ऋतु वर मराठी निबंध – Rutu Var Nibandh in Marathi

आपल्यासाठी ऋतू फार महत्त्वाचे आहेत. आपण यांच्यांशी बांधलेले आहोत. कारण ते आपणास असाधारणपणे प्रभावित करतात. आपणच नव्हे तर प्रत्येक प्राणी यामुळे प्रभावित प्रेरित होतो. ऋतूचा संबंध प्रदेश, प्रांत, देश वा स्थानाच्या दीर्घकालीन वैशिष्ट्यांशी आहे. ही स्थितीच तेथील वातावरण आणि वायुमंडलाची निर्मिती करते. अशा प्रकारे ऋतू एका व्यापक स्थितीचे द्योतक आहे ज्यात तापमान, आर्द्रता, हवा, मेघ, पाऊस, दाब आदी सर्वांचा समावेश आहे. जलवायू (Climate) याचे एक छोटे पण अभिन्न अंग आहे. वातावरणात तीव्र आणि स्थानिक परिवर्तन होत असते. उदा. आपण हिवाळा, उन्हाळा, पावसाळा याविषयी बोलतो. हे ऋतू दीर्घकालीन आणि स्थायी असतात. याउलट वातावरणाचे प्रभाव क्षेत्र तुलनात्मक दृष्टीने मर्यादित असते आणि त्यात लवकर परिवर्तन होते.

ऋतूंमुळे वृक्षवेली वनस्पती जिवांप्रमाणेच प्रभावित होतात. ऋतुचक्र वातावरणावरच आधारित असते. वातावरणानुसारच ते जातात, येतात, बदलतात. त्यांचा क्रम सामान्यपणे निश्चितच असतो. आपली सर्व कार्ये ऋतूंवर अवलंबून असतात. शेतकरी ऋतूप्रमाणेच जमीन नांगरतो, पेरणी करतो, पिकांची कापणी करतो, नावाडी आणि कोळी समुद्रावर जातात. प्रत्येक गोष्टीचा एक मोसम असतो. उन्हाळ्यात थंड पेये, आईस्क्रीम, रसाळ फळे, द्रव पदार्थ इत्यादींचे सेवन केले जाते. लोक हलकी तलम वस्त्रे परिधान करतात. याउलट हिवाळ्यात भारी लोकरीचे कपडे घालतात. गरम पदार्थांचे सेवन करतात. रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. अतिशीत प्रदेशात पाण्याचा बर्फ होतो आणि कामे थांबतात. अस्वलादी प्राणी शीत समाधीत प्रवेश करतात. पक्षी उष्ण प्रदेशात जातात.

मेघ, विजा, पाऊस, हिमपात, गारा, वादळे, समुद्र, नद्या, पर्वत, वने, सूर्याचे उष्णतामान इत्यादी ऋतूचे अभिन्न अंग आहेत. हे सर्व मिळून ऋतूंची निर्मिती करतात. आपण यास ऋतू यंत्राचे सुटे भाग म्हणू शकतो. हे यंत्र विश्वव्यापी आहे. याची सर्व कार्ये व परिणामही क्विव्यापी आहेत. ऋतूंची माहिती आणि त्याचा योग्य अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पूर्वी ढग, हवा, तापमान इ. पाहून ऋतूचे पूर्वानुमान करण्यात येत असे त्यात स्थानिक घटक जास्त असत. परंतु आता कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून अधिक व्यापक आणि विश्वसनीय अंदाज करता येतो. हे उपग्रह पृथ्वीपासून खूप उंच अंतरावर दूर असतात. पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत ऋतू यंत्रावर बारीक नजर ठेवतात आणि सर्व परिवर्तने, हालचाली इत्यादी ची चित्रे पृथ्वीवर पाठवीत राहतात. ऋतूंचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून बव्हंशी बरोबर अंदाज करतात. त्यानुसार लोकांना सूचना देतात. रेडिओ, दूरदर्शन आणि वृत्तपत्रांत ऋतूंची महिती व अंदाज वर्तविणे यूही आवश्यक गोष्ट बनली आहे. ऋतुसंबंधी विशेष बुलेटिन पण प्रसारित करण्यात येतात. वादळ, पूर इत्यादी ची पूर्वकल्पना वेळेवर दिली जाते.

ऋतू समजणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. तात्पर्य, निसर्गात जे काही घडत आहे ते का व कसे घडते? या परिवर्तनाचा आपल्यावर काय प्रभाव पडेल? उदा. आपणास हे माहीत होणे आवश्यक आहे की, सूर्याची उष्णता व ऊर्जा आपल्या वायुमंडळास कशी आणि किती प्रभावित करीत आहे? हिम कुठे कुठे आणि किती प्रमाणात वितळून पाणी बनून त्याची वाफ बनते? हवेचा कुठे आणि किती दाब आहे? समुद्राची स्थिती कशी आहे? मान्सूनची घडामोड़ कशी चालू आहे? इत्यादी.

याखेरीज अंतराळात पृथ्वी व अन्य ग्रह आणि सूर्याची स्थिती, गती इत्यादी चे ज्ञानही या संदर्भात खूप आवश्यक आहे. या स्थितीत आपले दिवस रात्र, जल, वायू आणि ऋतूंची निर्मिती करतात. दुपारच्या वेळी आपणास सर्वात जास्त प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते. सकाळी आणि संध्याकाळी कमी मिळते. याउलट रात्री वातावरण थंड असते. कुठे भरपूर पाऊस पडतो तर कुठे पूर येतो, कुठे दुष्काळ पडतो. कुठे वाळवंट आहे तर कुठे खूप घनदाट पावसाळी वने आहेत तर कुठे न वितळणारा हिमखंड. कधी गारा पडतात तर कधी हिमवर्षाव होतो. कधी असहनीय उष्णता असते. कधी आकाश स्वच्छ, नितळ, सुंदर गर्द निळे असते तर कधी भीतीदायक काळ्याभोर ढगांनी आच्छादलेल्या आकाशात विजांचा कडकडाट होत असतो. हे सर्व ऋतूंचे विभिन्न व विचित्र खेळ आहेत. ज्याच्याशी आपले जीवन घट्ट बांधलेले आहे.

वायुमंडळात वाफेच्या रूपात उपस्थित असलेल्या पाण्याचे कण एकत्र येऊन पावसाचे ढग बनतात व पाऊस पडतो. सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होऊन वर जाते व थंड होते. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. जेव्हा ही हवा हलकी होऊन वर जाते व खूप थंड होते तेव्हा हिमवर्षाव होतो. पाण्याची वाफ सघन होते व पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ असते तेव्हा धुके पडते. अशा प्रकारे समुद्रातही उष्ण व थंड पाण्याचे प्रवाह असतात. जे आपल्या जल वायूला प्रभावित करतात. उष्ण प्रवाह हवेला गती आणि दिशा देतात. पृथ्वीच्या गतीचाही यावर प्रभाव पडतो. उत्तर गोलार्धात घड्याळायाच्या काट्यांच्या दिशेने जातात. याउलट दक्षिण गोलार्धात घडते. प्रशांत महासागर व उत्तर दक्षिणेतील अटलांटिक महासागरातील प्रवाह सर्वात शक्तिशाली आहेत.

सारांश, आपण असे म्हणू शकतो की ऋतू आणि जलवायूचे योग्य ज्ञान आणि अंदाज आपल्या जीवन मरणाशी निगडित आहे. ओरिसामध्ये आलेले सुपर सायक्लॉन याचे ज्वलंत उदा. आहे. यात हजारो लोक मृत्यू पावले. वित्तहानी किती झाली याचा अंदाज लावता येणे कठीण आहे. जर आपणास याची पूर्वकल्पना असती तर यापासून बचाव करता आला असता.

पुढे वाचा:

Leave a Reply