Set 1: माझे घर मराठी निबंध – Majhe Ghar Nibandh Marathi

घर ही अशी जागा असते जिथे आपल्याला मोकळेपणा वाटतो. कधीही बाहेर गेले की घरी यायची ओढ वाटते. माझेही तसेच आहे.

आमचे घर एका चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. आमच्या घरात हॉल, दोन झोपण्याच्या खोल्या आणि स्वयंपाकघर आहे. शिवाय घराला दोन बाल्कन्यासुद्धा आहेत.

घरात मी, आईबाबा आणि आजीआजोबा एवढी माणसे राहातो. आमच्या बाल्कनीत आजीने गुलाब, तुळस, मोगरा, ओवा, अबोली अशी छान छान झाडे लावली आहेत. आमच्या हॉलमध्ये टीव्ही ठेवला आहे तसाच आजीआजोबांच्या खोलीतही दुसरा टीव्ही आहे.

मी कधीकधी घरात पसारा करतो. घर म्हटले की तसे होणारच असे आजी म्हणते. पण त्याच वेळेस ती मला सगळे आवरायलाही लावते. आमच्या घरातले वातावरण मनमोकळे आहे. रात्री जेवणे झाल्यावर आजोबा, आजी, आई, बाबा आणि मी थोडावेळ एकत्र बोलत बसतो. काही ठरवायचे असेल तर आम्ही सगळे मिळून ते ठरवतो.

अशा कौटुंबिक वातावरणामुळे आमचे घर हे नुसत्याच भिंती आणि छप्पर न राहाता ते खरेखुरे घर बनते.

Set 2: माझे घर मराठी निबंध – Majhe Ghar Nibandh Marathi

घर ही संकल्पनाच माणसाला किती सुखावून जाते. दिवसभर काम करून प्रत्येकाला आपल्या घरी जायची ओढ लागत असते. आपल्या घरी आपल्याला मोकळेपणा मिळतो. तिथे आपली मायेची माणसे असतात.

घर म्हणजे काही नुसते छप्पर नसते तर ती त्या छपराने त्या कुटुंबावर घातलेली मायेची पाखर असते. घर म्हणजे काही नुसत्याच भिंती नसतात. तर त्यात राहाणा-या माणसांनी आपल्या स्वप्नांचे रंग त्या भिंतींना लावलेले असतात.घर म्हणजे काही नुसती जमीन नसते तर त्यात राहाणा-या माणसांनी आपल्या विश्वासाचा पाया दिलेला असतो म्हणूनच ते घर टिकून असते.

आपण आपल्या घराच्या दारासमोर तोरण बांधतो, त्याच्या उंब-याशी स्वस्तिकाचे शुभचिन्ह काढतो. त्यामुळे घराला घरपण मिळते. घरात थकून भागून येणा-या माणसाला घरी आले की बरे वाटते. प्रसन्न वाटते.

कधीकधी ह्या घरात भांडणेही होतात. भांड्याला भांडे लागते. तेव्हा घरातील एखादे माणूस चिडून रागावून घराबाहेर निघून जाते. परंतु राग ओसरला की आपोआपच घरची आठवण येते आणि पाय घराकडे वळतात. म्हणूनच कुणाचेही घर कधीही उद्ध्वस्त होता कामा नये. अशी आहे घराची किमया.

माझे घर मराठी निबंध – Majhe Ghar Nibandh Marathi Madhe

पुढे वाचा:

Leave a Reply