दूरदर्शन निबंध मराठी – Television Essay in Marathi

आज जवळजवळ प्रत्येक घरातल्या दिवाणखान्यात टीव्ही असतोच. टीव्ही हे घरबसल्या मनोरंजनाचे साधन झाले आहे. त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या असतात. ह्या वाहिन्या वेगवेगळ्या वयोगटासाठी असतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आवडीची वाहिनी बघता येते.

बातम्या, लहान मुलांचे कार्यक्रम, चित्रपट, मनोरंजन, साहित्य, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांवर टीव्हीवर काही ना काही चालूच असते.

मला स्वतःला कार्टून पहायला फार आवडते. पूर्वी कार्टून पाहायला मिळावे म्हणून मी आईपाशी खूप हट्ट करीत असे. पण आईने मला समजावून सांगितले की जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. म्हणून टीव्ही कमी वेळ पाहावा.

माझ्या आईला टीव्हीवरील खानाखजाना, आम्ही सारे खवय्ये असे कार्यक्रम पाहायला आवडतात. त्यातले काही पदार्थ ती घरीसुद्धा बनवते.

एपिक, डिस्कव्हरी, हिस्टरी अशा वाहिन्या खूपच माहितीपूर्ण असतात. एपिक वाहिनीवरील रवींद्रनाथाच्या कहाण्या मी आईसोबत बघतो.

तर क्रिकेटचे, फुटबॉलचे आणि टेबलटेनिसचे सामने मी बाबांसोबत पाहातो. नॅशनल जॉग्रफिक वाहिनीमुळे मला जगाची पुष्कळ माहिती मिळते. मला बाबा त्यातली छान छान स्थळे पाहून फिरायला घेऊन जाणार आहेत. म्हणून मला टीव्ही फार आवडतो.

दूरदर्शन निबंध मराठी – Television Essay in Marathi

आधुनिक विज्ञानाने आपल्याला अनेक अद्भूत देणग्या दिल्या आहेत. दुरदर्शन त्यापैकीच एक आहे. हे खरोखरच एक वरदान आहे. रेडिओ नंतर दूरदर्शन विज्ञानातले महत्त्वाचे योगदान ठरलेले आहे. यावर आपण ध्वनी ऐकू शकतो आणि चित्र पाहू शकतो. यामुळे आपल्या मनोरंजनात अधिकच भर पडते.

मनोंरजनासोबतच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देखील दूरदर्शनाचा उपयोग सिद्ध झाला आहे. आता शिक्षण गावापर्यंत, घरापर्यंत पोहचू लागले आहे. बातम्याच्या प्रसारणामध्येही दूरदर्शनने क्रांती घडवली आहे. आता जास्तीत जास्त समाज बातम्या पहातो आणि ऐकतो आहे. देशात काय चाललय हे त्याला यामधून समजतं. यामधून राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन मिळतं. लोकांना माहीत आहे की केवळ कानाने ऐकतो आणि विश्वास ठेवण्यापेक्षा पाहून विश्वास ठेवणे अधिक चांगले. म्हणून दूरदर्शन आज जास्तीत जास्त लोकप्रिय आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगीत तालीम, परेड आदी गोष्टी पाहून मन-मयूर नाचू लागतो. रामायण आणि महाभारतासारख्या मालिकेचा आनंद दूरदर्शनमुळेच मिळाला. घरी बसल्या उत्तम चित्रपट आणि चित्रहाराचा आनंद आता सगळेजण घेत आहेत.

दूरदर्शनच्या माध्यमातून आपण आता आहे त्या ठिकाणावरून जगाची सफर करून येतो. इतकेच नाही तर चंद्रावर जावून येतो, समुद्राचा तळ शोधून येतो आणि पर्वत शिखरावर जातो. दूरदर्शनने खरोखरच अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य केल्यात. परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. हे पहाण्यात आपला कितीतरी अमूल्य वेळ वाया जातो. संदर्भहीन आणि दर्जाहीन कार्यक्रम पाहून विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम पडतो. त्यामुळे शिकण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नाही. कधी-कधी विद्यार्थी शाळेत न जाता आपला अमूल्य वेळ टी.व्ही पहाण्यात वाया घालवतात.

दूरदर्शनचा शोध स्कॉटलँडच्या एका इंजिनिअरने लावला होता, ज्याचं नाव बेअर्ड असे होते. सर्वप्रथम सन १९३६ मध्ये बी.बी. सीने दूरदर्शनच्या कार्यक्रमाचे प्रसारण लंडनहून केले होते.

दूरदर्शन निबंध मराठी – Television Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply