कार्टून मराठी मराठी निबंध – Cartoon Nibandh in Marathi

टीव्हीवर वेगवेगळ्या वाहिन्या आल्यापासून आम्हा मुलांची खूप मजा झाली आहे. आमच्यासाठी एक कार्टूनची वाहिनी दिवसभर चालू असते.

टॉम आणि जेरी, मिकी माऊस, हनुमान, छोटा भीम, गणेशा ह्या कार्टूनमालिका मला खूपखूप आवडतात. आईबाबा आम्हाला सारखा टीव्ही बघू देत नाहीत. कारण ते डोळ्यांना चांगले नसते. शिवाय शाळा असते, अभ्यास असतो. आम्ही मैदानी खेळ खेळले पाहिजेत असाही आईबाबांचा कटाक्ष असतो.

पूर्वी घरात आजीआजोबा असत. रोज रात्री आजी गोष्ट सांगून मुलांना झोपवत असे. त्या गोष्टीत राम, कृष्ण, सिंड्रेला, प-या, राजकुमार, राक्षस, अलीबाबा असे लोक असत. परंतु हल्ली घरात जास्त माणसेच नसतात. आमच्या घरातही आई, बाबा, मी असे तिघेच आहोत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आजीच्या तोंडून ऐकण्याऐवजी मी कार्टूनच्या रूपाने पाहाते.

कार्टून बनवणारे निर्माते, त्यातली चित्रे काढणारे चित्रकार आणि त्यांना लहान मुलांचे आवाज देणारे कलाकार हे खूपच कल्पक असतात. लहान मुलांचे चित्रपट काढणे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात ते काम खूप अवघड असते.

“जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है’ हे हे जंगलबुकमधील गाणे मला खूप आवडते.

पुढे वाचा:

Leave a Reply