आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी-Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi
आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी-Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi

Set 1: आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी – Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi

तिरंगा हा आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे. १५ ऑगस्ट, १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या देशात सर्वत्र इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि त्या ठिकाणी आपला राष्ट्रध्वज वर चढवण्यात आला.

स्वतंत्र असलेल्या प्रत्येक राष्ट्राला त्याचा राष्ट्रध्वज असतो. हा राष्ट्रध्वज म्हणजे त्या राष्ट्राच्या गौरवाचे, सन्मानाचे आणि अस्मितेचे प्रतिकच असतो. स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असलेला हा ध्वज फडकत आहे.

आपला राष्ट्रध्वज केशरी, पांढरा आणि हिरवा ह्या तीन रंगांचा बनला आहे. ह्या झेंड्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. ह्या तिन्ही रंगांना विशेष अर्थ आहे. केशरी रंग हा जोश आणि शौर्य ह्यांचे प्रतिक आहे आणि पांढरा रंग हा पावित्र्य आणि मांगल्य ह्यांचे प्रतिक आहे. हिरवा रंग वैभव आणि समृद्धी ह्यांचे प्रतिक आहे.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोन दिवशी समारंभपूर्वक ध्वजवंदन केले जाते. दोन्ही दिवशी ध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाते. सैन्याच्या पलटणी ध्वजाला अभिवादन करतात. सर्व राज्यांत तेथील मुख्यमंत्री किंवा राज्यपाल ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तर नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. त्यावेळेस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच पंतप्रधानांचे भाषणही होते. आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला तिरंगा सदा सर्व काळ अगदी अनंत काळपर्यंत असाच फडकत राहो अशी प्रार्थनाही केली जाते.

खरोखर, आपण आपल्या ध्वजाचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे. ध्वज कधी, कुणी आणि कसा लावावा ह्याचे काही नियम आहेत. ते नियम जर मोडले तर शिक्षा होऊ शकते. पूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस फेरीवाले कागदाचे राष्ट्रध्वज किंवा बिल्ले विकत असत. तो दिवस संपला की हे सगळे कागदी ध्वज कच-यात जमा झालेले दिसत. आपल्या राष्ट्रध्वजाचा हा अपमान आहे. तो कदापी चालू देता कामा नये.

असा आहे आपला राष्ट्रध्वज आणि असे आहे आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व.

Set 2: आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी – Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi

विजयी विश्व तिरंगा प्यारा। झंडा ऊंचा रहे हमारा ॥ प्रत्येक देशाचा एक राष्ट्रध्वज त्या देशाच्या गौरव आणि सन्मानाचे प्रतीक असतो. आपला तिरंगी राष्ट्रध्वज देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या राष्ट्रीय भवनांवर फडकत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे प्रथम पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्या प्रथम ध्वजारोहण केले होते. तेव्हा पासून आजतागायत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेला तिरंगी झेंडा फडकत आहे.

आपला राष्ट्रीय ध्वज केशरी, पांढरा, हिरवा या रंगांनी बनला आहे. झेंड्याच्या मध्यभागी अशोकचक्र आहे. या चक्राला चोवीस आरे असून त्याचा रंग गडद निळा आहे. भारत सरकारने सम्राट अशोकाच्या या चक्राला आपलेसे करून भारताच्या प्राचीन गौरवाचे रक्षण केले.

तिरंग्याचे तीन रंग आपल्या विशेष गुणांचे प्रतीक आहेत. केशरी रंग उत्साह आणि वीरता दर्शवितो. यापासून प्रेरणा घेऊन आपल्या देशातील असंख्य वीरांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. पांढरा रंग पावित्र्य, उज्ज्वल चारित्र्य, सत्य आणि सांस्कृतीचे प्रतीक आहे.
हिरवा रंग वैभव आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. सळसळणाऱ्या हिरव्यागार पिकांचा हा रंग आहे. कधी आमच्या देशाला सोने की चिड़िया म्हणत.
हिरवा रंग त्याकडेच बोट दाखवितो. आज आमच्या देशाने कृषि, उद्योग, आणि व्यापाराच्या क्षेत्रात जी प्रगती केली हिरवा रंग त्याचाच सूचक आहे.

ध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्याचे २४ आरे विभिन्न धर्म, ऐकता व सर्वधर्मसमभावाची ओळख करून देतो. आपल्या देशातील सर्व धर्मांच्या अनुयायांना स्व-धर्माची उपासना व आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेकतेत एकता हेच आमच्या राष्ट्राचे वैशिष्ट्य आहे.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी ध्वजवंदन सभारंभपूर्वक केले जाते. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी इंडिया गेटवर ध्वज फडकविण्यात येतो. दोन्ही दिवशी ध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाते. सेनेच्या तुकड्या ध्वजाला अभिवादन करतात. निरनिराळ्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अनंतकाळ तिरंगा फडकत राहावा अशी प्रार्थना केली जाते. आपण आपल्या ध्वजाचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे.

Set 3: आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी – Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi

तिरंगा झेंडा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. हा आपली एकता, गौरव आणि शान याचे प्रतिक आहे. हा कोणत्याही सरकारी इमारतीवर, ठिकाणी आणि प्रसंगी शानदारपणे फडकताना दिसतो. १५ ऑगस्ट, १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि हा ध्वज आपल्या राष्ट्रीयतेची ओळख बनला आहे आणि याच्या सन्मानासाठी कोणताही भारतीय बलिदान द्यायला तयार आहे.

प्रत्येक देशाचा स्वतःचा एक ध्वज असतो. तीन रंग असणारा हा झेंडा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र दिनानिमित्त आपले पंतप्रधान लाल किल्यावर तो फडकावतात, गणराज्य दिवसा निमित्त इंडिया गेटजवळ राष्ट्रपती याला मोठ्या श्रद्धेने आणि सन्मानाने फडकवतात तसेच सलामी देतात.

झेंड्यात सर्वात वर केसरी रंग आहे. हा आपल्या शौर्याचे प्रतिक आहे. मध्ये पांढरा रंग आहे. आपली पवित्रता, शांतीप्रियता आणि अहिंसा दर्शवतो. खाली जो हिरवा रंग आहे. तो दर्शवतो की भारत एक कृषिप्रधान देश आहे. तिन्ही रंगाचे पट्टे समान आकाराचे आहेत. मध्ये भव्य असे अशोक चक्र आहे. त्यात २४ आरा आहेत. या चक्राचा रंग गडद निळा आहे. हे चक्र अशोकाच्या लॉयन कॅपिटलवरून घेण्यात आले आहे. हे चक्र आपली प्रगती, गती आणि सक्रियता या गोष्टी दर्शवतो. आपल्याला आपल्या ध्वजाचा मोठाच गर्व आहे. आपण याच्यासमोर सदैव नतमस्तक असतो. कोणालाही याचा अपमान नाही करू दिल्या जात. ज्या ज्योवळी तिरंगा फडकवला जातो, आपण सावधान स्थितीमध्ये येऊन ध्वजाबद्दलचा आपला सन्मान व्यक्त करता.

आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी-Apla Rashtradhwaj Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply