इस्पितळास भेट निबंध मराठी-A Visit To A Hospital Essay in Marathi
इस्पितळास भेट निबंध मराठी-A Visit To A Hospital Essay in Marathi

इस्पितळास भेट निबंध मराठी – A Visit To A Hospital Essay in Marathi

मागील आठवड्यात मी एका मोठ्या इस्पितळात गेलो होतो. माझ्या एका मित्रास अपघात झाल्यामुळे त्यास तिथे भरती केले होते. मी माझ्या आईसोबत सिटी हॉस्पिटलला त्याला भेटण्यास गेलो.

ते एक मोठे इस्पितळ आहे. चौकशी केल्यावर आम्हास कळले की माझा मित्र कॅज्युअल्टी वॉर्ड मधे आहे. आम्ही त्या विभागात गेलो. माझा मित्र बराच अशक्त वाटत होता. परंतु आता त्याच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या. मी त्याच्याशी आमची शाळा, मित्र व अभ्यास याबद्दल गप्पा मारल्या. त्याच्या आईने आम्हास सांगितले की त्याला आणखी एक आठवड्यानंतर घरी नेण्याची परवानगी मिळेल. मी मित्राला वचन दिले की तो घरी परतल्यानंतर त्याच्या अभ्यास पूर्ण करण्यात मी त्याला नक्की मदत करीन. त्यानंतर त्याला लवकर बरा हो असे सांगून आम्ही परत निघालो.

जाताना आपण इस्पितळात एक चक्कर मारु असे मी माझ्या आईला सांगितले. इस्पितळ डॉक्टर्स, नर्सेस व वॉर्ड बॉय, पेशंट, त्यांचे नातेवाईक यांमुळे गजबलेले होते. काही पेशंट अतिशय आजारी होते. ते वेदनेने कळवळत होते. काही त्यांच्या बिछान्यावर झोपलेले होते. डॉक्टर्स पेशंटना औषधे देण्यात व उपचार करण्यात मग्न होते. नर्सेसच्या हातात सलाईन, औषधे, इंजक्शन इ. सामान होते. वॉर्ड बॉय साफसफाई करीत होते किंवा पेशंटना स्ट्रेचरवर इकडून तिकडे नेत होते. वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळे विभाग होते. एका बाजूस प्रयोगशाळा व X-Ray थिएटर होते. रुग्णांसाठी खाजगी खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. इस्पितळात दोन ऑपरेशन थिएटर्स होते. मला ऑपरेशन थिएटर बघायचे होते. परंतु आम्हाला परवानगी मिळाली नाही. सर्वात खालच्या मजल्यावर एक छोटेसे कँटीन होते. पेशंटचे नातेवाईक व डॉक्टर्स यांची तेथे गर्दी होती. इस्पितळ अतिशय स्वच्छ व नीटनेटके होते. संपूर्ण इस्पितळात औषधे व इस्पितळ स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा वास पसरलेला होता.

माझ्या आईला तो वास जास्त वेळ सहन होईना. म्हणून आम्ही लगेच परत घरी आलो. मला इस्पितळात जावे लागू नये अशी मागणी मी देवाजवळ केली.

पुढे वाचा:

Leave a Reply