शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध – Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh

अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. अन्न नसेल तर माणूस जिवंत राहू शकणार नाही. समजा, आपण खूप संशोधन केले. मोठमोठे कारखाने काढले, उत्तमोत्तम संगणक, उत्तमोत्तम गाड्या किंवा अन्य वस्तू निर्माण केल्या. या गोष्टींनी आपली शरीराची भूक भागेल का? नाही. काहीही झाले तरी अन्न हवेच. अन्नामुळेच आपण जिवंत राहतो. हे अन्न शेतकरी निर्माण करतो. म्हणूनच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

हा शेतकरी स्वत: मात्र खूप हलाखीत राहतो. शेतकरी दिवसरात्र शेतात कष्ट करतो. पण त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. कधी पाऊस दगा देतो. तो पडतच नाही. शेती होऊ शकत नाही. कधी अतिवृष्टी होते. त्यामुळे शेत वाहून जाते. या संकटांना तोंड देत तो अन्नधान्य निर्माण करतो. पण त्याच्या पिकाला बाजारात पुरेशी किंमत येत नाही. हाती आलेला पैसा सावकार बळकावतो. त्याला स्वत:च्या संसारासाठी काही शिल्लक राहत नाही. भविष्याच्या भयाण चिंतेत शेतकरी बुडून जातो. काही शेतकरी तर निराशेने आत्महत्या करतात.

अशा स्थितीत आपण शेतकऱ्याला वाचवले नाही, तर देशच रसातळाला जाईल. म्हणून शेतकरी वाचवला पाहिजे. तो आपला पोशिंदा आहे, आपला अन्नदाता आहे.

शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध – Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply