एकीचे बळ निबंध मराठी – Ekiche Bal Essay in Marathi

एक शेतकरी होता. त्याला पाच मुलगे होते. ते अतिशय भांडखोर होते. त्यामुळे शेतकऱ्याला नेहमी चिंता वाटत असे. एकदा त्या शेतकऱ्याने पाच काठ्यांची एक मोळी बांधली व ती प्रत्येक मुलाला मोडायला सांगितली. प्रत्येकाने खूप प्रयत्न केला पण मोळी मोडणे कोणालाच जमले नाही.

मग शेतकऱ्याने ती मोळी सोडली आणि प्रत्येकाला एक एक काठी दिली. नंतर तो म्हणाला, “आता मोडा पाहू’ प्रत्येकाने काठीचे तुकडे तुकडे केले. तेव्हा शेतकरी म्हणाला, “मुलांनो, तुम्हीही न भांडता त्या काठ्यांच्या मोळीसारखे एकत्र राहिलात तर तुमचेही बळ वाढेल. लक्षात ठेवा, एकी हेच बळ !”

मुलांना त्याचे म्हणणे पटले. त्यांनी भांडखोरपणा सोडून दिला.

पुढे वाचा:

Leave a Reply