शब्द हरवले तर मराठी निबंध – Shabd Harvale Tar Marathi Nibandh
‘शब्द ! शब्द! आणि शब्द !’ कुठेही जा, वेगवेगळ्या भाषेतले शब्द कानांवर येतात. त्या सगळ्या शब्दांचा अर्थबोध होतोच असे नाही. पण या शब्दांचे प्रकार तरी किती? काही जोडणारे, तर काही तोडणारे. कुणाचे शब्द हे मनावर मोरपीस फिरवल्यासारखे सुखद वाटतात, तर कुणाचे शब्द कट्यार काळजात घुसावी तसे जिव्हारी लागतात. काही गोजी ना होतात ता काटी भातना या शब्दांच्या पलीकडच्या असतात.
शब्द रुसले तर माणसाला सर्वस्व हरवल्यासारखे होईल. तो अक्षरशः हवालदिल होईल. स्वत:चा आनंद तो कसा व्यक्त करणार? दुःखाच्या दबलेल्या उमाळ्यांना कशी वाट मिळणार? कारण भावना व्यक्त करायला माणसाला शब्दांचा मोठा आधार असतो. शब्द नाहीत म्हणजे साहित्य नाही. शारदादेवीचा दरबार सुना सुना पडेल. शब्द नाहीत म्हणजे उत्तम कविता नाहीत. मायेच्या ओव्या नाहीत. एवढेच काय पण, बेफाम दिल्या जाणाऱ्या इरसाल शिव्याही नाहीत.
शब्द रुसले तर माणूस आणि इतर प्राणी यांत अंतरच राहणार नाही. माणसालाही आपल्या भावना हातवारे करून वा तोंडातून वेगवेगळे आवाज काढून व्यक्त कराव्या लागतील. मग माणूस आपल्या मनातील भावभावना, विचार चित्रांद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करील. पण हे सगळ्यांनाच कसे जमणार? शब्दच नसतील तर मग परीक्षेत निबंध तरी कसा लिहिणार?
पुढे वाचा:
- वेळेचा सदुपयोग मराठी निबंध
- वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी
- वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध
- वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी
- वृक्षांचे सौंदर्य निबंध मराठी
- वृक्षांचे महत्व मराठी निबंध
- वृक्षसंपत्ती मराठी निबंध
- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- विहिरीचे मनोगत निबंध मराठी
- विवाहाचे दृश्य निबंध मराठी
- विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?