रेडिओ मराठी निबंध – Radio Essay in Marathi
मनुष्य नेहमी स्वत:चे मनोरंजन करून घेतो. मनःशांतीसाठी नवे नवे शोध लावतो. रेडिओ हा त्यापैकीच एक आहे. इटालीतील मार्कोनी आणि भारतातील जगदीशचंद्र बोस यांनी ध्वनितरंगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमधून न्यूझिलंडला एक बातमी पाठविण्यात मार्कोनीला १९०१ मध्ये यश मिळाले. यापूर्वी १८५९ मध्ये जगदीशचंद्र बोसांनी असाच एक छोटासा प्रयत्न केला होता. परंतु रेडिओ बनविण्याचे सर्व श्रेय मार्कोनिला जाते.
भारतातील पहिले रेडिओ स्टेशन १९२७ मध्ये स्थापन झाले. आता अनेक रेडिओ केंद्रे आहेत. रेडिओचा आवाज आपल्यापर्यंत कसा पोहोचतो? प्रथम आकाशवाणी केंद्र विजेद्वारा ध्वनीला विजेच्या लहरीत परिवर्तीत करते. मग या लहरींना आकाशात सोडले जाते. त्या लहरींना रेडिओ रिसिव्हर पकडतो. ज्यावेळी रेडिओ चालू केला जातो तेव्हा कार्यक्रम ऐकू येतो. स्थानिक, प्रांतिक, विदेशी असे रेडिओ केंद्रांचे तीन प्रकार असतात स्थानिक रेडिओवर स्थानिक कार्यक्रम तर प्रांतिक रेडिओवर देशभरातील कार्यक्रम ऐकू शकतो. रेडिओला एक इकडून तिकडे फिरणारा काटा असतो. त्याच्या सहाय्याने आपण हवे ते स्टेशन लावू शकतो.
रेडिओचे अनेक फायदे आहेत. घर बसल्या देश विदेशांतल्या बातम्या, गाणी, नाटके, खेळांच्या स्पर्धांचे प्रत्यक्षदर्शी वर्णन, मुलाखती ऐकता येतात. स्त्रियांसाठी असणारे कार्यक्रम उदा. पाककृती, कपड्यांची काळजी, घरगुती चिकित्सा यामुळे माहिती व मनोरंजन होते. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांत बी-बियाणे, मोसमात घेतली जाणारी विशिष्ट पिके, पिकांची काळजी, कापणी व विक्री व्यवस्था आदींबद्दलची सविस्तर माहिती रेडिओवर मिळते. याखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती, सणांसंबंधी विशेष कार्यक्रम मुलासाठी उपदेशपर गोष्टी इ. अनेक कार्यक्रम प्रसारित होतात. आज रेडीओ लहानात लहान खेड्या-पाड्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे संपर्क प्रस्थापित करण्याचे ते एक चांगले साधन आहे. सरकार त्याचा उपयोग जनजागृतीसाठी करते.
जहाजे, पोलिस व सेनेच्या वाहनांतही रेडिओ असतात. त्याद्वारे ते आपल्या मुख्य केंद्राला संदेश देतात. हे रेडिओ वेगळ्या प्रकारचे असतात. विमान जर संकटात सापडले तर रेडिओद्वारेच विमानतळावर संदेश पाठवितात. ट्रांझिस्टर हे सुद्धा रेडिओचेच रूप आहे. तो कुठेही नेता येतो. खिशात, बॅगेत ठेवता येतो. विश्वात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना रेडिओमुळे क्षणात आपल्या पर्यंत पोहोचतात. व्यावसायिक जाहिरातीसुद्धा रेडिओवरून प्रसारित होतात.
रेडिओ अस्तितवात आला तेव्हापासून लोकप्रिय झालेला आहे आणि त्याची हो लोकप्रियता कधीही ओसरणार नाही. रेडिओ वीजेवर तसेच सेलवरही चालतो. ही विज्ञानाची एक अनोखी देणगी आहे. आजकाल मोबाईल किंवा कॉम्प्यूटरवरही रेडीओ ऐकण्याची सोय झाली आहे. असे हे हलके, स्वस्त मनोरंजनाचे साधन मला खूप आवडते.
पुढे वाचा:
- रुपयाची आत्मकथा मराठी निबंध
- रिक्षावाला निबंध मराठी
- राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी
- राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध
- रात्र रागावली तर निबंध मराठी
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- राजभाषा मराठी निबंध
- रस्त्यावरील भटक्या कुत्र्याची कैफियत
- रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी
- रमजान ईद निबंध मराठी
- रक्षाबंधन निबंध मराठी
- रंगांची दुनिया मराठी निबंध
- योगासने मराठी निबंध
- युवकांचा असंतोष मराठी निबंध