एक श्रेष्ठ गायिका – लता मंगेशकर मराठी निबंध – Lata Mangeshkar Nibandh in Marathi

सर्वांचे सहसा कोणत्याही बाबतीत एकमत होत नाही, असे म्हटले जाते. पण थोर गायिका कोण? तर ‘लतादीदी!’ याबाबत मात्र सर्वांचे नेहमीच एकमत असते. केवळ भारतातील लोकांनीच नव्हे, तर जगातील सर्व रसिकांनी हे मान्य केले आहे.

लतादीदी या थोर कलावंत स्व. दीनानाथ मंगेशकर यांची थोरली कन्या. दीनानाथांनी आपल्या लेकीची गायनकला तिच्या लहानपणीच जाणली होती. ते तिला गायन शिकवू लागलेही होते. पण दुर्दैवाने लवकरच त्या कलावंत पित्याचा अंत झाला व त्यांच्या लेकीला आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी आपल्या कलेचाच उपयोग करावा लागला.

तेव्हापासून- म्हणजे अगदी अजाण वयापासून- लतादीदींची गायनकला फुलू लागली. भारताच्या विविध भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायिली आहेत. किंबहुना लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने ती गाणी चिरंजीव झाली आहेत. इतकेच नव्हे, तर ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी संगीत दिलेली गाणी अनुपम आहेत. –

भारताने आपल्या या प्रिय कलावंत-दीदीला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला आहे.

लता मंगेशकर मराठी निबंध – Lata Mangeshkar Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply