुळे प्रजाजनांनाही अतिशय आनंद झाला.

अहिल्यामातेने सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. तुकोजीरावांना बोलावून घेतले. दाभाडे, भोसले, गायकवाड आणि इतर सामर्थ्यवान मंडळीस मदतीस येण्याचा संदेश पाठवला. त्या सर्वांनी अहिल्यामातेस सक्रिय मदत करण्याचे वचन दिले. मातेने पेशव्यांनादेखील मदतीचा निरोप पाठवला. महादजी शिंदेंनीदेखील राघोबाला सहकार्य करण्यास नकार दिला. अशा प्रकारे अहिल्यामातेने बाहेरील सर्व व्यूहरचना बरोबर करून आपलीही लष्करी आणि इतर कडेकोट रचना केली.

तुकोजीरावांच्या आधिपत्याखालील होळकरांची संपूर्ण फौज लढाईस सज्ज झाली. याचबरोबर अहिल्यामातेने आपल्या नेतृत्वाखाली स्त्रियांची फौज तयार केली. त्यांचा कर्मठपणा आणि अविश्रांत परिश्रम पाहून प्रजा आणि सैन्यात अपूर्व उत्साह संचारला. तिकडे भोसले, गायकवाड आणि मोहनराजच्या सैन्याचे तळच येऊ पडले होते. इकडे होळकरांची फौज शस्त्रसज्ज झाली होती.

तिकडे राघोबा आणि चंद्रचूड होळकर राज्याचे स्वामी होण्याचे दिवास्वप्न पाहत 50 हजार फौजेनिशी उज्जैनपर्यंत पोहोचले. ताबडतोब मातेने तुकोजीरावांना फौजफाटा घेऊन उज्जैनला रवाना केले. रातोरात तुकोजीराव उज्जैनला रवाना झाले. पहाटेच्या सुमारास राघोबाचे सैन्य क्षिप्रेच्या तीरावर आल्याचे पाहून तुकोजीरावांनी राघोबांना निरोप पाठवला. ‘क्षिप्रा ओलांडताच आमची तलवार तुमच्या तलवारीला भिडेल.’ हा निरोप पोहोचताच राघोबा थोडा विचारात पडला. त्याचवेळेस अहिल्यामातेने पाठवलेले पत्र राघोबांच्या हातात पडले. ते पत्र वाचून तर त्यांचा उत्साह पारच मावळला. त्याचबरोबर त्यांच्या स्वप्नांचा अस्त झाला.

हे पत्र म्हणजे अहिल्यामातेची अद्‌भुत प्रतिभा, चातुर्य, मुत्सद्दीपणा याचा उत्कृष्ट नमुनाच आहे.

या पत्रात अहिल्यामातेने लिहिले होते, ‘‘माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण आला आहात; परंतु आपली ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आपण मला अबला समजला आहात; परंतु मी कोणत्या प्रकारची अबला आहे हे आपल्याला रणांगणावरच कळेल. लवकरच आपली भेट रणांगणावरच होईल. माझ्या आधिपत्याखाली मी तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी समर करेल. मी हरले तर मला कोणीही हसणार नाही; परंतु आपण हरला तर आपल्याला तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही. शिवाय एका अबलेवर आक्रमण केल्यामुळे आपल्याला जो कलंक लागेल तो कधीही पुसला जाणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून लढाईची वेळच न आणाल तर बरे. कारण त्यात आपलेच हित आहे.’’

मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकवणारा राघोबा हे पत्र वाचून चारीमुंड्या चीत झाला. त्याच्या सैन्यापेक्षा कितीतरी मोठी फौज पुढे लढाई करण्यास सज्ज होती. शेवटी अहिल्यामातेपुढे हार मानावी लागली. अहिल्यामातेने आपल्या बुद्धिचातुर्याने आणि मुत्सद्दीपणाने त्यांचे बंड उखडून टाकले. राघोबाचा कुटिल डाव उधळून लावला.

पाच मृत्यूंची मालिका

अहिल्यामातेवर संकटामागून संकटे येत होती. प्रत्येक संकटावर त्या यशस्वी मात करत होत्या. त्याचबरोबर दुःखाचे प्रचंड डोंगर त्यांच्यावर कोसळत होते. प्रत्येक वेळेस त्यांची कर्म-धर्म प्रवृत्ती जागृत होत होती आणि दुःखे विसरून एका महान कर्मयोगिनीचे जीवन त्या जगत होत्या. इ.स. 1754 पासून खंडेरावांच्या मृत्यूनंतर आप्तेष्टांच्या मृत्यूची अखंड मालिकाच त्यांच्यामागे सुरू होती. त्यानंतर सासरे मल्हारराव इ.स. 1766 मध्ये निवर्तले. त्यांच्या दुःखाचे प्रचड डोंगर एकामागून एक कोसळत होते. त्या शोकाच्या अथांग महासागरात बुडत होत्या. दुःखमय अंधारातून यशस्वी मार्गक्रमण करत होत्या. त्यांना दुःखाने ओथंबून वाहणारे जीवन जगणे असह्य झाले होते; परंतु त्या सदसद्‌विवेकबुद्धी जागृत ठेवून रयतेच्या कल्याणास्तव हाती घेतलेला वसा पुढे चालू ठेवत होत्या. एका महान तपस्वीचे जीवन त्या जगल्या. म्हणूनच त्या एक महान तेजस्वी कर्मयोगिनी बनल्या.

मुक्ताबाई ही अहिल्यामातेची एकुलती एक लाडकी कन्या होती. मुक्ताबाईला एक मुलगा होता. त्याचे नाव होते नत्थू. नत्थू हा त्याच्या आजीचा लाडका नातू होता. अहिल्यामाता त्याला नेहमी त्यांच्याजवळच ठेवीत. अतिशय लाडाकोडात त्याला वाढवले होते. होळकरांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून निर्माण झालेल्या होळकरशाहीचा वारसदार नत्थूच असावा, अशी अहिल्यामातेची मनेच्छा होती; परंतु नियतीला हे मान्य नव्हते.

खंडेरावांच्या मृत्यूनंतर सुरू झालेली मृत्यूची मालिका अजूनपावेतो संपलेली नव्हती. एके दिवशी नत्थू अचानक आजारी पडला. अहिल्यामातेने आपल्या लाडक्या नातवाची आजारातून मुक्तता होण्यासाठी देशोदेशीचे नामांकित वैद्य बोलावले. जेवढे करता येतील ते सर्व उपचार केले. नत्थूला क्षयाचा आजार जडला होता. अहिल्यामातेने नत्थूचा आजार बरा होण्यासाठी अनेक नवस केले. पूजाअर्चा केली. हजारो रुपयांचा दानधर्म केला; परंतु ते सर्व व्यर्थ गेले. त्याचा काहीदेखील उपयोग झाला नाही. नत्थूची क्षयातून सुटका झाली नाही आणि शेवटी 15 डिसेंबर 1787 रोजी अहिल्यामातेचा लाडका नातू नत्थू काळाच्या अधीन झाला.

आपल्या मुलाच्या मृत्यूचा सर्वांत अधिक प्रभाव त्याच्या मातापित्यावर पडतो. नत्थूच्या मृत्यूमुळे दुःखाच्या प्रलयकारी शोकसागरात बुडालेले नत्थुचे माता-पिता शेवटपर्यंत वर निघू शकले नाहीत. एकुलत्या एक नत्थूच्या मृत्यूने पिता यशवंतराव खचून गेले. अतिशय आर्त स्वरात ते आक्रोश करीत हाते. हृदय हेलावणारा शोक करून नत्थूशी बोलत होते, ‘‘बेटा, तू कोठे आहेस? बोलत का नाहीस? काय तुला आपल्या मातापित्यावर जे तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाहीत, त्यांची जरादेखील दया येत नाही? काय तू खरोखर इतका कठोर हृदयाचा झाला आहेस, आमचा आर्त अतिविकल आक्रोश ऐकून एकदासुद्धा बोलू शकत नाहीस? हे प्राणप्रिय पुत्रा, ऊठ, कमीतकमी एक क्षणभर तरी या दुःखाने पीडित अंत:करणाला शांत कर! आम्ही शोकाने अर्धमेले होत आहोत, जरा विचार कर !’’

‘‘तू हसत होता, बोलत होता, रुसत होता, आमची सेवा करीत होता. तुझ्या या वागण्याने आम्ही प्रसन्न होत होतो. संसारातील दुःखे काही क्षण विसरत होतो. आता आम्ही कोणाचे तोंड पाहून जगावे? तू तर आमच्या कमरेवर वज्राघात केलास. त्यातून उठणे कठीण आहे.’’

यशवंतराव शोक करीत होते. हुंदके देत होते. माता मुक्ताबाईदेखील शोकाकुल झाली होती. शब्द फुटत नव्हते. शोकाने विव्हळ झालेल्या अवस्थेत त्या म्हणत होत्या, ‘‘हे पुत्र! तू या कुलाचा दीप होतास, दुःखाच्या समयी मी तुझ्याकडे पाहून दु:ख विसरत होते. लहान असतानाचे तुझे ते हसणे, बोबडे बोलणे, तुझे खेळ, खिंदळणे, पळत येऊन मांडीवर बसणे हे सर्व आठवून माझ्या हृदयाचे तुकडे होत आहेत.’’

हे पुत्रा! तुझ्या वियोगाने तुझ्या आईची काय अवस्था झाली आहे? कोण तिला शांत करील? कोणाकडे पाहून जगेल? माझ्या प्रिय मुला, तुला पाहून आमच्या हृदयात प्रेमाचे भरते येत आहे. आज तू कोठे निघून गेला आहेस? जरा तरी बोल. इतका कठोर होऊन दु:खाच्या या अथांग सागरात आम्हाला बुडवू नकोस. आमचा हा करुण आक्रोश ऐकून तुझ्या अंत:करणाला जरादेखील पाझर फुटत नाही? माझ्याकडे पाहा, आपल्या आजीची आठवण कर. आमच्या सर्वांचे जीवन तुझ्याच हातात आहे!’’ अशा प्रकारचा आक्रोश चालू होता. अहिल्यामातादेखील अतिशय दुःखी झाल्या होत्या. सगळेच शोकाकुल झाले होते. कोणाला काही सुचत नव्हते. संपूर्ण जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता. अशा संपूर्ण शोकमय वातावरणात नत्थूवर उत्तरक्रिया करण्यात आली. नत्थूच्याबरोबर त्याच्या दोन बायकादेखील सती गेल्या.

नत्थूच्या निधनाने खचून गेलेले यशवंतराव स्वत:ला सावरू शकले नाहीत. कायमस्वरूपी दु:खी राहण्याने त्यांचे अन्नपाणी तुटले. त्यांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. एके काळी संपूर्ण होळकर राज्यातून चोर-दरोडेखोरांचे समूळ उच्चाटन करणारा तो महापराक्रमी वीरपुरुष मुलाच्या निधनाने पार खचून गेला होता. शेवटी दुःख पेलणे त्यांना कठीण झाले आणि दुःखातिरेकाने ते आजारी पडले. ते पुन्हा बरे झालेच नाहीत. शेवटी 3 डिसेंबर 1771 रोजी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. मुक्ताबाईचे सौभाग्य काळाने हिरावून नेले.

आता तर दुःखाच्या असह्य वेदना पेलणे सर्वांनाच अशक्य झाले. अहिल्यामातेच्या नेत्रांतून अश्रुधारा अखंड वाहत होत्या. स्वत:च्या मुलीला आपल्यासमोर आलेले वैधव्य पाहण्यापेक्षा आईच्या नशिबी वाईट क्षण तो दुसरा कोणता असणार? त्या पाषाणाला पाझर फुटेल अशा आर्त स्वरात हृदय हेलावून सोडणारा आक्रोश करत होत्या. त्यातच मुक्ताबाईने सती जाण्याची तयारी सुरू केली. अहिल्यामातेला हे कळताच त्यांना संपूर्ण जगच संपल्यासारखे झाले. चोहोबाजूला अंधार होता. या अंधारात सर्वच आप्तस्वकीय गडप झाले होते आणि आता मुक्ता, जी अहिल्यामातेचा म्हातारपणीचा आधार होती, तीदेखील या काळरूपी अंधारात नाहीशी होणार होती.

अहिल्यामाता मुत्तेला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये मुत्तेला सती जाऊ नको म्हणून विनवीत होत्या; परंतु मुक्ताबाईबर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. यातच यशवंतरावांच्या अंत्ययात्रेची तयारी पूर्ण झाली. अंत्ययात्रेमध्ये राज्याने अधिकारी, सरदारमंडळी, नोकर-चाकर व प्रजा यांचा अथांग जनसमुदाय सामील झाला होता. संपूर्ण वातावरण दुःखमय झाले होते. अखेर महेश्वरच्या नर्मदातीरावर प्रेत ठेवण्यात आले. नर्मदातीरावर चिता रचण्यात आली. प्रथम यशवंतरावांचे प्रेत चितेवर ठेवण्यात आले.

नंतर मुक्ताबाई शून्यावस्थेत चितेवर बसली. मंत्रघोष चालू झाला. चितेला अग्नी लावण्यात आला. थोड्याच वेळात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि पाहता-पाहता आगीच्या भयानक ज्वालांनी ते दोन मानवी देह भस्मसात केले.

अहिल्याबाई होळकर यांच्या कारकीर्दीमधील युद्धे

अहिल्यामातेच्या कारकीर्दीमध्ये फारच थोडे युद्धाचे प्रसंग आले. अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीच्या ठायी हा गुण प्रामुख्याने दिसून येतो. छोट्या- छोट्या कारणास्तव त्यांनी कधीच युद्ध केले नाही. कारण त्यांना युद्धामुळे होणाऱ्या नाशाची आणि अपरिमित नुकसानीची कल्पना होती. त्याचबरोबर जनतेलाही युद्धाचा त्रास भोगावा लागतो. अहिल्यामातेजवळ जी शक्ती आणि सामर्थ्य होते त्याचा सदुपयोग त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी करून युद्धामुळे होणारा अपव्यय टाळला. याचा अर्थ असा होत नाही की, त्यांच्या अंगी शूरत्व नव्हते. ज्या लोकांनी होळकर राज्यात उच्छाद मांडला आणि जनतेला त्रस्त केले, अशा लोकांबरोबर अहिल्यामातेने युद्ध केले, तेदेखील उचित न्याय मिळवण्यासाठी. यामधून अहिल्यामातेचे वीरत्व सहज स्पष्ट होते.

1) जयपुराधीशांकडून करांचे काही रुपये घ्यावयाचे बाकी होते. तुकोजीरावांनी हे पैसे मिळण्यासंदर्भात पत्ररूपाने त्यांना कळवले; परंतु जयपुराधीशांचा मंत्री दौलतरामने उलट उत्तर पाठवले. त्यात त्याने असे लिहिले की, ‘‘आम्ही होळकर आणि सिंधी दोहोंचेदेखील ऋणी आहोत. आमच्याजवळ तुम्हाला देण्याइतपत पैसा नाही. तेव्हा ज्याच्यात हिंमत असेल त्याने अगोदर आमच्याकडून पैसा घ्यावा.’’ या पत्राच्या उत्तरादाखल तुकोजीरावांनी काही वीर सैनिक बरोबर घेतले आणि जयपुराधीशांवर आक्रमण करण्यासाठी निघाले; परंतु मार्गामध्ये सिंधिया जिऊबा दादाने त्यांच्यावर आक्रमण केले. तुकोजीराव मध्येच जयपूरपासून 22 कोसावर असणाऱ्या ब्राह्मणगावच्या किल्ल्यावर थांबले.

महेश्वरास वास्तव्यास असणाऱ्या अहिल्यामातेस ही हकिगत समजली. एका स्वाभिमानी वीरास हा अपमान कदापिही सहन होणे शक्य नव्हते. हा समाचार ऐकून मातेची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचा क्रोधाग्नी उफाळला. त्यांनी ताबडतोब 1800 सैनिक तुकोजीरावांच्या मदतीस पाठवून दिले आणि सांगितले की, ‘‘या गर्विष्ठांचा गर्वहरण करा. माझी स्वत:ची मदत लागली तरी कळवा, मी स्वत: युद्धभूमीवर येऊन लढेन.’’
सैन्य पोहोचताच तुकोजीरावांनी युद्धास प्रारंभ करून विजयश्री खेचून आणली.

2) राजपुतान्यातील उत्पन्न फारच कमी असल्यामुळे तिथे सैनिक ठेवणे कठीण होते. त्याचबरोबर हे स्थळ इंदौरपासून फारच दूर होते. त्यामुळे तुकोजीरावांनी आपली सेना राजपुतान्यातून दुसरीकडे नेली. जेव्हा हे राजपुतांना समजले की, होळकरांचे सैनिक राजपुतान्यातून परतत आहे. तेव्हा त्यांचा असा गैरसमज झाला की, होळकर आपल्याला घाबरत आहेत. अशातच त्यांनी इ. स. 1788 मध्ये मेवाड आणि मारवाडच्या सीमेवर वाहणाऱ्या टिकरीया नदीच्या तीरावर वसलेल्या चहूर गावावर हल्ला केला. त्याचबरोबर काही राजपुतांनी निम्बाहेडावरदेखील चढाई केली. जेव्हा अहिल्यामातेला हे समजले तेव्हा त्यांनी आपले सैन्य राजपुतान्यामध्ये पाठवून दिले. उभयतांची भेट मंदसौर येथे झाली. घनघोर युद्ध झाले. कित्येक यमसदनी गेले. कित्येक जखमी झाले. कित्येकांची मुंडकी धडावेगळी अलग झालेली पाहून राजपूत घाबरून गेले. त्यांनी पराभव स्वीकार केला.

चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त तो काळ अत्यंत अंदाधुंदीचा होता. सर्वत्र अराजकता बोकाळली होती. कोणी कोणाचा विचार करायला तयार नव्हता. ‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येकाजवळ स्वार्थी प्रवृत्तीचा प्रभाव दिसत होता. सगळीकडे चोऱ्या, लुटालूट चालू होती. चोर-दरोडेखोरांचे स्तोम माजले होते. व्यापारी, धनिक, यात्रेकरू, शेतकरी आणि सर्वसामान्य रयत चोरांच्या जाचाला कंटाळली होती. सगळीकडे अशांतता नांदत होती. जनसामान्यांचे जीवन असुरक्षित झाले होते. सुरक्षिततेचा अभाव होता आणि दिसत होती फक्त लुटालूट!

होळकर राज्यातील नेमाडमध्ये तर भिल्लांनी जनतेला सळो की पळो करून सोडले होते. चोऱ्या करणे, डाके घालणे, प्रवाशांना लुटणे, असे सत्र चालू होते. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, त्यांनी ‘भिलकवडी’ नावाचा कर सुरू केला होता. यात्रेकरू, प्रवासी, व्यापारी या सर्वांनाच हा कर लागू होता. चोर-दरोडेखोरांच्या अशा प्रकारच्या गैरकानुनी कुकर्मास जणू उधाण आले होते.

अहिल्यामाता सर्वांच्या आई होत्या. उदार अंतःकरणाच्या प्रेमळ मातेचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. प्रजा हेच त्यांचे सर्वस्व होते. सर्वांचे कल्याण व्हावे हीच त्यांची मनेच्छा होती. त्यासाठी लाभधारक कोणत्या जातीचा आहे अथवा जमातीचा आहे, हे त्या पाहत नसत. प्रजेची सुरक्षितता हीच त्यांची सुरक्षितता होती. त्यामुळे प्रजेची सुरक्षा करण्यासाठी त्या केव्हाही तत्पर राहत असत.

नेमाड व विंध्याचलच्या आसपास भिल्लांनी उच्छाद मांडला होता. भिल्लांनी मांडलेल्या या उच्छादाची वार्ता अहिल्यामातेला समजली. मातेने भिल्लांच्या नायकास बोलावून त्याला अत्यंत ममतेने समजावून सांगितले आणि वाईट कार्यापासून परावृत्त करून सन्मार्गी लावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु अहिल्यामातेने अत्यंत प्रेमाने केलेल्या या उपदेशाने भिल्लांवर काहीदेखील इष्ट परिणाम झाला नाही. उलट त्यांनी आपल्या चोऱ्या आणि लूटमारीचे सत्र चालूच ठेवले. तेव्हा मात्र अहिल्यामातेने रुद्रावतार धारण केला. त्यांनी ताबडतोब भिल्ल आणि त्यांच्या म्होरक्याला पकडून आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्या भिल्लांना कडक शिक्षा ठोठावल्या; परंतु आईचा राग तो क्षणभंगूरच असणार! त्यांनी नंतर त्या भिल्लांना जमिनी व कामधंदे देऊन त्यांचे जीवन सन्मार्गी लावले. कुकर्म करण्यापासून परावृत्त करून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली. अहिल्यामातेचे कर्तृत्व पाहून भिल्लांना त्यांच्या कार्याची अतिशय लज्जा वाटली. शरमेने त्यांनी माना खाली घातल्या. नंतर अहिल्यामातेचे आशीर्वाद संपादन करून त्यांनी आपल्या आदर्श जीवनास प्रारंभ केला.

अहिल्यामातेच्या जीवनामध्ये अष्टपैलुत्व प्रतिबिंबित होते. आदर्श राज्यकर्त्याच्या ठिकाणी हवे असणारे सर्व गुण त्यांच्या अंगी होते. त्या धर्मपरायण, प्रेमळ होत्याच, त्याचबरोबर उत्कृष्ट राजनीतिज्ञ होत्या. त्यांनी आपल्या सत्कार्याने आणि अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर करून प्रजेचे शत्रू असणाऱ्या भिल्लांना प्रजेचे मित्र बनवून सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित आणि सुखकर केले.

आता सगळीकडे जनजीवन सुरळीत चालू होते. राज्यात सुख आणि शांतता नांदत होती; परंतु मध्येच विंध्याचलच्या भिल्लांनी बंडाचा झेंडा उभारला आणि प्रजेचा छळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा अहिल्यामातेला ही बातमी समजली, तेव्हा त्यांनी क्षणाचादेखील विलंब न करता त्या भिल्लांच्या नायकास एक पत्र लिहिले. त्यातील मजकूर असा आहे – ‘‘ज्या राज्यामध्ये प्रजेच्या अधिकाराची अवहेलना होते. त्या राज्यात अशांती नांदत असते. जर राजा स्वार्थाच्या अधीन होऊन मनमानी करत असेल. राज्याच्या कोषभांडारास स्वत:चा समजून जर मनमानी करत असेल, तर त्याच्यावर चिडणे स्वाभाविक आहे. मी तर माझ्या प्रजेला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुमच्यावरील संकटे दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे. मग या बंडामागचे कारण तरी काय?’’

जो राजा प्रजेकडे दुर्लक्ष करून प्रजेवर अन्याय, अत्याचार करतो, प्रजेवर जुलूम करून स्वत: चैनीत राहतो आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यातच मग्न असतो आणि स्वार्थालाच सर्वस्व समजतो, त्याच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रत्येक नागरिकास हक्क आहे; परंतु माझ्या राज्यामध्ये कधीच असे झाले नाही.

आपण लोक बंड का करता? हे काही मला समजत नाही. यातून काय सिद्ध होईल? जो राजा प्रजेच्या संरक्षणासाठी सदैव तयार आहे, त्याच्याबरोबर असे वर्तन अनुचित आहे? आपण माझ्याकडे या आणि आपणास काय पाहिजे ते सांगा. मी वचन देते की, ‘‘मी आपणास अवश्य मदत करीन. मी माझ्या मंत्र्याला पाठवत आहे. ते आपली मदत करतील.’’

मनुष्याच्या योग्यतेची परीक्षा त्याच्या कठीण प्रसंगातच येत असते. त्यासाठी त्याला सर्वस्व पणास लावून योग्य दिशा निवडावी लागते. अशा वेळेस त्याच्या बुद्धिमत्तेची खरी कसोटी असते. अहिल्यामातेजवळ सर्वकाही होते. मनात आणले असते तर, त्या भिल्लांचा समूळ नायनाट करू शकत होत्या; परंतु त्यांनी तसे काहीएक न करता भिल्लांशी स्वत:च्या मुलाप्रमाणे व्यवहार ठेवला. कारण त्या सर्वांच्या आई होत्या. आईचे अंतःकरण पृथ्वीपेक्षाही विशाल असते. त्यामध्ये सर्व सृष्टी सामावते. त्यांच्या प्रेमपूर्ण व्यवहाराने त्यांनी भिल्लांना वशीभूत केले.

अहिल्यामाता खरोखरच मुत्सद्दी, महापराक्रमी आणि प्रजाहितदक्ष होत्या. भिल्लांना त्यांनी अहिंसेने आणि प्रेमाने कोणत्याही प्रकारचा रक्तपात न करता जिंकले होते. आपल्या मातृत्वपूर्ण व्यवहाराने त्या सर्वांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाल्या होत्या. त्या काळामध्ये इतर राज्यात अशांती आणि अराजकतेने हाहाकार माजला होता, त्याचवेळेस होळकर राज्यातील प्रजा मात्र सुख, शांती आणि समाधान यांचा आस्वाद घेत होती.

अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यातील शेतीव्यवस्था व करव्यवस्था

संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पूर्वीपासूनच शेती हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. जर देशाची प्रगती करावयाची असेल तर शेतकऱ्याला, त्याच्या शेतीला प्राधान्य द्यावयास पाहिजे. म्हणूनच अहिल्यामाता राजगादीवर विराजमान होताच सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्याला, त्याचबरोबर पूर्ण प्रजेला जाचक असणारे कर, कायदे आणि नियम मोडीत काढून त्या ठिकाणी प्रजेच्या हिताचे कायदे आणि नियम अमलात आणले आणि राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.

इ.स. च्या 18 व्या शतकामध्येच अहिल्यामातेने होळकर राज्यामध्ये पंचायतराज स्थापन केले होते. यानुसार त्यांनी आपल्या राज्याचे जिल्हा, तालुका असे भाग पाडले. खेड्यामध्ये ग्रामपंचायती स्थापन केल्या आणि प्रत्येक विभागामध्ये योग्यताधारक अधिकारीवर्गाची नेमणूक केली. ग्रामपंचायतींना त्यांनी अनेक अधिकार प्रदान करून त्यांचे मान व महत्त्व वाढवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे कामकाज नि:पक्षपातीपणे आणि नि:स्वार्थीपणे होत असे.

संपूर्ण प्रजेचे जीवन हे शेतीवरच अवलंबून आहे आणि राज्याचा विकास करावयाचा असेल तर, सर्वप्रथम शेतकरी प्रगतिपथावर ठेवणे गरजेचे आहे हे त्या जाणून होत्या. म्हणून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच अहिल्यामातेने त्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीकडे विशेष लक्ष पुरविले. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना त्यांनी अमलात आणून त्या यशस्वीपणे राबवल्या. शेतकऱ्याला वेळोवेळी लागणारी मदत, त्यांच्या समस्या, अडीअडचणी याकडे अहिल्यामाता विशेष लक्ष देत असत. त्याचबरोबर शेतकऱ्याला कोणत्याही सुख-सोयीपासून वंचित राहू देत नसत. शेतीची उत्तरोत्तर प्रगती होऊन शेतकरी सधन व सुखी व्हावा अशी त्यांची मनेच्छा होती. त्यासाठी त्यांनी शेतीचा कस वाढवून त्यापासून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. जर एखाद्या वर्षी दुष्काळ अथवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर त्या शेतसारा माफ करून त्याला लागणारी आवश्यक ती मदत पुरवत असत.

अहिल्यामातेच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला पूर्णत: स्वातंत्र्य होते. त्याचबरोबर सरदार अथवा नोकरवर्गावर अंकुश होता. त्यामुळे सरदार अथवा नोकरवर्गापासून होणाऱ्या त्रासापासून शेतकरी व संपूर्ण प्रजा सुरक्षित होती. शेतकऱ्यांवर कराचा अथवा इतर कोणताच फारसा बोजा नव्हता. शेतीपासून भरघोस उत्पन्न मिळत होते. अन्नपाण्याची टंचाई भासत नसे. जीवनावश्यक वस्तूदेखील स्वस्त दरात मिळत. त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता.

अहिल्यामातेने शेतकऱ्यांबरोबर व्यापारउदीमदेखील वाढवण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. वस्त्रोद्योगास त्यांनी प्राधान्य दिले. होळकर राज्याला महेश्वरसारखी उत्कृष्ट बाजारपेठ लाभली होती. त्याचबरोबर करही इतर राज्यांच्या तुलनेत कमी होते. व्यापारासाठी आवश्यक असणारे वातावरण अनुकूल होते. राज्यात सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्था नांदत होती. अशाप्रकारे व्यापारासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी अनुकूल असल्यामुळे होळकरराज्यात व्यापारउदीम भरभराटीस येत होता.

अधिकारी आणि नोकरवर्गावर अहिल्यामातेचा वचक असल्यामुळे करवसुली करताना व्यापाऱ्यांकडून जास्त प्रमाणात कर वसूल करण्यास कोणीही धजत नसे. जर कोणी तो प्रयत्न केला तर तो होणाऱ्या शिक्षेस पात्र ठरत असे. कराचे प्रमाण कमी असल्यामुळे अतिसामान्य मनुष्यालादेखील कर सरकारी तिजोरीत जमा करण्यास दिक्कत वाटत नसे व लोक स्वत:हून कराचे पैसे सरकारी खजिन्यात जमा करीत असत. त्यामुळे साहजिकच राज्याचा विकास घडून येत होता.

अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यातील अर्थव्यवस्था

अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्मास येणारा मेंढपाळ मल्हार आपल्या असामान्य कर्तृत्वावर पेशव्यांचा महापराक्रमी सरदार बनला आणि अल्पावधीतच पेशव्यांचे स्वामिनिष्ठ सरदार बनले. मल्हाररावांच्या असामान्य कर्तृत्वावर आणि स्वामिनिष्ठतेवर खूश होऊन पेशवे सरकारने त्यांना जवळजवळ तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची जहागिरी विनाशर्त देऊ केली.

संपूर्ण देशामध्ये स्वत:च्या नावाचा वचक बसवणाऱ्या महापराक्रमी मल्हाररावांनी पेशव्याने दिलेल्या जहागीरदारीचे चीज करून त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती केली. अहिल्यामातेच्या कारकीर्दीपर्यंत हे उत्पन्न जवळजवळ 15 लाखांच्या आसपास नेले. या जहागिरीमधून मिळणारे उत्पन्न खाजगी स्वरूपाचे असल्यामुळे त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणालाही काहीएक अधिकार नव्हता.

पेशव्यांनी दिलेली जहागिरी आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यामध्ये हळूहळू कासवगतीने वृद्धी होत होती. थोड्याच कालावधीमध्ये त्याचा फळाफुलास आलेला वटवृक्ष बनला. बालपणापासून कष्टाळू वृत्तीच्या मल्हाररावांच्या अथक आणि नेकीने केलेल्या परिश्रमाचे हे श्रेय होते. मल्हाररावांच्या जीवनाच्या अंतिम समयी या कोषभांडारामध्ये जवळजवळ 16 कोटी रुपये जमा झाले होते.

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकर राज्याच्या राज्यकारभाराची सूत्रे अहिल्यामातेकडे आली. एका विशाल आणि वैभवशाली होळकर राज्याच्या त्या सर्वाधिकारी बनल्या. राज्याचा संपूर्ण खजिना त्यांच्या अधीन होता. त्याचा हवा तसा त्या उपभोग घेऊ शकत होत्या; परंतु त्यांनी तसे काहीएक केले नाही. कारण त्या प्रजाहितदक्ष, धार्मिक वृत्तीच्या महान तपस्विनी होत्या. त्या स्वत: शिवभक्त होत्या. त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच राज्याचे कोषभांडार शिवार्पण केले. अहिल्यामाता स्वत: नि:स्वार्थी आणि शुद्ध अंत:करणाच्या होत्या. त्यांचे राहणीमानदेखील सर्वसाधारणच होते. त्यांच्या खाजगी खजिन्यातून त्यांनी अनेक मंदिरे बांधली, तीर्थस्थानांच्या पवित्र भूमीत मोठमोठ्या देवालयांची उभारणी केली. जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट बांधले. पिण्याच्या पाण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था केली. पूर्ण देशभरात अनेक धर्मशाळा बांधल्या आणि या खाजगी कोषभांडारातून लोककल्याणकारी कामे करून त्याचा सर्वार्थाने सदुपयोग केला.

त्यांचे ज्याप्रमाणे खाजगी कोषभांडार होते त्याचप्रमाणे सरकारी कोषभांडारदेखील होते. त्याचा संबंध मात्र त्यांच्या सुभेदारीमुळे येणाऱ्या विविध करांशी आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाशी येत असे. अशा या सरकारी खजिन्याचा संबंध प्रत्यक्ष जनतेशी येत असल्यामुळे तो पैसा त्या प्रजेच्या कल्याणकारी कार्यातच खर्च करीत असत. अहिल्यामातेच्या कारकीर्दीमध्ये हे उत्पन्न जवळजवळ एक कोटी साडेपाच लाख रुपये होते.

सदैव जनतेच्या कल्याणासाठी काळजी वाहणाऱ्या अहिल्यामातेचे हे कोषभांडार अत्यंत न्याय आणि नियमांच्या आधारे मिळवलेले असे. इतर राजामहाराजांप्रमाणे जनतेची लयलूट अथवा पिळवणूक करून मिळवलेला नसे. ज्या काळामध्ये इतर राजेमहाराजे प्रजेवर मनमानी करून त्यांनी गाळलेल्या घामांच्या धारांतून मिळवलेल्या पैशांवर मौजमजा करत होते, आणि स्वत: वस्त्रालंकाराने मढून प्रजेला मात्र वस्त्रहीन करून अन्नपाण्यावाचून जीवन व्यतीत करण्यास भाग पाडत होते, त्याच काळामध्ये अहिल्यामातेची प्रजा मात्र होळकर राज्यामध्ये स्वर्गसुख अनुभवीत होती.

अहिल्यामाता सर्व कामे नियमबद्ध आणि जातीनिशी पार पाडत. त्यामध्ये कसल्याही प्रकारची कुचराई केली जात नव्हती अथवा स्वार्थाचा क्षणमात्र विचारदेखील केला जात नव्हता. त्या ज्याप्रमाणे प्रजेच्या माता होत्या त्याचप्रमाणे शिक्षादातादेखील होत्या. त्यांच्या संपूर्ण कामकाजाचे अलग-अलग नियम ठरवलेले होते. त्यांचे सरकारी आणि खाजगी कोषभांडार ज्याप्रमाणे अलग होते त्याचप्रमाणे त्याचा विनियोगदेखील अलग होता. त्याचा हिशेबदेखील काटेकोरपणे केला जात असे. अगदी बारीकसारीक गोष्टीदेखील त्यात नमूद केलेल्या असत. आवक आणि जावक याचा हिशेब न चुकता ठेवला जात असे. त्यांच्या परवानगीशिवाय एक पैसादेखील खर्च करण्याचा कोणालाच अधिकार नव्हता आणि एक पैसादेखील त्या स्वत:साठी खर्च करत नसत.

अहिल्यामातेची कारकीर्द म्हणजे सुख आणि शांतीने भरभराटीला आलेला काळ होता. संपूर्ण प्रजा सुखी-समाधानी होती. आपापसात संघर्ष अथवा कलह नव्हता. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शांती आणि सुरक्षितता होती. त्यांच्या कालखंडामध्ये निसर्गदेखील त्यांच्या कार्यावर खूश होता. कसल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती त्यांच्या राज्यावर कोसळली नाही. त्यामुळे प्रजादेखील सुखी होती. कोणत्याही प्रकारचे कर वगैरे वेळच्या वेळेवर ते सरकारी खजिन्यात जमा करत असत. अहिल्यामातेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखी व समृद्ध करत असत. त्यामुळे अहिल्यामातेच्या राज्यामध्ये प्रजेपासून राजापर्यंत सर्वत्र आनंदी आनंद होता.

बांधकामे आपली हिंदू संस्कृती ज्याप्रमाणे सर्वधर्मसमावेशक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माच्या प्रत्येक देवतेला तिच्यामध्ये समान स्थान आहे. अर्थातच हिंदू संस्कृतीमध्ये परमेश्वराला परमोच्च कोटीचे स्थान आहे. पूर्ण हिंदुस्थानमध्ये संपूर्ण जनतेच्या अंतःकरणामध्ये देवतेला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक देवालयामध्ये परमेश्वराच्या विविध रूपामधील मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आढळून येते. मंदिरे ही मनुष्याला वाईट मार्गाकडे जाण्यापासून परावृत्त करून इष्ट मार्ग दाखणारे महान पथदर्शक आहेत. अहिल्यामाता तर महान धर्मवृत्तीच्या होत्या. त्यांच्या जीवनामध्ये भगवंताला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांना प्रजेचे हित आणि कल्याणच हवे होते. त्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या.

अहिल्यामातेने होळकरशाहीच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली तो काळ अत्यंत अंदाधुंदीचा होता. सगळीकडे स्वार्थ बोकाळला होता. हिंदू राजे- महाराजे आपापसांत भांडत होती. मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदूंची देवालये, तीर्थस्थळे भ्रष्ट केली होती. कित्येक मूर्ती फोडल्या जात होत्या. मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. हिंदूंची महत्त्वाची धार्मिक स्थळे लोप पावत चालली होती. अशा विनाशकारी काळामध्ये अहिल्यामातेने राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि धर्मकार्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यांनी अनेक मंदिरे बांधली, जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तीर्थस्थळांचे पुनरुज्जीवन केले. अनेक घाट बांधले आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने जनसामान्यांचे पूर्ण जीवन सुरक्षित केले.

अहिल्यामातेने केलेली बांधकामे चिरकाल टिकणारी आणि अगणित आहेत. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये त्यांनी अनेक तीर्थस्थळांना नवजीवन दिले. अहिल्यामातेने फक्त मंदिरेच बांधली असे नाही, तर त्याचबरोबर अनेक धर्मशाळा बांधल्या. पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधले. जनावरांना तसेच प्रवाशांसाठी ठिकठिकाणी बारव खणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

अहिल्यामातेने एखाद्या मंदिराचे बांधकाम केले की, लगेच त्या मंदिराची कायमस्वरूपी व्यवस्था करत. मंदिराची साफसफाई व देखभाल करण्यासाठी एखादा पुजारी ठेवत असत. त्या पुजाऱ्याच्या उपजीविकेसाठी मंदिराच्या जवळपासची शेती त्याला देत असत. त्याचबरोबर पूजा-अर्चा, पोथी-पठण आदीसाठी विद्वान ब्राह्मणांची नेमणूक करत असत. त्यांनी बांधलेली मंदिरे भारतीय वास्तुकलेची महान उदाहरणे आहेत. मंदिरामधील मूर्तीदेखील उत्कृष्ट आणि कलाकुसरीने सुसज्ज आहेत.

अहिल्यामातेने मंदिरे, तीर्थस्थाने बांधून अनेक ठिकाणी अन्नछत्रे आणि सदावर्ते स्थापन केली. त्यामधून रंजलेगांजलेले, ब्राह्मण, अपंग, वृद्ध, भिकारी आदींना जेवण मिळत असे. सर्वसामान्यांना त्या सढळ हाताने मदत करत आणि आपल्या महान कार्याला साजेसे वर्तन ठेवत.

अतिशय बिकट समयी अहिल्यामातेने अनेक संकटांना सामोरे जात अतिशय अलौकिक आणि अतुलनीय कार्य केले. त्यामुळे त्यांची कारकीर्द इतिहासातील सोनेरी पान बनून कीर्ती दिगंतात पसरली.

अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यातील सैन्यव्यवस्था

अहिल्यामाता म्हटलं की आपल्यासमोर धर्मपरायण, परोपकारी, निःस्वार्थ आणि प्रजाहितदक्ष स्त्रीचे चित्र उभे राहते; परंतु त्या इतक्या समित नव्हत्या, तर महापराक्रमी, धीर, धुरंधर सेनानी आणि प्रत्यक्षात रणचंडिणी होत्या. त्यांनी मोठमोठे पराक्रम गाजवून देशाला अत्यंत बिकट परिस्थितीतून कित्येक वेळ वाचवले. त्या एक शूर लढवय्या व महान रणनीतिज्ञ स्त्री होत्या. त्या स्वत: धुरंधर सेनानी आणि राज्यकर्त्या असल्यामुळे राज्य चालविण्यासाठी सैन्याची असणारी आवश्यकता त्यांना माहिती होती. कधी आणि केव्हा देशावर कोणते संकट येऊन ठेपेल हे काही सांगता येत नाही. अशा बिकट समयी देशातील अंतर्गत सुरक्षितता व बाह्य आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी त्या सैन्य नेहमी शस्त्रास्त्राने सुसज्ज ठेवत. त्या जीवनभर जरी धार्मिक वृत्तीच्या असल्या तरी त्यांनी सैन्याला कधीच उपेक्षिले नाही. रणभूमीवर धुमश्चक्री गाजविण्यासाठी जेवढे रणकौशल्य आवश्यक असते ते सर्व युद्धविद्यानिपुण त्यांचे सैन्य होते.

अहिल्यामाता ज्याप्रमाणे आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी सैनिकांचा उपयोग करत, त्याप्रमाणे त्यादेखील सैनिकांच्या मरणोत्तर आणि अगोदर सैनिकांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी स्वत:वर घेत. जे सैनिक आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी झटत होते त्यांची अहिल्यामातेने कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ दिली नाही.

त्या सैनिकांच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू व त्यांच्या मूलभूत गरजा भागवत असत. सैनिकांचे पगार वेळेवर देत असत. रणभूमीवर लढण्यासाठी गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना त्या काहीच उणीव भासू देत नसत. या सर्व गोष्टीमुळे सैनिकांना लढण्यास हुरूप येत असे आणि शत्रूला धूळ चारल्याशिवाय ते परतत नसत.

महापराक्रमी आणि होळकर राज्याचे निर्माते मल्हारराव होळकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली अहिल्यामातेने आपले शिक्षण प्राप्त केले होते. मल्हाररावांच्या अंगी जे गुण आणि कौशल्य होते ते जसेच्या तसे अहिल्यामातेच्या ठायी दिसून येत होते. राजनीती, रणनीती आणि नेतृत्वक्षमता यामधील सूक्ष्म ज्ञानाचे त्यांनी अवलोकन केले होते. ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्या आदर्श राज्यकर्त्या झाल्या होत्या.

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्यामातेवर कित्येक वेळा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष युद्धाचे प्रसंग आले. त्यामध्ये राघोबाने बंड पुकारले; परंतु अहिल्यामातेने त्यांच्यावर बिनतोड मात केली. नंतर चंद्रावतांनी बंड पुकारून होळकर राज्यावर अंधाराचे सावट पसरवले होते. मातेने त्यांच्या बंडाचा पूर्णत: बीमोड केला. त्यानंतर मात्र अहिल्यामातेच्या पूर्ण कार्यकालामध्ये कोणीही त्यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला नाही किंवा त्यांच्या विरुद्ध उभे ठाकण्याची कोणीही हिंमत केली नाही. सगळीकडे शांतता आणि सुरक्षितता नांदत होती.

अहिल्यामाता खरोखर अत्यंत बुद्धिमान होत्या. कारण त्यांनी बऱ्याचशा लढाया काहीही हिंसा न करता केवळ अहिंसेने जिंकल्या. अहिल्यामातेला युद्धाचा तिटकारा होता. कारण युद्धामुळे जीवित व वित्तहानी फार मोठ्या प्रमाणावर होते; परंतु जर युद्ध करणे अपरिहार्यच असेल, तर त्या रणांगणावर रणचंडिणी बनून धुमश्चक्री गाजवत आणि विजयश्री खेचून घेत.

अहिल्यामातेचे आणि शेजारील राज्यांचे संबंध मित्रत्वाचे होते. त्या विनाकारण कधीही कोणालाही त्रास देत नसत. त्याचबरोबर इतरांना त्या कधीच कमी लेखत नसत. इतर राजेदेखील होळकर राज्यावर आक्रमण करत नसत. अहिल्यामातेची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वांना माहिती होती. त्यामुळे देशभरातील सर्व राजांच्या मनामध्ये अहिल्यामातेला आदराचे स्थान होते.

अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यातील न्यायव्यवस्था

अहिल्यामाता म्हणजे न्यायदेवतेचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये सदासर्वकाळ धर्मशील आणि प्रेमळ असणाऱ्या अहिल्यामाता न्याय देतेवेळेस मात्र कठोर बनत असत. त्या अत्यंत न्यायप्रिय आणि न्यायनिपुण होत्या. नि:पक्षपातीपणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता. न्यायदानाच्या वेळी त्या कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता समोरच्या व्यक्तीला योग्य तोच न्याय देत. कायद्यापुढे सर्व समानच आहेत आणि जो कायद्याचे उल्लं घन करतो तो शिक्षेस पात्र होतो, असे त्यांचे प्रांजळ मत होते.

अहिल्यामाता स्वत: न्यायप्रिय असल्यामुळे त्यांना अन्यायाची फार चीड होती. केव्हाही आणि कोणावरही होत असलेला कोणत्याही प्रकारचा अन्याय त्यांना कदापिही सहन होत नसे. जर एखादा अधिकारी वा इतर कोणी प्रजेवर अन्याय करत असेल, तर त्याला अहिल्यामातेच्या क्रोधापासून वाचवणे म्हणजे अशक्य बाब होती. होळकर राज्यामध्ये न्यायालयांची संख्या फारच कमी होती; परंतु अहिल्यामाता राजसत्तेवर आल्या आणि न्यायदानाचे महत्त्व समजून त्यांनी अनेक न्यायालये स्थापन केली. त्यांनी स्थापिलेली न्यायालये नियमबद्ध आणि त्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चालत असत. न्यायापासून कोणीदेखील वंचित राहू नये, अशी त्यांची मनेच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी गावोगावी पंचायती स्थापन केल्या. या पंचायतीमध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळींची नेमणूक करून न्यायदानाचे सर्व अधिकार त्यांना बहाल केले. यामुळे गावातील भांडणे गावातच मिटत. कधी कधी यासाठी अहिल्यामातेचे मार्गदर्शन लाभत असे. यामुळे संपूर्ण न्यायव्यवस्था सुरळीत चालू होती.

न्यायदानाचे हे सर्व कार्य चालू असताना जर एखाद्याला योग्य न्याय मिळाला नाही तर, किंवा त्याला दिल्या गेलेल्या न्यायामुळे त्याचे समाधान झाले नाही तर, ते अहिल्यामातेकडे येऊन त्यांची बाजू मांडत. अहिल्यामाता न्यायासनावर विराजमान होऊन वादी आणि प्रतिवादी दोहोंचेदेखील म्हणणे ऐकून घेत आणि त्यावर विचार करून योग्य असा न्याय देत. त्यांनी दिलेल्या न्यायामुळे वादी आणि प्रतिवादी या दोहोंनाही समाधान वाटत असे. अहिल्यामातेच्या अशा निःपक्षपाती प्रकारच्या न्यायामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा वाढतच गेली. अहिल्यामातेने दिलेला न्याय हा राजदरबारातील न्याय नसून तो परमेश्वराने दिलेला न्याय आहे आणि तो अमान्य करणे म्हणजे पाप आहे असे लोक समजत असत.

यामुळे लोक आपल्या खाजगी जीवनातील झगडेदेखील नि:संकोचपणे अहिल्यामातेला सांगत आणि त्यांच्याकडून उचित न्याय मिळवून घेत. कारण अहिल्यामातेच्या राज्यात एक पैसादेखील खर्च न करता न्याय मिळत असे आणि न्याय मिळविण्यासाठी जास्त काळ वाटही पाहावी लागत नसे. कारण अत्यंत साध्या, सोप्या, सरळ, विनाखर्चीक आणि निःस्वार्थीपणे न्यायदानाचे काम चालत असे.

अहिल्यामाता न्याय देण्याचे कार्य करतच; परंतु त्याचबरोबर न्याय्य व्यक्तीला आवश्यक असणारी मदत देऊन त्यांचा संसार सुखी करण्यास हातभार लावत. त्यांच्या या कुशल न्यायामुळे जनतेच्या अंत:करणात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले.

अहिल्याबाई होळकर यांचे धार्मिक जीवन आणि दानधर्म

मनुष्याच्या जीवनामध्ये बालपणी त्याच्यावर होणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. लहान मुले अनुकरणप्रिय असतात. घरातील कुटुंबातील व्यक्तीचे त्याचबरोबर परिसरातील व्यक्तींच्या आचार-विचारांचे आणि कृतीचे ते अनुकरण करत असतात. बालवयात त्याच्यावर होणारे संस्कार त्याचे जीवन घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. अहिल्यामातेचे वडील हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. पोथी-पुराण वाचणे, पूजा-अर्चा करणे आणि कीर्तन-प्रवचनाला जाणे हा त्यांच्या जीवनातील नित्यक्रम होता. बाल अहिल्यामाता आपल्या माता- पित्याबरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे राहून त्यांचे आचरण आत्मसात करत होत्या. त्यामुळे त्या बालपणापासूनच धार्मिक बनल्या आणि उत्तरोत्तर त्यांची धार्मिकता वाढतच गेली.

अहिल्यामाता पूर्णत: धर्मपरायण स्त्री होत्या. परमेश्वरावर त्यांची अगाध श्रद्धा आणि भक्ती होती. एका गरीब कुटुंबात जन्मास येऊन त्या वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या होत्या; परंतु त्यांच्या धर्माचरणात यत्किंचितही बदल झाला नाही. प्रत्येक कार्य त्या ईश्वराला साक्षी मानूनच करत. त्यामुळे त्यांच्या हातून कायम सत्कार्यच घडत असे. धर्म आणि त्याच्या जोडीला दान करणाऱ्या त्या महान कर्मयोगिनी होत्या.

हिंदू संस्कृतीमध्ये धर्म, सेवा, त्याग यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्म तोच की, ज्यामध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याण होते. कसल्याही प्रकारचे पक्षपातरहित कार्य करणे म्हणजे धर्माचरण. जो धर्माचे पालन करतो त्याच्याकडून अनायासे समाजाची सेवा घडते. सेवा करत असताना त्याग करावाच लागतो. कारण त्यागाशिवाय सेवा सफल होत नाही आणि सेवेखेरीज धर्मकार्य घडत नाही. जेथे धर्म आहे तेथे निःपक्षपाती वृत्तीने कार्य होते. धर्माच्या आधारे कार्य केल्याने संपूर्ण मानवमात्राचे कल्याण होते. अहिल्यामाता धर्माच्या आधारेच सर्व कार्य करत असल्यामुळे होळकर राज्यातील संपूर्ण प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरभाव होता.

अहिल्यामाता आदर्श हिंदू माता होत्या. धर्म, संस्कृती आणि जीवनचारित्र्य या गोष्टींना त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण संस्कृती आणि जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यापैकी एक जरी बाजूला सारले तर जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. सांस्कृतिक अर्थाने जो जीवन जगतो त्याचे जीवन कृतार्थ होते. अहिल्यामाता धार्मिक होत्याच त्याचबरोबर पोथीवाचन, पुराणकथांचे पठण व कीर्तन-प्रवचन यांचे श्रवण करणे हे त्यांच्या दैनिक कार्याचे अभिन्न अंग होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन धार्मिक आणि आध्यात्मिक बनले होते. कारण आध्यात्मिकता हिंदू संस्कृतीचा महान आधारस्तंभ आहे. धर्मावर आणि ईश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवून सत्कार्य करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय. आध्यात्मिकतेमुळे मनुष्याचे जीवन कृतार्थ आणि आदर्श बनते. म्हणूनच अहिल्यामातेचे जीवनदेखील आदर्श, थोर आणि कृतार्थ बनले.

अहिल्यामातेचे जीवन म्हणजे भीषण दु:खाचा अथांग महासागरच होते. त्यांच्यावर आलेली संकटे आणि झालेले दु:खाचे आघात ही परमेश्वराची इच्छा आहे. असे समजून त्या दुःखांचा आणि संकटांचा मोठ्या धैर्याने आणि शांतवृत्तीने सामना करत आणि आपल्यावरील जबाबदारी योग्य रीतीने हाताळत असत. कारण त्यांच्याजवळ धर्माचरण होते आणि धर्मदेखील हेच शिकवतो. प्रत्येक कठीण समयी दु:खाचा आणि संकटाचा सामना करत न डगमगता त्यांनी प्रजेची अकल्पित सेवा करून रयतेला सुखी आणि समाधानी केले. दुःखाच्या प्रचंड अग्निदिव्यातून आणि कष्टाच्या ज्वालेमध्ये त्यांचे नि:स्वार्थी आणि निष्कलंक जीवन आणखीनच तेजस्वी बनले होते. नि:स्वार्थ भावनेने आणि निष्काम सेवेच्या साधनेने त्या प्रेरणादायी महान तपस्विनी बनल्या होत्या.

अहिल्यामातेचे जीवन म्हणजे त्याग, धर्म, दान, प्रेम आणि कर्म यांचे पवित्र भांडारच होते. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांना स्वार्थाचा स्पर्शदेखील झाला नाही. कारण त्या प्रजाहितदक्ष आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजाचे कर्तव्य प्रजेला सुखी करणे असते. प्रजेची लयलूट करून त्यांना दु:खाच्या ढिगाऱ्यात गाडणे नव्हे, याची त्यांना जाणीव होती. त्यांचे जीवन त्यांनी दुसऱ्याच्या हितासाठी आणि परोपकारासाठी वाहिले होते. प्रजेकडून मिळणारा पैसा त्या प्रजेच्या हितासाठीच खर्च करत. आपल्या राज्यामध्ये कोणीदेखील दुःखी राहू नये अशी त्यांची धारणा होती. धार्मिकतेने ओथंबून वाहणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये भेदभावाचा लवलेशदेखील नव्हता. त्या ब्राह्मणांना दान करत. त्याचबरोबर दुःखी, पीडित, दीन-दुबळ्या, गोरगरीब जनतेला मदत करत. ती मदत वेगवेगळ्या स्वरूपाची असे.

त्यांच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग येत; परंतु प्रत्येक वेळेस त्या स्वत:च्या मनाला सावरून त्याग करत आणि त्यागाशी कर्माची सांगड घालून जीवन व्यतीत करत. प्रजेच्या हिताकडे लक्ष देऊन कर्मसाधनेत मग्न होत. पूर्ण भारतभर त्यांनी असंख्य मंदिरे, घाट, धर्मशाळा बांधून प्रजेची सेवा केली. मुक्या प्राण्यांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. म्हणून प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी हौद बांधले. यात्रेकरूंसाठी रस्तोरस्ती पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यांना प्रसिद्धी नको होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या या लोकोत्तर कार्याची त्यांच्या दप्तरी कोठेही नोंद नाही.

अहिल्यामाता शिवशंकराच्या भक्त होत्या. त्यांनी शंकराची असंख्य मंदिरे बांधली. जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हे सर्व करत असताना त्यांनी स्वत:चे जीवन परमेश्वराला वाहिलेल्या कमलपुष्पाप्रमाणे शुद्ध ठेवले होते. स्वत:चे विशाल आणि वैभवशाली राज्य शिवार्पण करून त्याचा उपयोग फक्त जनकल्याणासाठी करत होत्या. अनेक ठिकाणी अन्नछत्रे आणि सदावर्ते चालू करून याचकांची भूक भागवत होत्या. प्रजेला सुखी, समाधानी ठेवत होत्या. माझे राज्य हे ईश्वराचे राज्य आहे आणि मी एक निमित्तमात्र आहे समजून त्या जनतेची सेवा करत होत्या. त्यामुळे होळकर राज्यातील रयत ‘रामराज्या’ चा सुखद अनुभव घेत होती.

अहिल्यामाता स्वत: हिंदू असूनदेखील त्यांनी इतर धर्मीयांचा कधीच अनादर केला नाही. त्यांनी ज्याप्रमाणे हिंदू देवतांची मंदिरे बांधली, त्याचप्रमाणे मशिदीदेखील उभारल्या. त्यांच्या राज्यात सर्वांना आचार-विचारांचे स्वातंत्र्य होते. सर्वांना सर्वतोपरी सुखी करण्यासाठी त्या आयुष्यभर झिजल्या, झटल्या, रंजल्यागांजलेल्यांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. ‘प्रजा हेच दैवत’ मानून त्यांची त्या नि:स्वार्थी भावनेने आणि नि:पक्षपातीपणे सेवा करत. त्या काळामध्ये काही मुस्लिमांनी हिंदू देवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली होती, मूर्ती फोडल्या होत्या आणि तीर्थस्थळे भ्रष्ट करून हिंदूंच्या अंतःकरणावर वज्राघात केला होता; परंतु अहिल्यामातेने मुस्लिमांनादेखील राजाश्रय देऊन अभय दिले. मंदिराप्रमाणेच कित्येक मशिदींचा जीर्णोद्धार केला. नवीन मशीद उभारणीसाठी आर्थिक मदत केली. मौलवी, मुल्ला, फकिरांना जमिनी देऊन कामधंदे मिळवून दिले. त्यामुळे मुस्लिमदेखील इतर प्रजेप्रमाणे गुण्यागोविंदाने राहत होते. होळकर राज्य धर्मनिरपेक्ष राज्य बनले होते.

अहिल्यामातेने जिथे मंदिरे बांधली होती, तिथेच त्या मंदिरांची पूजा-अर्चा, स्वच्छता याची कायमस्वरूपी व्यवस्था करत होत्या. म्हणूनच आज आपण त्यांची द्विशताब्दी साजरी करताना त्यांनी बांधलेली मंदिरे अगदी मूर्त स्वरूपात त्यांची आठवण करून देतात.

अहिल्यामातेने बांधलेली काही मंदिरे व त्यांनी केलेला दानधर्म यांची काही स्थाने पुढीलप्रमाणे आहेत –

याव्यतिरिक्त अहिल्यामातेने कित्येक ठिकाणी घाट, धर्मशाळा आणि देवालये बांधली. अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक कुंडे बांधली अन्नछत्रे चालू केली. अनेक सदावर्ते स्थापन केली. त्या भुकेलेल्यास जेवण आणि तहानलेल्यांना पाणी देत होत्या. भूतदया त्यांच्या ठायी प्रकर्षाने दिसून येत होती. त्यांचा दानधर्म केवळ मनुष्यभागापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण प्राणिमात्रांसाठी त्यांचा दानधर्म होता.

अहिल्याबाई होळकर यांचा स्वभाव आणि चारित्र्यशालीनता

मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वांत जास्त महत्त्व त्याच्या चारित्र्याला असते. उत्तम चारित्र्यच मनुष्याचे आदर्श जीवन घडविते. आदर्श जीवनातूनच सुजाण आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक तयार होतात आणि सुजाण नागरिकच देश बलवान करू शकतात. या सर्व गोष्टींचा आधारस्तंभ चारित्र्य आहे. अहिल्यामातेचे चारित्र्य उच्चप्रतीचे होते. त्याच्या जोडीला त्यांचा सोज्वळ स्वभाव होता. त्यांच्यामध्ये गर्व वा अभिमानाचा लवलेशदेखील नव्हता. त्या दिसायला अगदी साधारण होत्या; परंतु त्यांचे उत्तम चारित्र्य, कठोर परिश्रम आणि असामान्य कतृत्वाच्या बळावर त्या सर्वांच्या पूज्य मातोश्री बनून सर्व जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाल्या.

अहिल्यामातेचा वर्ण सावळा, नाक सरळ, मध्यम बांधा, उंच कपाळपट्टी आणि केस लांब होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व क्रांती आणि तेज झळकत असे. पाहणाऱ्यास त्या साक्षात देवीचे प्रतिरूपच वाटत होत्या. म्हणावे असे शारीरिक सौंदर्य त्यांच्यामध्ये नव्हते; परंतु कित्येक लावण्यवतींना त्यांचा हेवा वाटत होता. मनुष्याचे सौंदर्य हे त्याच्या वर्णावर अथवा सौंदर्यावर अवलंबून नसते, तर ते त्याच्या मनाच्या पावित्र्यावर आणि परमकर्तृत्वावर अवलंबून असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर तात्काळ पडत होती. एखाद्या महान तपस्वीच्या ठिकाणी असणारे अनुपम तेज त्यांच्या डोळ्यांमध्ये लकाकत होते. त्यांचा चेहरा गोल आणि भरीव होता; परंतु सात्त्विक तेजाने तो अधिकच आकर्षक वाटत होता.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मास येऊनदेखील त्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या होत्या. तरीदेखील त्यांच्या स्वभावात गर्व वा सत्तेची नशा नव्हती. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्या श्वेत साडी परिधान करत. वैधव्यानंतर त्यांनी अलंकार कधीच घातले नाहीत. किमती वस्त्रे त्यांनी घातले नाहीत, वास्तविक त्यांना काहीच कमी नव्हते. पाहिजे ते त्या घेऊ शकत होत्या; परंतु त्या सर्वसामान्यांप्रमाणेच राहत. त्यांनी सदैव सर्वसामान्यांच्याच हिताचा विचार केला; परंतु सर्वसामान्यांच्या विचारप्रवाहात त्या विलीन झाल्या नाहीत. अज्ञानाने पीडित असलेल्या लोकांच्या ठायी असणाऱ्या अंधश्रद्धेला त्यांनी मूठमाती दिली. रयतेच्या जीवनाला त्यांनी नवीन दिशा दिली आणि त्यांना सुखी-समाधानी करण्याकरिता त्या आजन्म प्रयत्न करत होत्या; परंतु हे सर्व करत असताना आपली चारित्र्यशीलता त्यांनी जपली होती.

अहिल्यामातेचे अंतःकरण गंगाजलाहूनही निर्मळ होते. त्यांचा स्वभाव निःपक्षपाती होता. त्या सर्व प्राणिमात्रांना स्वसमान मानत. त्या सर्वांच्या परमप्रिय मातोश्री होत्या. सर्व रयत त्यांना मुलासमान होती, एका मातेला सर्व मुले समानच असतात. त्यांच्यासमोर येणारा प्रत्येक माणूस होता. मग तो राजा असो वा रंक, उच्च असो वा नीच, गरीब असो वा श्रीमंत, नोकरचाकर असो वा उच्चपदस्थ, सर्व समानच होते. प्रत्येकाला त्या त्यांच्या मातृत्वाच्या अमोल ठेव्याने जिंकत होत्या.

अहिल्यामातेचे जीवन सात्त्विक होते. तामसी वृत्तीचा त्यांच्यामध्ये अभाव होता. तामसी कृत्यांचा त्यांना मनस्वी संताप येत असे. अन्याय, पाप आणि कुकर्म यांसारख्या कृत्यांना अहिल्यामातेच्या जीवनामध्ये थारा नव्हता. त्यांना सत्कार्य आणि सत्प्रवृत्तीची तृष्णा होती. प्रजेने केलेली सत्कार्ये पाहून त्यांना आनंद होत असे. नीतिबद्ध आचरण, लयबद्ध बोलणे, सुविचार, सत्कार्य, धार्मिकता, न्याय, पुण्यकर्म सात्त्विक स्वभाव आदी गोष्टींनी त्यांचे जीवन व्यापून गेले होते. त्यांच्या आचारविचारात सुसंस्कृतपणा होता. त्याचबरोबर इतरांबद्दल आपुलकी आणि आदरभाव हा त्यांचा स्थायिभाव होता. तामसी मनोवृत्तीचे शब्द जरी त्यांच्या कर्णपटलावर पडले तरी त्या सात्त्विक संतापाने सिंहगर्जना करीत. ते शब्द ऐकण्यास कोणत्याही वीराचे धाडस होत नसे. महादजी शिंदेसारखा मुत्सद्दी, महापराक्रमी, राजनीतिज्ञ, रणधुरंधर वीरदेखील अशा वेळेस त्यांच्यासमोर तग धरू शकत नसे. एखाद्या क्षणीदेखील मनुष्याने त्यांच्यासमोर तामसी वृत्ती दाखवण्याची चूक केली, तर पुन्हा अशी चूक करण्यास तो धजत नसे. तामसीपणाला त्यांनी सात्त्विकतेने जिंकले होते.

अहिल्यामातेच्या स्वभावात स्पष्टवत्तेपणा मूळत: रुजलेला होता. त्यांना स्वत:च्या कीर्तीची अथवा वाहवा करून घेण्याची मुळीच लालसा नव्हती. त्या चारित्र्याला मारक ठरणाऱ्या गोष्टी कटाक्षाने टाळत. भोग, विलास यांसारख्या गोष्टींपासून त्या नेहमी दूर राहत. नियमितपणा आणि सुव्यवस्थित अविरत परिश्रम या गोष्टी त्यांच्या स्वभावात भिनलेल्या होत्या. अहिल्यामातेची दिनचर्या अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे अविरत नित्यक्रमाने चालू असे. त्यांचा सर्व वेळ राज्य, धर्म आणि प्रजा यांच्यासाठीच होता. जणू काही त्यांचे जीवन स्वत:साठी नसून प्रजेसाठीच समर्पित केलेले होते. त्या सकाळच्या सुप्रभातकाळी उठत आणि परमेश्वराला नमन करून सत्कार्याने भरलेल्या दिवसाचा शुभारंभ करत.

नंतर दानधर्म, अन्नदान वगैरे आटोपून स्वत: जेवण घेत. त्यांच्या जेवणात सात्त्विक आणि शाकाहारी पदार्थ असत. दुपारच्या जेवणानंतर थोडी वामकुक्षी घेऊन नंतर दुपारी दोन वाजता आपले दप्तरी काम पाहण्यासाठी येत आणि रात्री सहा-सात वाजेपर्यंत दप्तरी कामकाज पाहत. नतर ईश्वरोपासनेत एक-दोन तास घालवून पुन्हा राज्यकारभार पाहत व नंतर निद्राधीन होत. त्यांनी हाती घेतलेले काम पूर्णरीतीने आणि समाधानकारकरीत्या पूर्ण करूनच नंतर दुसऱ्या कामाकडे लक्ष वळवत असत.

आपली कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम, अनुपम प्रजावात्सल्य, धर्मनिरपेक्षता, धार्मिकता, चारित्र्यशालीनता, न्याय आणि राजनीती आदांमुळे त्या केवळ राजमाता न राहता लोकमातेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्या होत्या. आपल्या पवित्र चारित्र्याने मनुष्य बलवान होतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

प्रजावत्सल अहिल्यामाता अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्मास येऊन एका विशाल व वैभवशाली राज्याच्या प्रमुख सत्ताधारी बनूनदेखील अहिल्यामातेने रयतेला कधीही कमी लेखले नाही. त्यांच्या विशाल अंत:करणात प्रजेबद्दल असणारा आदरभाव आणि ममतेची जपणूक करून त्या सर्वांच्या लोकमाता बनल्या. ‘प्रजा हेच दैवत’ आणि प्रजेचे काम करणे हेच आपले आद्यकर्तव्य आहे, यावर त्यांची निष्ठा होती.

अहिल्यामाता विशाल आणि संपन्न होळकर राज्याच्या राज्यकर्त्या होत्या. त्यांची जीवनचर्या म्हणजे उत्कृष्ट प्रकारच्या सत्कार्याने भरून गेलेले आदर्श जीवन होते. त्यामुळे त्या उत्तम शासनकर्त्या बनल्या होत्या. ‘राजा हा प्रजेसाठी असतो. प्रजा राजासाठी नव्हे,’ अशी त्यांची मनोधारणा होती. त्यामुळे राजाने प्रजेसाठी त्याचे पूर्ण जीवन अर्पण करून प्रजेच्या सुखसोयी व संरक्षणाकडे लक्ष पुरवून त्यांच्यामध्ये आदर्श जीवनाची बीजे रुजवली पाहिजेत असे त्यांचे प्रांजळ मत होते. या दृष्टीने राजाचे जीवन हे आदर्श जीवन असायला पाहिजे. कारण ‘यथा राजा, तथा प्रजा’ असते. राजाने आपल्या सर्वाधिकाराचा उपयोग सत्कार्यासाठी करावा. राजाने प्रजारक्षक बनावे, प्रजाभक्षक असू नये. भोग, विलास, स्वार्थ यांसारख्या शब्दांनादेखील राजाच्या जीवनामध्ये थारा नसावा. कारण ‘सत्ता म्हणजे भोग नसून तो एक महान योगायोग आहे,’ हे अहिल्यामाता जाणून होत्या. त्यांनी जीवनाची आदर्श तत्त्वे आचरणात आणली होती. त्यामुळेच त्या आदर्श प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या झाल्या होत्या.

अहिल्यामातेचे राज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते. कारण त्यांच्या राज्यामध्ये धर्मनिरपेक्षता होती. दीन-दुबळे, रंजले-गांजलेले, गरीब- श्रीमंत, दलित-उच्चवर्गीय आणि हिंदू-मुस्लिम सर्व ऐक्यभावनेने आणि सुखी, समाधानी, शांततेने राहत होते. प्रजेला सत्कार्यासाठी मदत करण्यास अहिल्यामाता नेहमी तत्पर राहत. आपला राज्यामध्ये कोणीही दुःखी राहू नये अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी दानधर्म देणे सुरू केले. अन्नछत्रे व सदावर्ते उघडली. जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी त्या अथक परिश्रम करत. कारण त्या जगत असत दुसऱ्यांसाठी आणि त्यांचे जीवन परार्थासाठीच होते.

अहिल्यामाता प्रजेला त्यांच्या लेकराप्रमाणे वागवत असत. वेळच्या वेळी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे पूर्ण राज्यातील जनता सुखी, समाधानी, सुरक्षित आणि आनंदी होती. प्रजेला चोर, लुटारू, दरोडेखोर यांची भीती नव्हती. कारण अहिल्यामातेने चोर, दरोडेखोरांच्या जीवनातील पापी कृत्यांना मुळासकट उखडून त्यांच्या जागी आदर्श जीवनाची बीजे रुजवून त्यांना सन्मार्गी लावले होते. त्याचबरोबर त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून त्यांच्याही अहिल्यामाता मातोश्री बनल्या होत्या.

एकदा त्याकाळचे म्हणजे 18 व्या शतकातील सुप्रसिद्ध कवी, शाहीर अनंत फंदी अहिल्यामातेच्या दर्शनास्तव संगमनेरहून महेश्वराला निघाले असता सातपुड्यातील भिल्लांनी त्यांना वाटेतच अडवले व त्यांचे सामानसुमान लुटले; परंतु ज्या वेळेस अनंत फंदीनी महेश्वरी जाण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा मात्र भिल्लांनी शरमेने माना खाली घातल्या व त्यांनी अनंत फंदींशी केलेल्या दुर्वर्तनाबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. नंतर त्यातील काही भिल्लांनी अनंत फंदींना अहिल्यामातेकडे महेश्वरला सुरक्षित पोहोचवले. यावरून सहज लक्षात येते की, चोर-दरोडेखोरांच्या मनातदेखील अहिल्यामातेबद्दल आदराचे स्थान होते.

अहिल्यामातेचे जीवन हे कृतिशील जीवन होते. ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे अहिल्यामाता कोणत्याही प्रकारचे सद्गुण अगोदर स्वत:च्या आचरणामध्ये आणत आणि नंतर प्रजेला तसे आचरण करण्यास आपल्या आदर्श जीवनाद्वारे प्रवृत्त करत. अहिल्यामातेचे जीवन हे गंगाजलाहूनही निर्मळ आणि पवित्र होते. धार्मिकता, नैतिकता आणि आध्यात्मिकता याने त्यांचे पूर्ण जीवन ओसंडून वाहत होते. प्रजेलादेखील धार्मिकतेकडे वळवण्यास त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. वास्तव अनेक धार्मिक कार्याचे प्रयोजन त्या करत असत. अनेक मंदिरांची त्यांनी उभारणी केली. जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांना त्यांनी मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले.

अहिल्यामाता सदासर्वकाळ प्रजेच्या हिताचाच विचार करत असत. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकरशाहीची राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हाती आली. पूर्वीची राजप्रधान कायदेपद्धती त्यांनी मोडीत काढून त्या ठिकाणी साहजिकच सरकारी तिजोरीवर ताण पडला; परंतु प्रजेचे मात्र भले झाले. प्रजेवर जाचक आणि अन्यायकारक असणारे नियम त्यांनी रद्द करून त्या ठिकाणी प्रजेच्या हिताचे कायदे व नियम अमलात आणले व त्यातून प्रजाहित साधले. एखादी व्यक्ती जर अहिल्यामातेच्या राज्याला लोकोपयोगी कार्यासाठी काही मदत देत असेल तर अहिल्यामाता ती मदत न स्वीकारता त्याच व्यक्तीला तो पैसा प्रजेच्या हितासाठी खर्च करण्यास प्रेरणा देत असत. यातूनच त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्ये केली आणि प्रजेकडून प्रजेच्या कल्याणाची कामे करून घेतली.

अहिल्यामातेच्या राज्यामध्ये राजा आणि प्रजा यांचा संबंध माता आणि पुत्राचा होता. अहिल्यामाता प्रजेला स्वत:च्या मुलाप्रमाणे समजून त्यांच्या सुखासमाधानासाठी अहोरात्र परिश्रम करीत. त्याचबरोबर प्रजेचे प्रश्न अत्यंत मायेने सोडवण्याचा प्रयत्न करीत. प्रजेच्या प्रश्नांची सोडवणूक करत असताना कसल्याही प्रकारचा भेदभाव वा पक्षपात त्या करत नसत. अत्यंत जबाबदारीने योग्य तोच न्याय त्या सर्वांना देत असत. प्रजेवर कसल्याही प्रकारची बंधने त्यांनी लादलेली नव्हती. प्रत्येकाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. त्याचबरोबर जो कायद्याचे उल्लंघन करील त्याला कायद्याप्रमाणे होणारी शिक्षाही भोगावी लागे. प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीनुसार सुखसोयी करता येत होत्या, पाहिजे ती साधने वापरता येत होती. त्यामुळे संपूर्ण प्रजा आनंदी होती आणि अहिल्यामातेचे मन:पूर्वक आभार मानत होती.

अहिल्याबाई होळकर यांचे शेवटचे दिवस – आदर्श जीवनाचा शेवट

खंडेरावांच्या मृत्यूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आलेले वैधव्य आणि त्यानंतर सुरू झालेली मृत्यूची मालिका यामुळे अहिल्यामाता पूर्णत: खचून गेल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या- खंडेरावांच्या- मृत्यूनंतर काही वर्षांतच अहिल्यामातेचे महापराक्रमी सासरे मल्हारराव होळकर निवर्तले. त्यानंतर अहिल्यामातेचा एकुलता एक लाडका मुलगा मालेरावदेखील आईला सोडून गेला. अहिल्यामातेवर एकामागून एक दु:खाचे डोंगर कोसळत होते. त्यांच्या अंतःकरणावर एकामागून एक प्रहार होत होते; परंतु प्रत्येक वेळेस त्यांची सदसद्‌विवेकबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा जागृत होऊन त्या राज्यकारभारात रमत असत. परंतु एवढेदेखील विधात्याला मान्य नव्हते. विधिलिखित वेगळेच होते.

कुटुंबातील माणसे एकामागून एक अशी अहिल्यामातेला दु:खाच्या प्रचंड दरीत लोटून सोडून जात होती. खंडेराव, मल्हारराव आणि मालेराव नंतर अहिल्यामातेचा लाडका नातू नत्थू परलोकीच्या अधीन झाला होता. त्याच्या पाठोपाठ नत्थूच्या दोन बायकादेखील त्याच्याबरोबर सती गेल्या. आपल्या लाडक्या मुलाच्या निधनाने अहिल्यामातेचे जावई यशवंतराव पूर्णत: खचून गेले. पुत्र शोकाने अतिविव्हल होऊन ते आजारी पडले आणि शेवटी 3 डिसेंबर 1791 रोजी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यानंतर अहिल्यामातेचा उरलेला आधार एक मुक्ताबाई अनेक प्रकारे समजावूनदेखील आपल्या पतीबरोबर सती गेली आणि अहिल्यामातेला सर्व जगच संपल्यागत झालं. दु:खाचा प्रचंड अंधकार त्यांच्याभोवती पसरला होता आणि त्या महाकाय अंधकारात त्या एकट्याच चाचपडत होत्या, मार्ग शोधत होत्या.

अशी एकामागून एक जिवाभावाची आप्तेष्टमंडळी त्यांना सोडून गेली होती. गोठ्यात वासराविना हंबरडा फोडणाऱ्या गायीप्रमाणे अहिल्यामातेची अवस्था झाली होती. त्यांनी एकच हंबरडा फोडला. आप्तांच्या आठवणीने त्यांना दुःख असह्य झाले. सर्वांनी सर्व प्रकारे त्यांचे दुःख कमी करण्याचे प्रयत्न केले; परंतु ते सर्व विफल ठरले. त्यांचे दुःख कमी न होता उलट ते वाढतच होते. त्यांचे असह्य दुःख, करुण अवस्था आणि अतिविकल आक्रोश कोणालाही पाहवत नव्हता.

परंतु थोड्या अवधीत त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि सदसद्‌विवेकबुद्धी जागृत झाली. आपल्या भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून पुन्हा एकवेळ त्यांनी सर्व दुःखे आणि भावनांना विसर देऊन राज्यकारभार आणि परोपकाराची कामे पूर्ववत चालू केली.

राज्यकारभार, धर्मपरायणता, सत्कार्ये हा नित्यक्रम त्यांचा चालूच होता. दिवस हळूहळू पुढे जात होते. वय दिवसेंदिवस वाढत होते. त्यांनी वृद्धावस्थेत प्रवेश केला होता. वयाच्या अगदी 29 व्या वर्षी आलेल्या वैधव्यापासून तर वृद्धापकाळापर्यंत त्यांच्या आयुष्यात दुःखेच आली होती. दुःखे आणि संकटे यावर यशस्वी मात करून अहिल्यामातेचे साफल्यपूर्ण आयुष्याचे मार्गक्रमण चालू होते. आता त्यांनी सत्तरी ओलांडली होती. असह्य दु:खे आणि उपासतापास यांनी पूर्ण शरीर खंगून गेले होते. शरीरच ते! ते तरी कोठवर तग धरणार?

अखेर अहिल्यामाता आजारी पडल्या. आजार कसला तो? अहिल्यामातेचा या भूतलावरील कार्यकाल संपल्याची वार्ताच होती ती! एका अत्यंत गौरवपूर्ण, परोपकारी जीवनाचा अंत होणार होता. होळकर राज्य आपल्या मातेला मुकणार होते. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे एक सोनेरी पान संपणार होते. जवळजवळ 70 वर्षांची महत्त्वपूर्ण कारकीर्द संपणार होती. प्रजाजन आपल्या प्रेमळ मातेस मुकणार होते.

अखेरीस तो दिवस उजाडला. 13 ऑगस्ट 1795 चा तो दिवस. श्रावण मास होता. अहिल्यामातेने 12 सहस्र ब्राह्मणांच्या भोजनाचा संकल्प सोडला. पुष्कळ दानधर्म केला. सर्व विधी पूर्ण करून भगवंताच्या चरणी सर्व लक्ष केंद्रित केले. परमेश्वराचे पुण्यनामस्मरण सुरू केले. आणि थोड्याच वेळात संपूर्ण रयतेला दुःखाच्या प्रचंड महासागरात सोडून अहिल्यामातेने जगाचा कायमस्वरूपी निरोप घेतला.

अहिल्याबाई होळकर यांचे महत्त्व

इ.स.च्या अठराव्या शतकामध्ये हिंदुस्थानमध्ये नारीला समाजामध्ये फारच गौण स्थान होते. स्त्रियांचे काम म्हणजे फक्त ‘चूल आणि मूल’ पाहणे यावरच थांबत असे. घराच्या चार भिंतीच्या आतमध्येच तिला राहावं लागायचं; परंतु या चार भिंतीच्या आतमध्येदेखील तिला फारच कमी महत्त्व होते. स्त्री म्हणजे केवळ एक भोगवस्तू अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. स्त्रीची अवस्था अत्यंत दयनीय आणि केविलवाणी होती. शिक्षणाची आणि आत्मोन्नतीची कोणतीच संधी तिला मिळत नव्हती. स्त्रियांचे जीवन सामाजिक बंधनांच्या पिंजऱ्यात गुंतलेले होते. दुःखी, कष्टी, असुरक्षित आणि भावनाहीन साखळदंडांनी तो पिंजरा जखडलेला होता. त्यातून बाहेर पडणे म्हणजे केवळ अशक्य होते.

शील आणि पातिक्रत्य यांच्या सुरक्षिततेसाठी पतीच्या चितेबरोबर भस्मसात होणे हाच स्त्रीचा धर्म झाला होता. अशा प्रकारच्या अत्यंत विकट परिस्थितीमध्ये अहिल्यामातेने होळकर घराण्याचे नंदनवन केले होते. सामाजिक बांधिलकी झुगारून देऊन एका कैभवशाली व विशाल राज्याचे कुशल संचलन केले आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने अनेक अनन्यसाधारण कार्ये केली. अहिल्यामाता अत्यंत बुद्धिवान, मुत्सद्दी आणि राजकारणी स्त्री होत्या. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आणि थोर अंत:करणाने त्या सर्वांच्या माता बनल्या होत्या. आपल्या पूर्ण जीवनप्रवाहामध्ये त्या पत्नी, सून, माता, सती आणि देवी या रूपांमध्ये सर्वांच्या पूज्य व वंदनीय बनून आपल्या अक्षय रूपाने अहिल्या मातेने असामान्य कीर्ती संपादन केली.

अहिल्यामातेचे जीवन म्हणजे संकटे आणि दु:खे यांचा अथांग महासागरच होते. त्यांच्या जीवनामध्ये आढळणारी दु:खे क्वचित एखाद्याच्या जीवनामध्ये आढळतात. एकामागून एक असे दु:खाचे प्रचंड डोंगर त्यांच्यावर कोसळले; परंतु त्या थोड्यादेखील डगमगल्या नाहीत की त्यांचा धीर खचला नाही. अनेक संकटांचा आणि दु:खांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेपासून तसूभरदेखील ढळल्या नाहीत. आपल्या सभोवताली पसरलेल्या घनदाट काळोखाला शिव्याशाप न देता अहिल्यामातेने अत्यंत सहनशीलतेने आपल्या जीवनाचा विजयी दीप प्रज्वलित करून पूर्ण आसमंत उजळून टाकला. त्यांच्या या अलौकिक जीवनदीपाने संपूर्ण जगाला निर्मळ स्नेहाचा आणि शाश्वत सुखाचा दिव्य प्रकाश दिला.

अहिल्यामातेने आपल्या जीवनात येणारे प्रत्येक संकट आणि दु:ख ही परमेश्वराची इच्छा समजून ते निमूटपणे सोसले आणि मोठ्या धैर्याने आणि वीरत्वाने त्याचा मुकाबला केला. उच्चकोटीची धर्मपरायणता, सदसद्‌विवेकबुद्धी आणि अलौकिक बुद्धिमत्ता आदी गोष्टींमुळे अत्यंत बिकट परिस्थितीमध्येदेखील त्या अढळ आणि अविचल राहिल्या. प्रत्येक संकटरूपी वादळाने त्यांचे धैर्य आणि वीरत्व वाढतच गेले. प्रत्येक वेळेस येणाऱ्या सर्व नाशकारी संकटांना त्यांनी हसतमुखाने तोंड दिले. एक स्त्री असूनदेखील संकटांवर आणि दु:खावर त्यांनी कायम विजयी पताका फडकवली. एखाद्या महापराक्रमी वीर पुरुषासदेखील लाजवेल अशा प्रकारचे असामान्य कर्तृत्व गाजवून अहिल्यामातेने आपले जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान बनवले.

अहिल्यामातेच्या मनामध्ये अहंभाव अजिबात नव्हता. त्यांनी भेदभाव कधी केला नाही. त्या जरी एका विशाल आणि वैभवसंपन्न होळकर राज्याच्या सर्वाधिकारी होत्या तरीदेखील त्यांचे अंत:करण इतके विशाल आणि वात्सल्यपूर्ण होते की, त्यामध्ये त्या सर्व प्रजाजनांना नि:पक्षपातीपणे सामावून घेत. परमेश्वराजवळ ज्याप्रमाणे संपूर्ण माणसे समानच असतात आणि एखाद्या मातेल्या ज्या प्रकारे वाईट आणि चांगली, दोन्ही प्रकारची मुले सारखीच असतात. त्याचप्रमाणे अहिल्यामातेलादेखील सर्व प्रजा समानच होती.

अहिल्यामातेचे जीवन हे मंदिराप्रमाणे पवित्र आणि महान होते. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक दु:खी मनुष्य समाधानाने परत जात असे. सर्व प्रजेची त्या मनोभावे सेवा करत असत. त्यामुळे प्रजेच्या अंत:करणातदेखील त्यांच्याबद्दल आदरभाव असे. जगामध्ये हजारो माणसे जन्मास येतात; परंतु ज्याला खऱ्या अर्थाने माणूस म्हणता येईल असा क्वचितच एखादा माणूस आढळतो. सागराच्या तीरावर शंख-शिंपल्याचे ढीगच्या ढीग आढळतात; परंतु त्यामध्ये मौल्यवान मोती दुर्मीळ असतात. शंख-शिंपल्यांच्या प्रचंड ढिगाऱ्यामध्ये एखादा मोती आढळतो. अहिल्यामातेचे जीवनदेखील मौल्यवान मोत्याप्रमाणे होते. एका स्त्रीचा जन्म घेऊनदेखील त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक केले होते.

अहिल्यामातेचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी होते. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेतला तर आपले जीवन समाधानी आणि कार्यकुशल झाल्याखेरीज राहणार नाही. आज आपल्याला अहिल्यामातेच्या उच्चकोटीच्या जीवनातील आदर्शांची गरज आहे. ज्यांनी त्यांचे आदर्श अंगीकारले त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. मातेच्या जीवनातील एक-एक सद्गुण हा उच्चकोटीतील होता म्हणूनच त्यांचे जीवन परमोच्चकोटीतील बनेले होते.

‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाप्रमाणे अहिल्यामातेची प्रजादेखील सद्गुणी आणि धार्मिक प्रवृत्तीची झाली होती. चोहीकडे पुण्यकर्म चालू होते. मातेच्या धार्मिक आणि पारमार्थिक जीवनाचा तळागाळातील संपूर्ण समाजावर फार मोठा इष्ट परिणाम झाला होता. कित्येकांनी त्यांची धार्मिक आणि पारमार्थिक वृत्ती आचरणात आणली. राजेमहाराजे, धनिक आणि गोरगरिबांनी आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली होती.

एक राज्यशासक या नात्याने अहिल्यामातेला असामान्य महत्त्व आहे. त्यांनी राजकीय जीवनाला पावित्र्य प्राप्त करून दिले. धर्माचरण आणि राजकारण यांची सुयोग्य सांगड घालून इहलोक आणि परलोक दोन्हीही चांगल्या प्रकारे साध्य करता येतात हे त्यांनी उत्तम प्रकारे जगाला दाखवून दिले. त्यासाठी आवश्यक असणारे सर्व सद्गुण अहिल्यामातेच्या अंगी वास करत होते. सर्व व्यावहारिक सत्ये त्यांच्या जीवनामध्ये अवतरित होती. अहिल्यामातेचे जीवन हिंदू संस्कृतीतील आदर्श नारित्वाचे ज्वलंत उदाहरण आहे आणि म्हणूनच त्यांचे कार्य भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे.

अहिल्याबाई होळकरांचे योगदान

अहिल्याबाई होळकर यांची आज देवी म्हणून पूजा केली जाते, लोक तिला देवीचा अवतार मानतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतासाठी अशी अनेक कामे केली, ज्याचा विचार राजाही करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांवर मंदिरे बांधली, तिथे जाण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले, विहिरी आणि पायऱ्या बांधल्या. या कारणास्तव काही समीक्षकांनी अहिल्याबाईंना अंधश्रद्धाही म्हटले आहे.

अहिल्याबाई सत्तेवर आल्यावर राजांकडून प्रजेवर अनेक अत्याचार होत असत, गरिबांना अन्नासाठी तडफडून, त्यांना उपाशी, तहानलेले ठेवून काम करायला लावले जात असे. त्यावेळी अहिल्याबाईंनी गरिबांना अन्न देण्याची योजना आखली आणि ती यशस्वीही झाली, परंतु काही क्रूर राजांनी त्यास विरोध केला. लोक अहिल्याबाईंना मातेची प्रतिमा मानून त्यांची त्यांच्या हयातीतच देवी म्हणून पूजा करू लागले.

अहिल्याबाईंना भारतातील इंदूर शहराशी एक वेगळीच ओढ होती, त्यांनी या शहराच्या विकासासाठी आपली बरीच पुंजी खर्च केली होती. अहिल्याबाई होलार यांनी आपल्या हयातीत इंदूर शहराला अतिशय सुलभ शहर किंवा क्षेत्र बनवले होते. त्यामुळेच भाद्रपद कृष्ण पक्षाची चतुर्दशी येथे अहिल्योत्सव म्हणून साजरी केली जाते.

अहिल्याबाई होळकर यांच्याशी संबंधित मतभेद

अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात सनातन धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी अनेक महान गोष्टी केल्या. यामुळेच काही समीक्षकांनी तिच्यासाठी असे लिहिले आहे की तिने मंदिरांसाठी बिनदिक्कतपणे दान किंवा पैसा खर्च केला, तिने आपले सैन्य मजबूत केले नाही. काही लोक तिला अंधश्रद्धेचा प्रचारकही म्हणतात. पण सत्य हे आहे की त्यांनी आपल्या सन्मानापेक्षा आणि राज्यापेक्षा आपला धर्म मोठा मानला आणि आपल्या धर्माच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अहिल्याबाई होळकर यांची विचारधारा

अहिल्याबाई होळकर यांनी नेहमीच अंधार संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपले जीवन इतरांच्या भल्यासाठी समर्पित केले. एक काळ असा होता जेव्हा तिने पतीच्या निधनानंतर सर्वस्व सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर त्यांनी राज्य आणि धर्मासाठी सर्वस्व अर्पण केले.

अहिल्याबाई होळकर यांचा भारत सरकारकडून सन्मान

माता अहिल्याबाई होळकर आजही त्यांच्या चांगल्या कामांसाठी स्मरणात आहेत, स्वातंत्र्यानंतर 25 ऑगस्ट 1996 रोजी भारत सरकारने अहिल्याबाई होळकर यांचा गौरव केला. त्यांच्या नावाने टपाल तिकिटेही निघाली असून त्यांच्या नावाने पुरस्कारही जारी करण्यात आले आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आजही भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे आणि आजही त्यांच्याविषयी अभ्यासक्रमात सांगितले जाते. उत्तराखंड सरकारनेही तिच्या नावाने एक योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव आहे

अहिल्याबाई होळकर जयंती

अहिल्याबाईंची जयंती दरवर्षी 31 मे रोजी साजरी केली जाते.

अहिल्याबाई होळकर जीवनावर आधारित मालिका, चित्रपट

भारताच्या इतिहासात प्रथमच अहिल्याबाई होळकर यांच्यावर टीव्ही मालिका बनवण्यात आली असून या मालिकेचे नाव आहे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’. अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक या नावानेही संबोधले जाते हे तुम्हाला माहीत असेलच. या मालिकेत अहिल्याबाईंच्या जीवनातील सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. ही मालिका सोनी टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होते. या मालिकेचा पहिला भाग 4 जानेवारी 2021 रोजी आला होता.

अहिल्याबाई होळकर यांच्यावरील काव्य आणि लेख

संपूर्ण प्रजेसाठी ज्याप्रमाणे अहिल्यामातेचे असामान्य महत्त्व होते त्याचप्रमाणे लेखक, कवी आणि इतिहासकार यांच्या दृष्टीने तर अहिल्यामातेचे जीवन म्हणजे त्यांच्या अलौकिक प्रतिभाशक्तीतील सुवर्ण अक्षरे होती. ज्यानेही अहिल्यामातेचे जीवन जवळून पाहिले अथवा त्यांची कीर्ती ऐकली, मग तो लेखक असो वा कवी, त्यांना लेख अथवा काव्य लिहिल्याशिवाय राहावलं नाही. तत्कालीन भारतातील अनेक इतिहासप्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्यावर लेख लिहिले अथवा काव्यरचना केली. त्यातील काही व्यक्तींचे लेख व काव्य यातील माहीत असलेला आशय खालीलप्रमाणे आहे.

अहिल्यामातेचे समकालीन कवी खुशालीराम लिहितात –

कुरुक्षेत्रतीर्थे तुलादानमेवं
सुवर्णत्मरौप्यादिकं वारंवारं।
अहिल्याऽ पि सा सदंदा दानशीला
धरादेवताभ्यो गुणज्ञानशीला॥

(त्यांनी कुरुक्षेत्रावर कित्येक वेळा सोने आणि चांदीची तुला दान केली. गुणसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि शीलसंपन्न अहिल्यामातेने ब्राह्मणांनाही पुष्कळ दान केले.)

देशेदेशेच नित्यं बहुविधमभितो दानमन्नस्य सम्यक।
पक्वापक्वं ददत्या, परमपि बहुधा दानमर्थानुरूपम॥
दारिद्य्रं याचकांना बहुविधर्मण्यन्निर्गतं तत्प्रसंगात॥
वांच्छपूरा बभूकरथशररागताना महल्याभिधा या॥

(अहिल्यामातेने देशामध्ये अनेक प्रकारचे अन्नदान केले. याचकांची याचना पूर्ण केली आणि ज्याने त्यांना काही मागितले त्याची इच्छा पूर्ण केली.) मराठीचे सुप्रसिद्ध कवी मोरोपंत लिहितात –

श्रीहरिहरभक्ता तू देवि अहिल्येवरा धराभूषा।
पूषा तुग साधु म्हणे ख्याता तुजसम न बाणतनुभूषा ॥1॥

(अर्थ : हे देवी अहिल्या! आपण परमेश्वराच्या परमभक्त आहात. आपल्या भक्तीने तुम्ही या पृथ्वीच्या श्रेष्ठ आभूषण बनल्या आहात. सूर्य आपली स्तुती करत आहे. बाणाची कन्यादेखील आपल्याइतकी सुप्रसिद्ध नाही.)

देवी अहिल्याबाई । झालीस जगत्रयात तू धन्या
न न्यायर्मनिरता अन्या कलिमाजि ऐकिली कन्या ॥2॥

(अर्थ : हे अहिल्यादेवी! या तीनही लोकात आपण धन्य आहात. या कलयुगात आपल्यासमान न्यायी आणि धर्मपरायण स्त्री दुसरी कोणीही नाही.)

धर्मार्थ गोत्रजन्या किंवा झालीस तू धराजन्या
तुज देवि भेटली जी सत्कीर्ती कधीच हे न राजन्या ॥3॥

(अर्थ : धर्मकार्य करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. कोणत्याही राजाला आपल्याइतकी सत्कीर्ती मिळाली नाही.)

जाणे धर्म करीना त्या स्तवितो कोण पंडितंमन्या
न न्याधर्मनिरता अन्या कलिमाजो ऐकिली कन्या ॥4॥

(अर्थ : महापंडितांद्वारा प्रशंसित मनुष्य असा कोणता आहे की, ज्याने धर्मकार्य केले नाही. हे देवी! आपल्यासारखी न्यायी आणि धार्मिक दुसरी कोणतीही स्त्री नाही.)

न त्याजिसी नर्मदेते देवि! तुझी तू बहू प्रिया झाली
गंगेचीही सखी हो की उभय मनांत सत्क्रिया

(अर्थ : हे देवी! आपण नर्मदेशिवाय राहत नाही, कारण ती आपल्याला अतिप्रिय आहे. आपण दोघी पवित्र गंगेच्या मैत्रिणी आहात. कारण सत्कार्य करण्याची इच्छा दोघींच्यादेखील मनात आहे.)

श्री विष्णुपदा स्तविली त्वदभक्ता हे तुलाही मानावे
विश्व जिला वानितसे का न मयुरेही तीस वानावे ॥6॥

(अर्थ : हे परमेश्वरा ! अहिल्यामाता तुझी परमभक्त स्त्री आहे. संपूर्ण विश्व तिची स्तुती करते आहे आणि जेव्हा संपूर्ण जग तिची स्तुती करते आहे तेव्हा या मोरोपंतांनी तिचे गुणगान का करू नये?)

कवी प्रभाकर लिहितात –

सति धन्य-धन्य कलियुगी अहिल्याबाई ।
गेली कीर्ती करूनिया भूमंडलचे ठायी ॥
महाराज अहिल्याबाई पूज्य प्राणी ।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्न खाणी ॥
दर्शने मोठ्या पापाची होईल हानी ।
झडतात रोग दोषांची होईल हानी ॥
वर्णिती कीर्ती गातात संत ते गाणी ।
झाली देवशे ती होळकराची राणी ॥

मिस. जॉन्ना बेली :

या एक इंग्रज महिल्या होत्या. त्यांनी अहिल्यादेवीसंबंधी आपले विचार फारच सुंदर शब्दांत प्रकट केले आहेत.

For thirty years her reign if peace,
The land in blessings did increase
And she was blessed by every tongue
By sterm and gentle, old and young.

(अर्थात, त्यांनी तीस वर्षे शांतीपूर्वक राज्य केले. त्यांच्या काळात राज्याचे वैभव उत्तरोत्तर वाढतच गेले. सभ्य आणि असभ्य, म्हातारे आणि तरुण सर्वच त्यांची प्रशंसा मुक्तकंठाने करत होते.)

सर जॉन माल्कम :

हे मध्यभारतातील पोलिटिकल एजंट आणि सुप्रसिद्ध इतिहासकार होते. अहिल्यामातेविषयी आपले विचार व्यक्त करताना ते लिहितात –

‘‘त्यांची राहणी फार साधी आणि विचार फार उच्चकोटीचे होते. खऱ्या वैधव्याचा जो हिंदू आदर्श त्यांनी निभावून नेला, तसा फार थोड्या विधवांना आचरणात उतरवता आला असेल. एका महाराणीच्या दृष्टीने तर ही गोष्ट आणखीच प्रशंसनीय आहे. त्या नेहमी शुभ्र साडी परिधान करत. रंगीत कपडे त्या कधीच परिधान करीत नसत. त्यांचे चारित्र्य निर्मळ आणि राज्यकारभार अतिशय वाखाणण्याजोगा होता. परमेश्वरावर निष्ठा ठेवून कर्तव्यपरायण राहिल्याने माणसाला व्यवहारात किती फायदा होतो हे त्यांच्या जीवनावरून स्पष्ट लक्षात येते.’’

पुढे ते लिहितात, ‘‘अहिल्याबाई एक असामान्य स्त्री आहे. दुरभिमानाचा त्यांना स्पर्शदेखील झालेला नाही. धर्मपरायणता असूनही त्या कमालीच्या सहनशील आहेत. त्यांचे मन रूढिप्रिय आहे; परंतु तरीही रूढीचा उपयोग त्या जनकल्याणासाठीच करतात. प्रत्येक क्षणाला सदसद्‌विवेकाने काम करणारे त्यांचे जीवन आहे. सर्व प्रकारची सुखे व सोयी उपलब्ध असताना त्या अत्यंत निष्कपट, विनयशील आणि संयमी आहेत. त्यांच्या चारित्र्याचा विकास अद्वितीय आहे. त्या आपल्या हाताखालील लोकांचा कमकुवतपणा आणि अपराध सहन करून त्यांना नेहमी क्षमा करतात.’’

यावरून अहिल्यामाता किती थोर होत्या आणि संपूर्ण प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दल किती उच्चप्रतीचे विचार होते हे सहज लक्षात येते. म्हणूनच त्या केवळ राजमाता न राहता ‘लोकमाता पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर’ झाल्या.

अहिल्याबाई होळकर यांची माहिती

पुढे वाचा:

प्रश्न १ – अहिल्याबाई होळकर कोण आहेत?

उत्तर – मराठा साम्राज्याचे महान शासक खंडेराव होळकर यांच्या पत्नी.

प्रश्न २ – अहिल्याबाई होळकरांना आपल्या मुलाला का मारायचे होते?

उत्तर – कारण मलारावांनी गायीचे वासरू मारले होते. त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली होती.

प्रश्न ३ – अहिल्याबाई होळकरांना किती मुले होती?

उत्तर – दोन

प्रश्न ४ : अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू कसा झाला?

उत्तर – प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला.

प्रश्न ५ : अहिल्याबाई होळकर यांचे लग्न कधी झाले?

उत्तर – लहान वयात बालपणातच लग्न झाले.

प्रश्न ६ : अहिल्याबाई होळकर यांची समाधी कोठे आहे

उत्तर – अहिल्याबाई होळकर यांची समाधी इंदूर येते नर्मदा नदीच्या काठी त्याच्या राजवाड्यात आहे.

प्रश्न ७ : अहिल्याबाई होळकर जयंती कधी असते?

उत्तर – दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply