Set 1: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध – Winter Essay In Marathi
Table of Contents
हिवाळा हा सर्वात आनंददायक ऋतू. या काळात छान थंडी असते. अंगाला धाम येत नाही. कंटाळा येत नाही. छान छान स्वेटर घालायला मिळते.
हिवाळ्यातील सकाळ सुखद व छान असते. अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते. बाहेर फिरायलाही मजा येते. खूप थंडी असते, तेव्हा बोलताना तोंडातून वाफ येते. त्याची खूप गंमत वाटते. अनेकदा खूप धुके असते. मग जवळचेही दिसत नाही. हिवाळ्यात झाडांखाली पानांचा सडा पडतो. काही झाडांना फुलेही येतात.
हिवाळ्यात अनेक ठिकाणी जत्रा भरते. शाळेतल्या क्रीडास्पर्धा, सहली व स्नेहसंमेलने याच काळात होतात. आईबाबाही सहलीला नेतात. असा हा ऋतू आनंददायक आहे. तो मला खूप आवडतो.
Set 2: थंडीतील सकाळ मराठी निबंध – Maza Avadta Rutu Hivala Marathi Nibandh
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंमध्ये मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो. या ऋतूत उन्हाळ्यातील दाहकता व घामाचा चिकचिकाट नसतो; पावसाळ्यातील चिखल नसतो. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. हिवाळ्यातील सका सुखद असते.
आमच्या गावाकडील हिवाळ्यातील सकाळ मला खूप आवडते. सर्वत्र धुकेच धुके पसरलेले असते. दूरवर डोंगराचे फक्त सुळके दिसतात, अधूनमधून झाडांचे शेंडे दिसतात. देवळाचा कळसच तेवढा चमकत असतो. सर्वत्र पानांचा सडा पडलेला असतो. पानांवर, गवतावर सर्वत्र दव पडलेले असते. अशा वेळी रानातून हिंडताना खूप खूप . मजा येते.
काहीजण शाल पांघरून फेरफटका मारतात. मुले रंगीबेरंगी स्वेटर घालून मजेत शाळेत जात असतात. मला कधी कधी जाडजूड पांघरूण घेऊन अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते.
अशी ही थंडीतील प्रसन्न सकाळ वर्षभर हवी!
Set 3: हिवाळ्यातील एक दिवस मराठी निबंध – Hivalyatil Ek Divas Nibandh in Marathi
हिवाळा हा शब्दच मला फार आवडतो. कारण आमच्या मुंबईत सहसा आम्हाला हिवाळा असा काही प्रकार फारसा अनुभवायलाच मिळत नाही.
माझी आई सांगते की पूर्वी दिवाळीच्या सुमारास थंडी पडत असे. परंतु आता मात्र डिसेंबरमध्ये ख्रिसमस येतो तेव्हा कुठे जेमतेम थंडी पडल्यासारखी वाटते. ती थंडी फेब्रुवारीपर्यंत थोडीशी टिकते. मात्र एकदा का मार्च महिना सुरू झाला की मात्र उन्हाची जोरदार रणरण सुरू होते.
ह्या वेळेस जानेवारी महिन्यात मुंबईत काही दिवस चांगलीच थंडी पडली होती. हिमालयातील थंड वा-यांनी दिशा बदलली त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली होती, त्याचा थोडासा परिणाम म्हणून आमच्या मुंबईतही गारठाआला होता.
मला चांगले आठवते आहे की त्या हिवाळ्याच्या दिवशी मी शाळेत जायला सकाळी लौकर उठलो तर माझे दात थंडीने कडकड वाजू लागले होते. मग आईने मला अगदी कढत पाणी आंघोळीला दिले तेव्हा कुठे जरासे बरे वाटले. तिने स्वेटरही पेटीतून काढून ठेवला होता. कधी नव्हे तो मी स्वेटर घालून शाळेत गेलो तेव्हा बाहेर सात वाजून गेले तरी अंधारल्यासारखे वाटत होते. सर्वत्र गारठा होता. किंचितसे धुकेही जाणवत होते.
परंतु जरा वेळाने सूर्य आकाशात आला आणि धुके कुठल्याकुठे पळून गेले. हवा उबदार झाली तशीच ती सुखदही झाली. त्या उत्फुल्ल हवेत मला तर खेळायला जावेसेच वाटू लागले. सुदैवाने आमच्या शाळेत त्या दिवशी क्रिडास्पर्धा होत्या. त्यामुळे अभ्यास काही नव्हताच. तो सुंदर दिवस आम्ही मुलांनी शाळेच्या मैदानावरच घालवला. मी खोखोच्या संघात होतो. त्यामुळे तर मी प्रत्यक्ष खेळातच होतो. थंड हवेत खेळताना अजिबात दमल्यासारखे वाटत नव्हते.
वर्गातील इतर मुलेही आम्हाला टाळ्या वाजवून उत्तेजन देत होती. त्यामुळे हिवाळ्यातला तो दिवस एवढा सुंदर गेला म्हणून सांगू? मला वाटते की क्रीडास्पर्धा आणि वार्षिकोत्सव म्हणूनच हिवाळ्यात ठेवत असावेत. त्या हवेमुळे खरोखरच दमछाक कमी होते.
देवा, आमच्या मुंबईला तू नेहमीच अशी हवा दिलीस तर किती छान होईल?
Set 4: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
आमच्या मुंबईत फार हिवाळा पडतच नाही. त्यातच हल्ली वातावरणात बदल झाला आहे, त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीत थोडीशी हवा चांगली असते. परंतु मी पुण्याला मामाकडे किंवा नाशिकला मावशीकडे डिसेंबरच्या सुट्टीत जातो. तिथे मात्र पहाटे आणि संध्याकाळी चांगली थंडी असते. तेव्हा मला माझ्या आईने माझ्यासाठी विणलेला स्वेटर घालता येतो.
आपल्या देशात काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबचे काही भाग ह्या ठिकाणी हिवाळ्यात भरपूर थंडी पडते. काश्मीरमध्ये तर बर्फच पडतो. हिवाळ्यात झाडांची पानेही गळून पडतात. सैबरियासारख्या उत्तर ध्रुवाजवळील भागात तेव्हा एवढी थंडी असते की सजीव प्राण्यांना राहाणे अवघड व्हावे. त्यामुळे त्या भागातील अनेक पक्षी आपल्या भारतात स्थलांतर करून आलेले आपल्याला दिसतात ते ह्या हिवाळ्यातच बरे का ! कारण आपल्याकडचा उन्हाळा त्यांना नक्कीच सोसतो.
आपला मकर संक्रांत हा सण हिवाळ्यातच येतो. त्या वेळेस तीळगूळ आणि गुळाच्या पोळ्या बनवण्याची प्रथा आहे कारण गूळ आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ आहेत आणि त्यांच्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
हिवाळ्यात लोकांना थंडी वाजते म्हणून ते गरम कपडे विकत घेतात. त्यामुळेच आपल्याला मुंबई आणि पुणे येथे गरम कपड्यांची गाठोडीघेऊन विकायला आलेले तिबेटी लोक दिसतात.
दिवाळी, नाताळ आणि संक्रांत हे सणही हिवाळ्यातच येतात. तसेच हिवाळ्याच्या काळात मुंबईची हवा नेहमीपेक्षा बरीच चांगली असते म्हणून मला हिवाळा हा काळ खूप आवडतो.
Set 5: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
पावसाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे हिवाळा होय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे चार महिने हिवाळ्याचे असले तरी कडक थंडी डिसेंबर महिन्यातच असते. थंडीची चाहूल लागताच लोक ऊबदार कपडे वापरायला सुरुवात करतात.
खेड्यात हिवाळ्याचे स्वागत शेकोटीने होते. सकाळी आणि संध्याकाळी लोक शेकोटी करतात. शेकोटीवर शेतीतल्या, राजकारणातल्या गप्पा रंगतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत लोक शेकोटीत सामील होतात आणि थंडीपासून आपला बचाव करतात.
हिवाळा ऋतू माझ्या आवडीचा आहे. असे कोणी म्हणत नसले तरी हिवाळ्यात आपल्याला खूप भूक लागते. खाल्लेले सारे काही पचते. लोक आहारात मांस, अंडी, लोणी, भाज्या यांचा वापर मोठ्या प्रमाणात करून थंडीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतात. आपली प्रकृती सुधारण्यासाठी, व्यायामासाठी आणि अभ्यासासाठी हा ऋतू उत्तम आहे असे डॉक्टर नेहमीच सांगतात.
हिवाळा ऋतू आरोग्यदायी आहे, असे सगळेच सांगत असले तरी सकाळी लवकर उठून शाळेला जायचे म्हणजे नकोसे वाटते. त्यातच पहिल्याच तासाला काहीतरी लेखन करायचे म्हणजे त्याहून कठीण. अशावेळी सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत एखादी कविता शिकायला किंवा नवीन धडा शिकायला खूप मौज वाटते.
पुढे वाचा:
- माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी
- माकडांची शाळा निबंध मराठी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी
- महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी
- महात्मा बसवेश्वर निबंध मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी