निमंत्रण पत्रिका मराठी नमुना – Invitation Letter in Marathi

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना १

॥ श्री गजानन प्रसन्न ॥
॥ श्री अंबा प्रसन्न ॥

स. न. वि. वि.

आमचे येथे आमची कन्या चि. सौ. कां. कल्पना हिचा विवाह चि. भारत (श्री. दुष्यंतराव पटवर्धन व सौ. शकुंतला यांचे सुपुत्र) यांच्याशी करण्याचे निश्चित केले आहे. विवाह २६ डिसेंबर १९९१ रोजी करण्याचे ठरवले आहे. ह्यावेळी आपण अगत्य येण्याचे करावे व वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत अशी विनंती.

आपले,
आनंदराव गोडबोले
सौ. स्मिता गोडबोले

——————–

विवाहस्थळ : ब्राम्हण सहाय्यक संघ
शिवाजी पार्क, दादर,
मुंबई ४०००२८

विवाह मुहूर्त : सकाळी १० वाजून ३० मिनीटे

भोजन समारंभ : लग्नानंतर लगेचच.

स्वागत समारंभ : संध्याकाळी ६ ते ८-३०


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना २

॥ श्री जगदंबा प्रसन्न ॥

सप्रेम नमस्कार विनंती विशेष
चि. प्रवीण ( श्री. वामन भास्कर पाटील यांचे चिरंजीव)
गृहस्थाश्रमात पदार्पण करीत असून सहचारिणी या नात्याने
चि. सौ. कां. मधुरा (श्री. यशवंत दामोदर वैद्य यांची कन्या)
नियोजिली आहे. हा विवाह समारंभ ‘कोहिनूर मंगल कार्यालय’
प्रभात रोड, पुणे, शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी १९९१ राजी सकाळी
९ वाजून १२ मिनिटे या शुभ मुहुर्तावर होणार आहे.
जीवनातील या मंगल प्रसंगी वधू-वरांस आपल्या सारख्या
जिव्हाळ्याच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाची शिदोरी लाभावी, अशी
मनोमन प्रार्थना आहे. आपली उपस्थिती
आमचा आनंद द्विगुणीत करेल.

आपले
स्नेहाकांक्षी

रत्नाकर भास्कर पाटील
सौ. कमलाबाई र. पाटील


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ३

॥ श्री गजानन प्रसन्न ॥
॥ श्री दुर्गादेवी प्रसन्न ॥

स. न. वि. वि.
आमचे येथे श्रीकृपेकरून आमची जेष्ठ कन्या
चि. सौ. कां. सीमा
हिचा शुभविवाह
चि. दीपक
( श्री. विठ्ठल वासुदेव कर्वे यांचा कनिष्ठ पुत्र)

यांबरोबर माघ शुद्ध ५, शके १९९४, रविवार दि. ५.२.९२ रोजी करण्याचे याजिले आहे. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून, वधू वरांस शुभाशीर्वाद द्यावेत. ही विनंती.

आपले नम्र,
डॉ. रामचंद्र विश्वनाथ केळकर
सौ. पद्मा रामचंद्र केळकर

विवाह मुहूर्त : १० वाजून ४० मिनिटे
विवाहस्थळ : हॉटेल श्रेयस, आपटे रोड, पुणे ४.
स्वागत समारंभ : संध्याकाळी ६.३० ते ८.३०
घरचा पत्ता : रमा निवास, ६वी गल्ली, प्रभात रोड, पुणे ४.

जेवणासाठी निमंत्रण
सीमा व दीपक यांच्या विवाहाप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या भोजन-समारंभास आपण अवश्य उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.
वेळ सकाळी : ११.३० ते २

डॉ. रा. वि. केळकर
सौ. पद्मा रा. केळकर


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ४

॥ श्री महालक्ष्मी प्रसन्न ||

सप्रेम नमस्कार

१ जानेवारी १९९२ या नववर्षाच्या शुभदिनी आमचे द्वितीय चिरंजीव अशोक हे श्री. चंद्रकांत वामन पाटील आणि सौ. सरिता पाटील यांची ज्येष्ठ कन्या अनिता हिच्यासह वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करीत आहेत. ह्या मंगल दिनी साजऱ्या होत असलेल्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही आयोजिलेल्या स्वागत समारंभाला व अल्पोपाहाराला आपण आप्तेष्टमित्रांसह अवश्य उपस्थित राहावे. आणि उभयता वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावा अशी प्रेमपूर्वक नम्र विनंती.

आपले स्नेहांकित,
शांताराम दामोदर देसाई
सौ. प्रभावती शांताराम देसाई

घरचा पत्ता : भागीरथी निवास
केळुस्कर मार्ग (उ.)
शिवाजी पार्क, दादर,
मुंबई ४०००२८.
विवाहस्थळ : कोहिनूर हॉल
श्री सिद्धीविनायक मंदिरासमोर,
प्रभादेवी, मुंबई ४०००२९.
स्वागत समारंभ व भोजन : सायंकाळी ७ ते ९ वाजता

(कृपया आहेर आणू नयेत ही नम्र सूचना)


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ५

॥ श्री केशवराज प्रसन्न ॥

सप्रेम नमस्कार विनंती विशेष
श्री कृपेकरून आमचे येथे आमचा कनिष्ठ पुत्र
चि. राजेंद्र
याचा शुभविवाह
चि. सौ. कां. ज्योती
(सौ. व श्री. माधव प्रभाकर पटवर्धन यांची सुकन्या)
हीजबरोबर मंगळवार
दि. १८ फेब्रुवारी १९९२ रेजी नोंदणी पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण अगत्य यावे व वधूवरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही विनंती.

आपला नम्र
माधव विष्णू आगरकर
आगरकर परिवार

विवाहस्थळ : ब्राह्मण सभा हॉल,
गिरगाव, मुंबई ४
विवाहमुहूर्त : संध्याकाळी ६.५०
स्वागतसमारंभ व भोजनसमारंभ : संध्याकाळी ७ ते ९

घरचा पत्ता : पेंडसे वाडी
गिरगाव मुंबई, ४


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ६

|| श्री एकविरा प्रसन्न ||
सप्रेम नमस्कार,

आमचे येथे श्री कृपेकरून आमची
कन्या चि. सौ. कां. शुभांगी
हिचा शुभविवाह
चि. सुभाष

(श्री. द्वारकानाथ बळवंतराव प्रधान यांचा पुत्र)
याजबरोबर रविवार दि. २६ जानेवारी १९९२ रोजी करण्याचे योजिले आहे. आपण ह्या समारंभास उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत ही विनंती.

आपले नम्र
मदन भास्कर दिघे
सौ. मंजिरी मदन दिघे

विवाहस्थळ : सी. के. पी. हॉल
डी. एल. वैद्य रोड
दादर
मुंबई – २८
विवाहमुहूर्त : सकाळी ११.१५
भोजनसमारंभ : सकाळी ११.३० ते २ वाजेपर्यंत
स्वागतसमारंभ : सायंकाळी ७ ते ९
घरचा पत्ता : रमा भुवन
गोखले रोड (उ.)
दादर, मुंबई २८


निमंत्रण पत्रिका मराठी नमुना ६

॥ श्री गजानन प्रसन्न ॥

॥ श्री ॥

“फ्लाइट” असावी तर अशी दोन प्रेमळ हृदयांची.
पायलट आहे “विद्याधर
डॉ. यशवंत व सौ. उषा यांचा सुपुत्र
आणि को-पायलट आहे “वर्षा
जिचे पिता रवींद्र म्हात्रे व माता सौ. अंजनी
फ्लाइट आहे
९ फेब्रुवारी ९२’ ला
उड्डाण होईल ‘सकाळी ९.५२’ ला
एअरपोर्टवर सर्वांनी यावे. येताना
शुभाशीर्वादाचे पासपोर्ट घेऊन यावे.
भोजनासाठी प्रेमाचा आग्रह.
फ्लाइट किचनतर्फे भोजनाची व्यवस्था केली आहे.
तुमची वाट पाहात आहोत.

‘एअरपोर्ट’:
सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह
वीर सावरकर मार्ग
दादर, मुंबई २८

‘हँगर’ :
डॉ. य. वि. देसाई
‘वृंदा’
हिंदू कॉलनी ३ री गल्ली
दादर, मुंबई – १४


निमंत्रण पत्रिका इंग्रजी नमुना ७

Mr. Anand V. Godbole
&
Mrs. Smita Godbole

Request the pleasure of your company at the reception to celebrate the wedding of their daughter
Kalpana
with
Bharat
(Son of Shri & Sou. D. S. Patwardhan)

on Thursday 26th December 1991
between 6 p.m. and 8.30 p.m.
at
Brahaman Sahayak Sangh
Shivaji Park, Dadar
Bombay 400028

——————————

NO PRESENTS PLEASE

Res.
Kalpana Vihar, Veer Savarkar Marg, Dadar, Bombay 28


निमंत्रण पत्रिका इंग्रजी नमुना ८

Smt. Asha and Shri. Chandrakant Lele
Very cordially request the pleasure of your
company with family on the auspicious occasion of
the wedding of their son
Ch. CHARUDATTA
With
Ch. JAYASHREE
Daughter of Shri & Smt G. K. Athavale
on 8th March 1992 at 9.51 p.m. at the same place.

To grace the wedding of Charudatta you are cordially invited for Lunch at 12 noon on Sunday 8th March 1992 At:

Anand Mangal Karyalaya
Near Saras Baug
Pune 2.

Asha & Chandrakant


पुढे वाचा:

Leave a Reply