एक शेतकरी गृहिणी मराठी निबंध

मी सुट्टीत नेहमी गावी जातो. गावी आमच्या शेजारी महादेवकाका व पार्वतीकाकू राहतात. त्यांचा मुलगा रामू हा माझा मित्र आहे. त्यांच्या घरी मी अधूनमधून जातो. त्या मला प्रेमाने काही ना काही खाऊ देतात.

महादेवकाका सकाळी शेतावर जातात. पार्वतीकाकू घरातील सर्व कामे आवरतात. मग थोड्या वेळाने त्या जेवण घेऊन शेतावर जातात. थोडा वेळ शेतात काम करतात. मग दोघेही शेतातच जेवतात. मग संध्याकाळपर्यंत तेथे काम करतात. पार्वतीकाकू खूप कष्टाळू आहेत.

संध्याकाळी पार्वतीकाकू घरी येतात; हातपाय धुतात आणि घरकामाला सुरुवात करतात. स्वयंपाक करता करता त्या रामूला अभ्यासाला बसवतात. त्याला मोठ्याने वाचायला सांगतात. त्याला पाढे व कविता पाठ करायला लावतात. पालकसभेच्या वेळी त्या शाळेत जातात. रामूला त्या नीटनेटकेपणाने राहायला लावतात.

सकाळी उठल्यापासून पार्वतीकाकू काम करत असतात. रात्री झोपेपर्यंत त्या काम करतात. पण कधीही थकलेल्या नसतात. त्या नेहमी प्रसन्न असतात.

पुढे वाचा:

Leave a Reply