शलभासन मराठी माहिती – Shalabhasana Information in Marathi

शलभासन म्हणजे काय?

‘‘शलभ’’ म्हणजे टोळ. हे आसन करतेवेळी शरीर टोळाच्या शरीराचा आकार धारण करते. म्हणून या आसनास ‘‘शलभासन’’ म्हणतात.

शलभासन मराठी माहिती, Shalabhasana Information in Marathi
शलभासन मराठी माहिती, Shalabhasana Information in Marathi

शलभासन करण्याची पद्धत

 1. जमिनीला पोट टेकवून चटईवर पडा.
 2. टाचा आकाशाच्या दिशेने ठेवा.
 3. हाताचे पंजे मांड्याच्या खाली उताने ठेवा.
 4. हनुवटी जमिनीवर टेकवा.
 5. नाक व डोके किंचित वर उचला.
 6. कुंभक करा आणि बाहू आणि हात छातीवर दाबून दोन्ही पाय वर उचला.
 7. दोन्ही पाय जुळलेल्या असाव्यात.
 8. गुडघे वाकवू नका.
 9. शरीर पायाकडून बेंबीपर्यंत वर उचला.
 10. शक्य तितका वेळ या स्थितीत थांबा.
 11. सुरुवातीस 2/4 सेकंद पुरे. श्वास सोडून पूर्वस्थितीत या.
 12. विश्रांती घ्या.
 13. हे आसन 3-4 वेळा करा.

शलभासन चे फायदे मराठी

 1. या आसनाने पाय मजबूत आणि आकर्षक बनतात.
 2. लहान आणि मोठी आतडी सशक्त होऊ शकतात.
 3. पित्ताशय आणि आतड्यातील रोग निवारण होण्यास मदत होते.
 4. फुफ्फुस बळकट होते.
 5. पाठीचा कणा लवचिक व मजबूत होतो.
 6. हार्निया आणि मधुमेह हे रोग या आसनामुळे आटोक्यात येण्यास मदत होते.

शलभासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply