राजगुरू मराठी निबंध – Rajguru Essay in Marathi

‘तुम्ही किती जगलात याला महत्त्व नाही, तर कसे जगलात यालाच महत्त्व आहे,’ ही उक्ती क्रांतिकारक राजगुरू यांना अक्षरश: लागू पडते. २००८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू. या कुटुंबाचे मूळ आडनाव ‘ब्रह्मे’ होते. शाहू महाराजांचे गुरू कचेश्वर ब्रह्मे हे त्यांचे पूर्वज. म्हणून त्यांचे नाव ‘राजगुरू’ पडले. २४ ऑगस्ट १९०८ हा शिवराम राजगुरूंचा जन्मदिन.

राजगुरू हे अत्यंत हुशार होते. मात्र, स्वभावाने खूप तापट होते. त्यांनी शिक्षणासाठी घराचा त्याग केला. ते काशीला गेले आणि तेथे त्यांनी ज्ञानार्जन केले. त्यानंतर ते बाबाराव सावरकर व चंद्रशेखर आझाद यांचे अनुयायी झाले. अचूक नेमबाजी हे राजगुरूंचे वैशिष्ट्य होते.

त्यांनी श्रद्धानंदस्वामींच्या खुनाचा बदला घेण्यासाठी निजामावर हल्ला केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास जिवे मारण्याचे ठरवले. राजगुरूंनी स्कॉटच्या साँडर्स या सहकाऱ्याला मारून सूड उगवला.

भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. राजगुरू त्यांच्यात सामील झाले. परंतु आपापसांतील फितुरीमुळे त्यांना अटक झाली व २३ मार्च १९३९ रोजी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ते फासावर गेले.

त्यांचे ‘खेड’ हे गाव आज ‘राजगुरुनगर’ म्हणून ओळखले जाते. तेथील प्रशालेला व महाविदयालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply