बस स्थानकावर एक तास निबंध – Bus Sthanakavar Ek Tas Marathi Nibandh

राधानगरीहून साताऱ्याला जाण्यासाठी निघालो. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर’ उतरलो आणि साताऱ्याला जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो.

स्थानकावर वाहनांची खूप गर्दी होती. जिकडे तिकडे बसेसच बसेस. पुणे, औरंगाबाद, मुंबई. रत्नागिरी, गोवा, कर्नाटक येथून गाड्या माणसांचा लोंढा आणून सोडत होत्या. सगळीकडे तोबा गर्दी होती. वेळावेळी माईकवरून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती दिली जात होती.

येणाऱ्या गाड्यांतील लगेज उतरवण्यासाठी हमालांची धावपळ उडत होती. सुटणाऱ्या गाड्यांमध्ये, गाड्यांच्या टपांवर सामान चढवण्यात काही हमाल गर्क होते. त्यांना सामान चढवण्यासाठी प्रवासी मदत करत होते.स्टँडच्या आवारात सगळीकडे गजबज, धावपळ, धांदल जाणवत होती, जो तो आपली बस पकडण्यासाठी यातायात करीत होता. रांगेत नियम धाब्यावर बसवून काही प्रवासी मध्येच घुसणाऱ्या प्रवाशांना अटकाव करीत होते. गर्दीतून बसमध्ये चढताना वृद्धांना, कडेवर बाळ असणाऱ्या स्त्रियांना त्रास होत होता. सगळीकडे धावपळ जाणवत होती. जो तो आपली बस पकडण्यात गर्क होता. काहींच्या नजरा बसेसच्या पाट्यांवर भिरभिरत होत्या. आपली बस कुठे लागली आहे का? हे शोधण्यात काहीजण गर्क होते. इतक्यात साताऱ्याला जाणारी बस लागली. आम्ही पटकन् गाडीत जाऊन बसलो.

पुढे वाचा:

Leave a Reply