शेकरू प्राणी निबंध मराठी – Shekaru Animal Nibandh Marathi
शेकरू हा खारीच्या जातीचा एक प्राणी आहे. हा प्राणी महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळतो. हा प्राणी साधारणपणे मीटरभर लांबीचा असतो. गंमत म्हणजे ‘मियाँ मूठभर दाढी हातभर’ या उक्तीप्रमाणे शरीरापेक्षा शेकरूची झुपकेदार शेपटीच लांब असते. झाडांवर चढताना तोल सांभाळण्यासाठी त्याला या शेपटीचा खूप उपयोग होतो.
शेकरूची पाठ तपकिरी असते. त्याचा गळा पिवळसर पांढरा असतो. त्याच्या तोंडावर मांजरासारख्या लांब मिश्या असतात. शेकरूच्या तोंडात सुळ्यासारखे दात असतात. त्याच्या पायाच्या नख्या अणकुचीदार व वाकड्या असतात. त्यामुळे शेकरू झाडावर सरसर चढू शकतो. उंबर, जांभळे, करवंदे, रानआंबे ही फळे त्याला आवडतात. झाडांची हिरवी सालही शेकरू कुरतडून खातो.
शेकरू हा प्राणी समूहाने राहतो. उंच झाडाच्या शेंड्यावर ते घरटी बांधतात. एकाच झाडावर चार-पाच शेकरांची घरटी असतात. हा अतिशय सावध प्राणी आहे. संरक्षणासाठी हे प्राणी सतत घरटी बदलत असतात. शेकरूंच्या विष्ठेतून फळांच्या बिया पडतात. त्यामुळे विविध फळांच्या बियांचा जंगलभर प्रसार होतो. अशा प्रकारे शेकरू जंगलवाढीस देखील मदत करतात.
पुढे वाचा:
- शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी
- शिष्टाचार मराठी निबंध
- शिंपी मराठी निबंध
- आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध
- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध
- शाळेची सहल मराठी निबंध
- शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी
- शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी
- शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
- शाळा नसती तर मराठी निबंध
- शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
- शाळा आणि शिस्त मराठी निबंध