कालचे खेळ व आजचे खेळ मराठी निबंध

बालपणातील आनंदाची वेगवेगळी ठिकाणे असतात, त्यांपैकी एक म्हणजे खेळ. कितीही खेळले, तरी कंटाळा येत नाही, असे खेळ. “चला, सुट्टी झाली! आता खूप खूप खेळायचे!” ही प्रत्येक मुलाची इच्छा असते.

एक गंमत अशी की, काळानुसार या खेळांचे स्वरूप खूप बदलले आहे. कालचे खेळ वेगळे होते आणि आजचे खेळ वेगळे आहेत.

कालची मुले लपाछपी खेळत, विटीदांडू खेळत, लगोऱ्या लावत. ‘टिकरी’ हा तर मुलींचा मोठा आवडता खेळ होता. आजची मुले जास्त रंगतात ती क्रिकेटमध्ये. क्रिकेटमधील वेगवेगळे उच्चांक त्यांना पाठ असतात. काही मुलांना असे मैदानी खेळ नको असतात.

ते संगणकावरील खेळांत रमतात. मग त्यांना मोकळ्या हवेत जावेसेही वाटत नाही. ते संगणकासमोर तासन्तास बसून राहतात. ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.

मुलांनी मोकळ्या हवेत भरपूर खेळावे. म्हणजे त्यांना शारीरिक व मानसिक आिरोग्य व समाधान मिळेल.

पुढे वाचा:

Leave a Reply