1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी | Maharashtra Din Information in Marathi

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी – Maharashtra Din Information in Marathi

१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

इंग्रजांचे राज्य असताना राज्यकारभाराच्या सोयीनुसार प्रांतांची विभागणी केलेली होती. भारतात अनेक भाषा आहेत व देश स्वतंत्र झाल्यावर लोक अशी मागणी करू लागले की, प्रांतांची विभागणी भाषांनुसार व्हावी. भाषावार प्रांतरचनेच्या मागणीसाठी प्रथम आंध्र प्रदेशात आंदोलन सुरू झाले.

महाराष्ट्र दिन

२९ डिसेंबर १९५३ रोजी एस. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन करण्यात आला. या आयोगाने १० ऑगस्ट १९५५ रोजी आपला अहवाल दिला. या अहवालात अशा सूचना होत्या की, विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे व कन्नडभाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा व गुजराती प्रदेशासह द्वैभाषिक राज्य स्थापन करण्यात यावे.

या सूचनेनुसार द्वैभाषिक राज्य स्थापन झाले आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांची नेमणूक झाली.

परंतु मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी मराठी माणसांची मागणी होती. मुंबई महाराष्ट्राला द्यावी, की नाही या विषयावर आंदोलन उभे झाले. मोरारजी देसाईंनी ही चळवळ दडपण्यासाठी कठोर उपाय योजले. लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे सत्र सुरू झाले. निदर्शकांवर गोळीबार झाला. त्यात १०७ माणसे बळी गेली. त्या हुतात्म्यांचे स्मारक मुंबईला फ्लोरा फाउंटन येथे आहे. आता या ठिकाणाला ‘हुतात्मा चौक’ म्हणतात.

अखेर १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. १ मे हा दिवस

‘कामगार दिन’ म्हणूनही साजरा होतो.

पुढे वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने