फेरीवाला निबंध 10 ओळी
- फेरीवाला रोज आमच्या गल्लीत येतो.
- त्याचे नाव दीनानाथ आहे.
- तो आपल्या टोपलीत फळे आणतो.
- त्याच्याकडे ताजी फळे असतात.
- तो फळे योग्य भावात विकतो.
- तो गल्लीत आल्यावर मोठ्याने आवाज देतो.
- लोक त्याचा आवाज ऐकून घराबाहेर येतात आणि आपल्या आवडीची फळे विकत घेतात.
- संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळी त्यांची फळांची टोपली रिकामी होते.
- फेरीवाले भाज्या, कपडेसुद्धा विकतात.
10 Lines on Feriwala in Marathi
फेरीवाला मराठी निबंध | Fariwala Marathi Nibandh
आपल्या सर्वांना फेरीवाला माहीत आहे. त्याची आपण वाट देखील पहात असतो. तो गावोगावी, गल्लीगल्ली आणि घरोघर जावून त्याच्याकडील सामान विकत असतो. फेरीवाल्यांच्या डोक्यावरच त्यांचं सामान असतं. काहीजण सायकल किंवा हातगाडीवर सामान विकताना दिसतील. वस्तू विकण्याची त्यांची स्वतःची एक स्टाइल आणि आवाज असतो. त्यांचा आवाज ऐकून गृहिणी, मुले आदी धावत बाहेर येतात. फेरीवाल्याचे येणे त्यांच्यासाठी अगदीच सोयीस्कर होवून जातं. घरीबसल्या स्वस्तातल्या वस्तू मिळतात.
फेरीवाले, कपडेलत्ते, फळे-फुले, भाजी, मिठाई, खेळणे, भांडी आदी सगळं काही विकतात. त्यांची किंमत पण कमी असते. भाव कमी करून आणखीनच कमी किंमतीला विकत घेतल्या जावू शकते. फेरीवाला एक चांगला सेल्समन देखील असतो. तो ग्राहका९मानसशास्त्र ओळखून असतो आणि नंतरच व्यवहार करतो. फेरीवाले आपल्यासाठी अंत्यत उपयोगाचे आहेत. ते आपला वेळ वाचवतात, घरीच योग्य किंमतीला वस्तू देवून टाकतात. मोठेवयस्क, गृहणी आणि मुले यांना ते फारच सोयीस्कर पडतं. अनेकजण्ण तर फेरीवाल्याची प्रतिक्षा देखील करतात. तो जर नाही आला तर त्यांचे कामच थांबून जाते.
फेरीवाले बहुधा गरीबच असतात. आपला माल विकून कसंतरी जीवन जगतात. कधी कधी ते रेल्वे पटरीवर थांबून देखील आपला माल विकतात. फेरीवाले हुशार आणि बेईमान पण असू शकतात. आपण त्यापासून सावध असायला हवे.
अजून वाचा :
- मदतनीस निबंध 10 ओळी
- कपडे निबंध 10 ओळी
- जोडे निबंध 10 ओळी
- माळीकाका निबंध 10 ओळी
- शेतकरी निबंध 10 ओळी
- पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
- पोलिस निबंध 10 ओळी
- सैनिक निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी