सुट्टीतील मजा निबंध मराठी-Sutti Til Majja Marathi Nibandh
सुट्टीतील मजा निबंध मराठी-Sutti Til Majja Marathi Nibandh

सुट्टीतील मजा निबंध मराठी – Sutti Til Majja Marathi Nibandh

मागच्या मे महिन्याची सुट्टी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे काका मुंबईला राहतात. मागच्या सुट्टीत मी त्यांच्याकडे गेलो होतो. माझा चुलतभाऊ संदीप याला व मला काकांनी भरपूर फिरवले.

एके दिवशी आम्ही जिजामाता उदयान पाहायला गेलो. जिवंत प्राणी अगदी जवळून पाहायला मिळाले. गेंडा व पाणघोडा पाहून मी थक्क झालो. त्यांचे अंग लोखंडाचे असावे, असा मला भास झाला. माकडांच्या पिंजऱ्याजवळ पोहोचलो, तेव्हा आम्ही जबरदस्त खूश झालो. त्यांच्या हालचाली पाहून हसूच येत होते. अशा त-हेने सर्व प्राणी पाहत मनसोक्त फिरून आम्ही घरी परतलो. एके दिवशी काकांनी आम्हांला ‘गेट वे ऑफ इंडिया‘ला नेले.

तो अथांग सागर आम्ही डोळे भरून पाहिला. नंतर आम्ही एका मॉलमध्ये गेलो. तो चकाचक अवाढव्य मॉल पाहून माझे डोळे विस्फारले. असंख्य रंगीबेरंगी वस्तू व्यवस्थित मांडल्या होत्या. प्रत्येक वस्तू आपण घ्यावी, असे मला वाटू लागले. मी प्रत्येक वस्तूला हात लावून पाहत होतो. सरकता जिना पाहून मी हरखूनच गेलो. त्या मॉलमधून बाहेर पडूच नये, असे मला वाटत होते.

अशा त-हेने मुंबईतील अनेक ठिकाणे पाहिली. ही ठिकाणे पाहता पाहता माझी सुट्टी कधी संपली, हे मला कळलेच नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply