शेतातील कणीस बोलू लागले तेव्हा मराठी निबंध

एकदा एका रात्री मी बाबांबरोबर शेताच्या राखणीला गेलो होतो. शेतातील पीक, दाणे भरलेली कणसे अगदी तयार झाली होती. त्यावर सुंदर चांदणे पडले होते. मला पटकन कवी महानोरांची ओळ आठवली, ‘जोंधळ्याला चांदणे लगडून जाई’. डोळे तृप्त झाले… आणि तेवढ्यात शेतातील कणीस माझ्याशी हळूहळू बोलू लागले.

‘सोनू, तुम्ही-तुझ्या घरातील मंडळींनी शेतात खूप कष्ट केलेत; म्हणूनच माझा जन्म झाला. हे सुंदर जग मी पाहू शकलो. त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. माझे दाणे पक्व झाले की, तुमची भाकरी बनेल. माझ्या हिरव्या चाऱ्याने तुमच्या गोठ्यातील गुरे संतुष्ट होतील. कुठून कुठून ही पाखरे येतात! क्षणभर माझ्याजवळ बसतात. माझ्याजवळचे दाणे खातात आणि तृप्त होऊन जातात. त्यावेळी मला आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतो.

पण सोनू, शेतकरी जेव्हा कर्जबाजारी होतो; तेव्हा सावकार त्याने कष्टाने पिकवलेले धान्य घेऊन जातो. तेव्हा वाईट वाटते. काही वेळेला शेतात कीड पडते. अलीकडे तर कधी कधी अवेळी पाऊस पडतो आणि सर्व धान्याची नासाडी होते, तेव्हा वाईट वाटते. पण तुझ्या बाबांनी खूप काळजी घेतली आहे. त्यामुळेच मी आज डौलाने शोभत आहे. तुम्हां माणसांना जगवण्यासाठीच माझा जन्म आहे. त्यातच मला सुख लाभते.

पुढे वाचा:

Leave a Reply