कष्टेविण फळ नाही – यत्न तो देव जाणावा – मराठी निबंध

समर्थ रामदासांनी जगाला संदेश देताना प्रयत्न हाच परमेश्वर असे मानले आहे. यशप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे देवाची उपासना करणे होय.

वल्हे मारल्याशिवाय नाव पैलतीरी जाणार नाही. प्रयत्नवादी मनुष्य दैवावर कधीच विश्वास ठेवत नाही. दैववादी मनुष्य दे हरी पलंगावरी’ या भूमिकेचा असतो; ‘ तर प्रयत्नवादी मनुष्याची निष्ठा कर्तृत्वावर, परिश्रमावर असते. परमेश्वर त्यांना मदत करतो, जे स्वतः प्रयत्न करतात. आळशी लोकांना यशप्राप्ती होत नाही. उलट ‘आळसे कार्य भाग नासतो.’

अंतराळवीरांनी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, टेनिसपटू सानिया मिर्जा, थोर वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय अशा कितीतरी थोर व्यक्तींनी स्वकर्तृत्वावर आणि अथक परिश्रमाने यश मिळविले. यश हे ईश्वराचेच एक रूप आहे. जन्माला येणे दैवाच्या हाती असले तरी कर्म करणे हे आपल्या हातात असते.

विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी नियमित अभ्यास केला पाहिजे. अभ्यासातील सातत्य व चिकाटी आपल्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचवते, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

पुढे वाचा:

Leave a Reply