आमच्या गावचा बाजार निबंध मराठी-Aamchya Gavacha Bazar Nibandh
आमच्या गावचा बाजार निबंध मराठी-Aamchya Gavacha Bazar Nibandh

आमच्या गावचा बाजार निबंध मराठी – Aamchya Gavacha Bazar Nibandh

माझे गाव म्हटले तर खेडे आणि म्हटले शहर आहे. माझ्या गावचा बाजार दर मंगळवारी भरतो. आजुबाजूच्या खेड्यातील शेतकरी आपले धान्य-भाजीपाला-फळे विकावयास घेवून येतात. व्यापारी लोकही फळफळावळ आणि धान्याच्या राशी बरोबर बाजारात आपले स्थान मांडून बसतात. शेतकरी स्वत:च्या कष्टाने पिकविलेली भाजी स्वस्त व सढळ हाताने गि-हाईकांना विकतात व दुपारीच भरलेल्या खिशाने परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र व्यापारी लोक माल खपण्यासाठी अधिक ओरडून आपला माल किती चांगला आहे याची निश्चिती देत असतात.

बाजारातील भाजीची रांग पाहताना ही घ्यावी की ती घ्यावी असे होऊन जाते शिवाय ताजी व स्वस्त असल्याने भाजी घेण्यासाठी गि-हाईकांची झुंबड उडते. बाजारात प्रत्येक मालाची स्वतंत्र रांग असते. पालेभाजी, धान्य एकीकडे तर कपडे, मटण, मासळी दुसरीकडे असते. गि-हाईक व मालवाले यांच्या मनोरंजनासाठी आपले डबडे वाजवत माकडवाला येतो. १-१ रुपये जमवत आपली पुंजी घेवून परततो. डोंबाऱ्याचा खेळ आपल्या तारेवरील कसरतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मधूनच आईसक्रीमवाला ‘टिण-टिण’ करत आपली गाडी फिरवत असतो. उन्हात फिरणाऱ्या लोकांना आईसक्रीम खावून तात्पुरता थंडावा मिळतो. बाजारात खरेदी करणाऱ्या पेक्षा वसुची किंमत विचारणारे व उगीचच फिरणारे जास्त गर्दी करतात.

बाजारा दिवशी संध्याकाळी विशेषकरुन सर्वजण खुश असतात. विक्रेते खिशातून पैसे खुळखुळवत घरी जातात आपल्या चिमुकल्यांना खाऊ, खेळणी चमचमीत, खरपूर भाजी घेऊन जातात. तर गिहाईक भाज्या, खाऊ आणि फळफळावळ घेऊन जातात. काहीजण नवीन कपडे खरेदी करतात. अशा प्रकारे दर मंगळवारचा आठवडी बाजार सर्वांना आनंद मिळवून देतो आणि तो रोज असावा असे वाटायला लावतो.

पुढे वाचा:

Leave a Reply