Makar Sankranti Essay in Marathi: सन 2022 मध्ये, पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी 14 जानेवारी 2022, शुक्रवार रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांत ही सर्व संक्रांतांपैकी सर्वात महत्त्वाची मानली जाते. मकर संक्रांतीला खिचडीचा सण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

आज आपण खाली मकरसंक्रांतीवर निबंध मराठीमध्ये दिले आहेत त्याचा उपयोग तुम्ही शाळेमध्ये Makar Sankranti Essay in Marathi लिहिताना करू शकता.

मकरसंक्रांत निबंध मराठी-makar sankranti wishes in marathi
मकरसंक्रांत निबंध मराठी

मकरसंक्रांत निबंध मराठी – Makar Sankranti Essay in Marathi

मकरसंक्रांत निबंध मराठी १०० शब्द – Makar Sankranti Essay in Marathi 100 Words

मकरसंक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे. हा सण दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात. तिळाचे लाडू तिळगूळ म्हणून दिले जातात. काहीजण सोबत साखरेचा हलवाही देतात.

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगूळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका,’ असे तिळगूळ देताना लोक म्हणतात. एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे.

या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगूळ यांचा समावेश असतो. या सणाला स्त्रिया काळी वस्त्रे परिधान करतात.

या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सवच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवतात. आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी उसळते. असा हा मकरसंक्रांत उल्हासाचा सण आहे.

[printfriendly current=’yes’]

मकरसंक्रांत निबंध मराठी–Makar Sankranti Essay in Marathi
मकरसंक्रांत निबंध मराठी, Makar Sankranti Essay in Marathi

मकरसंक्रांत निबंध मराठी २०० शब्द – Makar Sankranti Essay in Marathi 200 Words

दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांतीचा सण येतो. या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो. म्हणून या दिवसाला ‘मकरसंक्रांत’ म्हणतात.

काही ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण पाळला जातो. संक्रांत आणि भोगी या दिवसांमध्ये तीळ आणि गूळ या पदार्थांना फार महत्त्व असते. म्हणून तीळ घालून बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याचे भरीत असा खमंग बेत असतो. बरोबर असते गुळाची पोळी. या पोळीत गुळाबरोबर तिळाचाही उपयोग केलेला असतो. तिळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसांत हा आहार शरीराच्या दृष्टीने फार फायदयाचा ठरतो.

संक्रांतीच्या दिवशी घरातील सुवासिनी एकमेकींना संक्रांत-वाणे देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे, तिळगूळ यांचा उपयोग केला जातो. या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालतात.

संक्रांतीच्या दिवशी मुले आकाशात पतंग उडवून आनंद लुटतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना हलवा-तिळगूळ देतात आणि ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणतात. हा सण एकमेकांत स्नेह निर्माण करतो. म्हणून मला हा सण आवडतो.

Makar Sankranti Essay in Marathi
Makar Sankranti Essay in Marathi

मकरसंक्रांत निबंध मराठी ३०० शब्द – Makar Sankranti Essay in Marathi 300 Words

हा भारतातील पौष महिन्यात साजरा केला जाणारा सण आहे. हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो. हा सौर कालगणनेशी संबंधीत असा सण आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

मकर संक्रांत २१-२२ डिसेंबरलाच सुर्याचे उत्तरायण सुरू झालेले असते. म्हणजे सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. संक्रांत ही एक देवता मानली गेलेली असून ती प्रतीवर्षी वेगवेगळया वाहनांवर बसून येते. अशी समजूत प्रचलीत आहे.

संक्रांतीचा आधला दिवस भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिश्र भाजी, लोणी असे पदार्थ केले जातात.

संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे. या दिवशी सर्व मित्रमंडळी, लहान मुले हे तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वडया वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ अशा शुभेच्छा देतात.

विवाहित स्त्रीया या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. यावेळी स्त्रीया एकमेकींना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ अशा शुभकामना देतात.

रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. तीळ वापरण्यातला पहिला अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री.

अशा तिळगुळांची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचे, नवीन स्नेहबंध जोडायचे, जुने स्नेहबंध समृध्द करायचे हाच हेतु असतो.

या दिवशी पतंग उडविण्याची ही प्रथा आहे. तसेच या दिवशी लोक काळया रंगाचे कपडे घालतात कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

अशाप्रकारे भारतात साज-या केल्या जाणा-या सणांपैकी मकर संक्रांत हा एक महत्वाचा सण आहे.

मकर संक्रांति शुभ मुहूर्त 2022

मकर संक्रांती 2022 – शुभ मुहूर्त
मकर संक्रांती पुण्यकाळ – 02:43 PM ते 05:45 PM
कालावधी – 03 तास 02 मिनिटे
मकर संक्रांती महा पुण्य काळ – 02:43 PM ते 04:28 PM
कालावधी – 01 तास 5 मिनिटे

मकरसंक्रांत निबंध मराठी, Makar Sankranti Essay in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न. १ सन 2022 मकरसंक्रांत कधी आहे?

उत्तर- 14 जानेवारी 2022, शुक्रवार रोजी

प्रश्न.२ मकरसंक्रांत कशाला म्हणतात?

उत्तर- दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांतीचा सण येतो. या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो. म्हणून या दिवसाला ‘मकरसंक्रांत’ म्हणतात.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply