काखेत कळसा गावाला वळसा मराठी निबंध – Kakhet Kalsa Gavala Valsa Nibandh Marathi

एकदा माझे बाबा घाईघाईने शोधाशोध करत होते. मी त्यांच्या मदतीला धावले. त्यांचा मोबाईल सापडत नव्हता! थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले- तो त्यांच्या हातातच होता! आम्ही सर्वजण खो खो हसलो.

आई म्हणाली, “हे म्हणजे, काखेत कळसा आणि गावाला वळसा!” एखादया बाईच्या कमरेवर काखेत कळशी असते, मात्र ती गावभर कळशी शोधत फिरते. अगदी तशीच बाबांची स्थिती झाली होती.

असा अनुभव आपल्याला काही वेळेला येतो. आपले पेन दप्तरातच असते. मात्र आपण घरभर शोधत राहतो. आपण कधी कधी घाईगडबडीत असतो. त्या वेळी आपले चित्त विचलित होते. मग आपल्याला आपली वस्तू सापडत नाही. म्हणून मन शांत ठेवावे. शांतपणे विचार करावा. शांतपणे शोध घ्यावा. मग आपल्यावर अशी पाळी येणार नाही.

काखेत कळसा गावाला वळसा

पुढे वाचा:

Leave a Reply