एक उदयोजक – विठ्ठल कामत मराठी निबंध – Vithal Kamat Nibandh in Marathi

मराठी माणसाला नोकरीच करायला आवडते. मात्र, उदयोग वा व्यापार करण्याची त्याची तयारी नसते, असे म्हणतात. पण आजकाल काही मराठी उदयोजकांनी हे विधान खोटे ठरवले आहे. अशा यशस्वी उदयोजकांपैकी एक आहेत विठ्ठल कामत.

विठ्ठल कामत यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्या शिक्षणावर त्यांना मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती. पण त्यांनी नोकरी न करता मुंबईत अनेक लहान-मोठी उपाहारगृहे सुरू केली आणि ती यशस्वीही करून दाखवली.

हॉटेल उद्योगात यशस्वी होण्यासाठी, हॉटेलमध्ये करावी लागणारी सर्व कामे ते शिकले. सर्व कामे ते मनापासून करत. त्यांनी स्वयंपाक करण्यातील कसब मिळवले. मग आपला व्यवसाय परदेशातही विस्तारित केला. त्यासाठी त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. जे काम करायचे, ते उत्कृष्टच करायचे, असा त्यांचा निश्चय असतो.

आपले अनुभव इतरांना मार्गदर्शक व्हावेत; म्हणून त्यांनी ‘इडली, ऑर्किड आणि मी’ व ‘उदयोजक होणारच मी’ ही पुस्तके लिहिली. ‘ऑर्किड’ हे पर्यावरणाभिमुख पंचतारांकित हॉटेल सुरू केले. ‘आई’ या नावाने दुर्मीळ वस्तूंचे संग्रहालय उभे केले.

विठ्ठल कामत मराठी निबंध – Vithal Kamat Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply