शिंपी मराठी निबंध – Essay On Tailor in Marathi

पूर्वी भारतात प्रत्येक खेड्यात शिंपी, सोनार, लोहार, सुतार, चांभार अशी माणसे असत. ती गावाला सेवा देत. त्यांना बारा बलुतेदार म्हणत असत. त्या काळात प्रत्येक खेडे स्वावलंबी होते. परंतु इंग्रज आल्यावर ही पद्धत नाहीशी झाली. हळूहळू लोक गाव सोडून शहराकडे येऊ लागले. त्यातच बरेच शिंपीही आपले मूळ ठिकाण सोडून शहरात आले.

शिंपी हा कुठल्याही समाजाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ असे म्हटलेच आहे. विशेषतः स्त्रियांना खूप नवे नवे आणि फॅशनचे कपडे घालायला आवडतात त्यामुळे चांगल्या शिंप्याचा व्यवसाय धोधो चालतो असे म्हणायला हरकत नाही.

शिंपीकाम हे कौशल्याचे काम आहे, कलेचे काम आहे. हल्ली शिंपीकामाला फॅशन डिझायनिंग असेही म्हणू लागले आहेत. कित्येक मुले आणि मुली एक वेगळा व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायात शिरू लागले आहेत. त्यासाठी ते लंडन, पॅरीस आदि ठिकाणी जाऊन वेगवेगळे अभ्यासक्रमही शिकून येऊ लागले आहेत.

मानवजातीला वस्त्र हे नेहमीच लागणार आणि तेही नवे नवे लागणार त्यामुळे शिंप्याचा धंदा कधीच नामशेष होणार नाही.

टेलर मराठी निबंध – Essay On Tailor in Marathi

टेलरला कोण ओळखत नाही? तो आपल्या समाज आणि जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. त्याच्याशिवाय आपले काम होणे अशक्य आहे. तो आपल्यासाठी कपडे शिवतो. जुन्या आणि फाटक्या कपड्यावर प्रक्रिया करतो. टेलरला गाव, खेडे, पाडे, तांडे आदी ठिकाणी सहज पहाता येतं. त्याचे दुकान कधी शहराच्या मध्यभागी. एखाद्या गल्लीत, रस्त्याच्या कडेला किंवा मग त्याच्या घरी पण त्याचं काम चालतं. उघड्यावरदेखील त्याला कधी-कधी कपडे शिवताना पहाता येतं.

एका टेलरला आपला व्यावसाय करण्यासाठी फारच कमी भाडंवलाची गरज पडते, त्यासाठी त्याच्याकडे एक शिलाई मशीन, धाग्याची बंडले, बटन, सुई, कात्री, रंगीन चॉक, एक मोठी लाकडी पट्टी आणि माप घेण्याची पट्टी असली की त्याचा व्यावसाय सुरू होतो. इतकं असलं की त्यांचा व्यवसाय सुरू होवू शकतो. अशाप्रकारे टेलरकाम करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नसते. टेलरकाम शिकणे देखील जास्त कठीण गोष्ट नाही. परंतु कमाई करण्यासाठी ते फारसं योग्य नाही. त्यात काम जास्त आणि मोबदला कमी असा प्रकार घडताना दिसतो.

योग्य माप घेऊन, कपड्याला कौशल्याने कापून नतर एक ड्रेस म्हणून तयार करणे, सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रशिक्षिण वगळता एकाग्रता, आवड आणि कर्तव्य पूर्ण करण्याची भावना लागते. अलिकडच्या काळात रेडीमेड कपड्यांमुळे टेलरलचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
पंरतु रेडीमेड कपडे तितकेसे परफेक्ट नसतात. म्हणून टेलरकडून शिवून घेतलेले कपडे वापरणे पसंत करतात. फॅशनच्या दुनियेत टेलरला अतिशय महत्त्व आहे. तो दररोज नव्या-नव्या डिझाइन आपल्यासमोर ठेवतो.

पुढे वाचा:

Leave a Reply