आज महिती तुम्हाला येरवडा जेल बद्दल माहिती देणार आहोत, Yerwada Jail History in Marathi या बद्दल पण माहिती देणार आहोत, जर तुम्हाला येरवडा जेलची माहिती हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.

येरवडा जेल फोटो
येरवडा जेल फोटो

येरवडा जेल माहिती – Yerwada Jail History in Marathi

येरवडा कारागृहात जेल पर्यटन

पुणे शहराचे मध्यवर्ती कारागृह येर‍वडा येथे आहे. भारतातील अत्यंत ऐतिहासिक असे हे कारागृह १९ व्या शतकात बांधण्यात आले.

येरवडा कारागृहात जेल पर्यटन सुरुवात 26 जानेवारी 2021 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात जेल पर्यटनाची झाली. 500 एकरावर हे कारागृह आहे. राज्यात 45 ठिकाणी 60 जेल आहेत. आज त्यामध्ये सुमारे 24 हजार कैदी आहेत. महाराष्ट्र सरकारने कारागृह पर्यटन ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून घटनांचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने पर्यटन सुरु करण्यात आले.

येरवडा जेलचा इतिहास – Yerwada Jail History in Marathi

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्यसाधारण स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा, ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहात कैदेत ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार (24 सप्टेंबर 1932) येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुद्धा योग्य प्रकारे देशभाल करण्यात येत आहे. 1899 मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील अतिरेकी अजमल कसाबला देखील येथे फाशी देण्यात आली.

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमच ‘कारागृह पर्यटन’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन मार्गदर्शक पुरविला जाईल. दररोज 50 पर्यटकांना भेटीची परवानगी देण्य येणार आहे.

येरवडा जेल माहिती-Yerwada Jail History in Marathi
येरवडा जेल माहिती, Yerwada Jail History in Marathi

पुढे वाचा:

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply