शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी – Shalechi Ghanta Vajali Nahi Tar Marathi Nibandh
विद्यार्थीदशेत शाळा आणि शाळेची घंटा यांना अनन्यसाधारण स्थान असते. कारण घंटा वाजते आणि शाळा सुरू होते, तर कधी घंटा वाजते आणि शाळा सुटल्याची आनंदवार्ता कळते. कधी घंटा वाजते आणि संपूच नये असे वाटणारा आवडीचा तास संपतो, तर कधी घंटेच्या आवाजाने कंटाळवाणा, न आवडणारा तास सुरू होतो. मधली सुट्टी सुरू झाल्याची गोड बातमी ही घंटाच देते आणि रंगात आलेला खेळ आवरण्याची विरस करणारी सूचनाही घंटाच देते. अशी ही शाळेची घंटा वाजलीच नाही तर –
अहो, तशीच गंमत झाली. एकदा एका काळोख्या रात्री आमच्या शाळेत चोर आले आणि त्यांनी ती भलीभक्कम पितळी घंटाच चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सगळी मुले शाळेत आली. शाळा भरण्याची वेळ होऊन गेली तरी घंटा होईचना ! आम्हांला त्याचा पत्ताच नव्हता.
कारण आमचा क्रिकेटचा सामना मैदानात रंगला होता ना ! सारे मैदान मुलांनी फुलून गेले होते. पण वर्गातील स्कॉलरमंडळी बेचैन झाली. ‘अरे आज घंटा का होत नाही? अभ्यासाचा वेळ फुकट जातो आहे ना!’ ते बेचैन झाले. मुख्याध्यापकांच्या कचेरीकडे ते धावले. मग सर्वत्र बातमी पसरली की शाळेची घंटा चोरीला गेली आहे; म्हणून घंटा वाजली नाही.
त्याचवेळी एक अशुभ विचार मनात आला. समजा शाळा चालू असताना घंटा चोरीला गेली असती तर शाळा सुटलीच नसती आणि मग ‘शाळा सुटली– पाटी फुटली-‘ असे म्हणत आनंदभराने घराकडे कसे बरे धावता आले असते?
पुढे वाचा:
- शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी
- शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
- शाळा नसती तर मराठी निबंध
- शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
- शाळा आणि शिस्त मराठी निबंध
- शालेय जीवनातील गमतीजमती
- श्रमाचे महत्व निबंध मराठी
- शस्त्रबंदी निबंध मराठी
- शरदाचे चांदणे निबंध मराठी
- शरद ऋतु मराठी निबंध
- शब्द हरवले तर मराठी निबंध
- वेळेचा सदुपयोग मराठी निबंध
- वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी