सुनीता विल्यम मराठी निबंध – Sunita Williams Essay in Marathi
माणसाने आजपर्यंत अफाट प्रगती केली आहे. आता तर तो अवकाशाचा वेध घेऊ लागला आहे. दूरदूरच्या ग्रहताऱ्यांवर जाण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. विविध ग्रहतायऱ्यांवर जाण्यासाठी माणसाने आता तर अंतराळात अवकाश स्थानक उभारले आहे.
या अवकाश स्थानकात अनेक अवकाशयात्री जातात आणि तेथे आवश्यक अशी विविध कामे करतात.
१९ सप्टेंबर १९६५ रोजी सुनीता विल्यम्सचा जन्म झाला. तिला विज्ञानाची आवड होती. १९९८ साली तिने अवकाशयात्रा शास्त्राच्या (एअरनॉटिक्स) शिक्षणाची सुरुवात केली. १२ डिसेंबर २००६ ला ती अवकाश स्थानकात जाऊन पोहोचली. तिने एकूण १९४ दिवस अवकाश स्थानकात विविध कामे केली. इतका प्रदीर्घ काळ अवकाशात राहण्याचा मान मिळवणारी जगातील ती पहिली महिला ठरली आहे.
अवकाश प्रवास पूर्ण झाल्यावर सप्टेंबर २००७ मध्ये ती भारतात आली होती. तेव्हा तिने आपले रोमांचक अनुभव सर्वांना ऐकवले. त्यामुळे भारतातील युवकांना आता अंतराळ-प्रवासाची ओढ लागली आहे. अज्ञात गोष्टींचा वेध घेतल्यानेच माणसाची प्रगती होते, हा संदेश सुनीताने आपल्या कर्तृत्वाद्वारे दिला आहे.
पुढे वाचा:
- इंदिरा गांधी निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- कल्पना चावला मराठी निबंध
- अपंग आणि मी निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी