पर्यावरण निबंध मराठी : आपल्या सभोवतालचे नैसर्गिक आवरण जे आपल्याला सहज जगण्यास मदत करते त्याला पर्यावरण म्हणतात. कोणत्याही सजीवाला जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने आपल्याला पर्यावरणातून मिळतात. पर्यावरणाने आपल्याला हवा, पाणी, अन्नपदार्थ, अनुकूल वातावरण इ. भेट दिली आहे. आपण सर्वांनी नेहमीच पर्यावरणाच्या संसाधनांचा पुरेपूर वापर केला आहे आणि आज आपल्या विकासात पर्यावरणाचा मोठा वाटा आहे. आज आम्ही खाली पर्यावरण वर मराठी निबंध दिले आहेत.

पर्यावरण निबंध मराठी
पर्यावरण निबंध मराठी

पर्यावरण निबंध मराठी – Paryavaran Nibandh Marathi

Set 1 : पर्यावरण निबंध मराठी – Paryavaran Nibandh Marathi

पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेला निसर्ग ! किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपल्याभोवती असलेले हवा, पाणी आणि माती म्हणजेच पर्यावरण.

मानवाला देवाने इतर पशुं पेक्षा शारीरिक ताकद कमी दिली असेल परंतु त्याने मानवाला बुद्धीचे वरदान दिले. ह्या बुद्धीच्या वरदानामुळेच मानव आज त्याच्या आसपासच्या पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना परंतु विजय मिळवू शकला आहे.

ह्या पृथ्वीतलावर मानवाने त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून खूप काही बदल घडवून आणले. पूर्वी तो शिकार करीत असे तेव्हा त्याला जागोजागी भटकावे लागे. परंतु लौकरच त्याने अग्नीचा शोध लावला, चाकांचा शोध लावला आणि शेतीचाही शोध लावला. त्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहाणे त्याला शक्य झाले. शेती करता यावी म्हणून त्याने जंगले तोडली आणि मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर त्याला हव्या त्याच धान्याचे पीक घ्यायला सुरूवात केली. तसेच राहायला नगरे हवीत, रस्ते हवेत म्हणूनही त्याने जंगले तोडली. अशा त-हेने मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आसपासच्या पर्यावरणाला वेठीस धरले.

विज्ञानाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची सुखाची लालसा वाढू लागली. जमिनीचा कस वाढावा म्हणून रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर, पिकांवर कीड पडू नये म्हणून कीटकनाशकांची वाढती फवारणी, वाढते औद्योगीकरण आणि ते करताना पर्यावरणाची केलेली अक्षम्य हेळसांड हे मानवाने केलेले मोठे गुन्हे आहेत.

कारखान्यांचे आणि शहरांतले सांडपाणी नद्यांत आणि समुद्रात सोडल्यामुळे जलप्रदूषण झाले. दर वर्षी अनेक घातक रासायनिक संयुगांची निर्मिती होत असते. ही सर्व संयुगे हवेत, पाण्यात आणि जमिनीत मिसळतात. तिथून ती मानवी शरीरात जातात. त्यामुळे कर्करोगा- सारख्या प्राणघातक रोगांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच वाढत्या शहरांसाठी बेलगाम वृक्षतोड होत आहे.

झाडे स्वतःचे अन्न तयार करताना कार्बन वायू घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. परंतु झाडेच कमी झाल्याने हवेतील शुद्धताही कमी होते. त्यातच हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनच्या सरंक्षक थराला भोक पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट जमिनीवर येऊ शकतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी ते अत्यंत धोकादायक आहे.

खरोखर, पर्यावरणाचा हा-हास आपल्याला विनाशाच्या काठावर तर नेऊन ठेवत नाहीये ना? आपली ही अमर्याद सुखलालसा आपण आवरली नाही तर आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी शिल्लकच नसेल.

पर्यावरण निबंध मराठी-Paryavaran Nibandh Marathi
पर्यावरण निबंध मराठी, Paryavaran Nibandh Marathi

Set 2 : पर्यावरण निबंध मराठी – Paryavaran Nibandh Marathi

परि + आवरण या दोन शब्दांची संधी होऊन पर्यावरण हा शब्द बनला आहे. आपल्या सभोवती व्यापून असलेले जे वायुमंडळ त्यास पर्यावरण म्हणतात. पर्यावरण म्हणजेच वातावरण, वायुमंडळात होणाऱ्या सर्व घडामोडी पर्यावरणाचाच भाग असतात व त्या पर्यावरणाचे संतुलन राखतात. जेव्हा हे संतुलन दैवी, मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे बिघडते तेव्हा मानवाचे अस्तित्व धोक्यात येते. पर्यावरणात झालेल्या बदलांना संतुलित करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

ही भूमी जिवांमुळे आहे, जिवांची आहे. जिवांसाठी आहे. तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे. विविध प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पतींमुळेच पृथ्वीचे अस्तित्व आहे. आपल्या सभोवती असलेल्या जल, भूमी, आणि वायू मिळून तयार झालेले हे पर्यावरण आपणास वारसा म्हणून मिळाले आहे. आपण ते सांभाळून ठेवायचे आहे, त्याचे जतन करावयाचे आहे. ब्रह्मांडात जितके ग्रह उपग्रह आहेत त्या सर्वांमध्ये फक्त पृथ्वीवरच जीवन आहे.

मात्र पृथ्वीवरील पर्यावरण प्रदूषित करण्यात मानव सर्वात पुढे आहे. आपला स्वार्थ आणि भोगवादी इच्छांच्या पूर्तीसाठी त्याने निसर्गाला आपली पाहिली शिकार बनविले. औद्योगिकरण, धरणे व शहरे वसविण्याच्या हट्टापायी त्याने वने, वृक्ष आणि वनस्पतींची युद्धपातळीवर कटाई सुरू केली. पण वृक्षारोपण करण्यास विसरला. झाडे कमी झाल्यामुळे संतुलन बिघडले. स्वत:चे आणि देशाचे सुख वाढविण्यासाठी उत्पादन व धान्योत्पादन वाढविण्यासाठी कीटकांना नष्ट करण्यासाठी आपण घातक रसायनांचा उपयोग केला. यामुळे मात्र नुकसान आपलेच झाले. ती रसायने बूमरँगसारखी आपल्यावरच उलटली. पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोनच्या छत्रीचीही चाळणी करणे सुरू केले. सध्या पर्यावरणाच्या संतुलनाचा प्रश्न मानवजातीच्या भावी अस्तित्वाशीही जोडला गेला आहे. अनेक प्राणी व वनस्पतींचेही अस्तित्त्व धोक्यात आले आहे.

पर्यावरणात नुकसान करणाऱ्या घटकांचा समावेश झाल्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू विष मिसळू लागले आहे. दरवर्षी अनेक रासायनिक संयुगांची निर्मिती होत आहे. यात अनेक प्रदूषित घटक असतात जे सतत पर्यावरणात मिसळतात आणि पर्यावरणा खराब करतात. संतुलित पर्यावरण जिवांच्या अस्तित्वाला सुरक्षितता प्रदान करते, सामान्य नैसर्गिक घडामोडींसाठी ऊर्जा देते. तर पर्यावरणाचे असंतुलन जिवांसाठी विनाशकारी आणि घातक सिद्ध होते. हे पर्यावरणाचे असंतुलन आपल्याला आपल्या पृथ्वीला, आकाशाला, नद्यांना, समुद्राला, वृक्षांना, पिकांना जेव्हा आपल्या पकडीत घेते तेव्हा मानव आणि जीवसृष्टी विनाशाच्या काठावर जाते. पर्यावरणाचा हा हास मंदगतीने आपणास है विनाशाकडे नेत आहे. जर आपण आताही जागृत झालो नाही तर टाईम बॉम्ब बनून आपला महाविनाश करेल.

Set 3 : पर्यावरण निबंध मराठी – Paryavaran Nibandh Marathi

परि + आवरण या दोन शब्दांची संधी होऊन पर्यावरण हा शब्द बनला आहे. आपल्या सभोवती व्यापून असलेले जे वायुमंडळ त्यास पर्यावरण म्हणतात. पर्यावरण म्हणजेच वातावरण. वायुमंडळात होणाऱ्या सर्व घडामोडी पर्यावरणाचाच भाग असतात व त्या पर्यावरणाचे संतुलन राखतात. जेव्हा हे संतुलन दैवी मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे बिघडते तेव्हा मानवाचे अस्तित्व धोक्यात येते. पर्यावरणात झालेल्या भयानक परिवर्तनाला संतुलित करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

प्राचीन काळापासून भारतीय लोक पर्यावरणाच्या बाबतीत जागरुक आहेत. त्यांच्या दैनंदिन कार्यात देवपूजा मुख्य होती. ते केवळ दगडाच्या देवाचीच पूजा करीत असे नव्हे तर पर्वत, सागर, नद्या वृक्ष, वृष्टी, प्राणी, वनस्पती यानांही देवासमान मानून त्यांचीही पूजा करीत. त्यांच्याप्समोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करीत. लौकिक आणि अलौकिक शक्तीच्या प्रती मानवाचा संबंध पूज्य पूजक असाच राहिला. तो या शक्तींच्या शापाला घाबरत होता व त्यांच्या आशीर्वादांसाठी आसुसलेला होता.

मानवाचा हाच पूज्य पूजक भाव सृष्टीच्या पर्यावरणाच्या संतुलनाचा आधार बनला. ही भूमी जिवांमुळे आहे, जिवांची आहे. जिवांसाठी आहे. तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे. विविध प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पतींमुळेच पृथ्वीचे अस्तित्व आहे. आपल्या सभोवती असलेल्या जल, भूमी, आणि वायू मिळून तयार झालेले हे पर्यावरण आपणास वारसा म्हणून मिळाले आहे. आपण ते सांभाळून ठेवायचे आहे, त्याचे जतन करावयाचे आहे. पर्यावरण हा निसर्गाचाच पर्याय आहे. हे एका प्रचंड यंत्राप्रमाणे आहे. या विशाल व प्रचंड यंत्ररूपी पर्यावरणाचाच प्रत्येक कण, प्रत्येक थेंब आणि लहानमोठे जीव यांचे छोटे-छोटे भाग आहेत. यातील एक जरी भाग खराब झाला तरी संपूर्ण यंत्र खडखड करू लागते आणि विनाशाच्या एका शृंखलेची प्रक्रिया सुरू होते.

ब्रह्मांडात जितके ग्रह उपग्रह आहेत त्या सर्वांमध्ये फक्त पृथ्वीवरच जीवन आहे. पृथ्वीवरील पर्यावरण प्रदूषित करण्यात मानव सर्वात पुढे आहे. आपला स्वार्थ आणि भोगवादी इच्छांच्या पूर्तीसाठी त्याने निसर्गाला आपली पाहिली शिकार बनविले. वने, वृक्ष आणि वनस्पतींची युद्धपातळीवर कटाई सुरू केली. वने कापून काढली पण वृक्षारोपण विसरला. वनांची क्षतिपूर्ती न झाल्यामुळे संतुलन बिघडले. स्वत:चे आणि देशाचे सुख वाढविण्यासाठी उत्पादन व धान्योत्पादन वाढविण्यासाठी कीटकांना नष्ट करण्यासाठी घातक रसायनांचा उपयोग केला. यामुळे फायदा झाला पण नुकसान आपलेच झाले. ती रसायने बूमरँगसारखी आपल्यावरच उलटली. क्लोरो-फ्लोरो कार्बन संयुगांमुळे तर पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोनच्या छत्रीचीही चाळणी करणे सुरू केले. सध्या पर्यावरणाच्या संतुलनाचा प्रश्न मानवजातीच्या भावी अस्तित्वाशीही जोडला गेला आहे.

पर्यावरणात नुकसान करणाऱ्या घटकांचा समावेश झाल्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू विष मिसळू लागले आहे. दरवर्षी अनेक रासायनिक संयुगांची निर्मिती होत आहे. ज्यात अनेक प्रदूषित घटक असतात जे सतत पर्यावरणात मिसळतात आणि पर्यावरणाला क्षीण करतात. एकीकडे संतुलित पर्यावरण जिवांच्या अस्तित्वाला सुरक्षितता प्रदान करते. सामान्य नैसर्गिक घडामोडीसाठी ऊर्जा देते तर दुसरीकडे पर्यावरणाचे असंतुलन जिवांसाठी विनाशकारी आणि घातक सिद्ध होते. हे पर्यावरणाचे असंतुलन आपल्याला आपल्या पृथ्वीला, आकाशाला, नद्यांना, समुद्राला, वृक्षांना, पिकांना जेव्हा आपल्या पकडीत घेते तेव्हा मानव आणि जीवसृष्टी विनाशाच्या काठावर जाते. भेटीदाखल हृदयरोग, कॅन्सर, दमा यासारखे रोग देते. ही रसायने मंदगतीने आपणास विनाशाकडे नेत आहेत. जर आपण आताही जागृत झालो नाही तर टाईम बॉम्ब बनून आपला महाविनाश करतील.

नैसर्गिक सौंदर्याचे जसे वर्णन आपणास महाकवी कालिदासाच्या साहित्यात, वाल्मीकी रामायणात आणि प्राचीन ग्रंथांत दिसते तसे आज संस्कृत व अन्य साहित्यात दिसत नाही. कारण आजचा समाज नैसर्गिक वातावरणापासून दूर जात आहे. कृत्रिम वातावरणात राहणे त्याचा स्वभाव बनला आहे. नैसर्गिक सौंदर्याचा त्याच्या जीवनात अभाव आहे. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे जिवांच्या अनेक जाती लुप्त झाल्या आहेत. होत आहेत. या दिशेने जर काही प्रयत्न केले नाहीत तर आणखी अनेक जीव नष्ट होण्याची शक्यता वाढेल. मागील काही वर्षांपासून मानवाच्या निष्ठुर कृत्यांमुळे त्या जीव जंतूंचा विनाश होणे पृथ्वीवर होणाऱ्या दैवी संकटांपेक्षा किती तरी भयंकर आहे. वामन पुराणात असे म्हटले आहे की.

पारूष्यं सर्व भुतानां प्रथमं नरकं स्मृतम।
छेदनं वृक्ष जातीनां द्वितीय नरंकस्मतम॥

अर्थात् जीवमात्रांच्या हिंसेला प्रथम नरकाचे नाव दिले गेले आणि वनस्पतींच्या कापणीला दुसऱ्या नरकाचे नाव दिले गेले.

आज आपली न्यायव्यवस्था आणि शासनप्रणाली या पर्यावरणाच्या प्रदूषणाला थांबविण्यास असमर्थ आहे. याचे कारण त्यास अपेक्षित असणाऱ्या कायद्यांची, न्यूनता, आपल्या देशातील रहिवाशांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणात्मक संस्कृतीचा अभाव आहे. बिघडत जाणाऱ्या पर्यावरणामुळे जे भारी नुकसान आपले वा आपल्या भावी पिढीचे होणार आहे त्याची कल्पना बुद्धिजीवी वर्गाला आलेली आहे म्हणून या जागरुक समाजातील नागरिक असण्याच्या नात्याने पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हे कार्य कुणा एकाचे नसून सर्वांचे आहे तरच आपली पृथ्वी सश्य-श्यामला बनेल ती पुन्हा हिरवीगार होईल. जनतेचा सक्रिय सहभागच आपल्या पर्यावरणाला प्रदूषणरहित करून पृथ्वीला जिवांच्या राहण्यायोग्य बनवाल.

“रक्षये प्रकृति पांतुलोका” हे!

विश्वातील लोकांनो निसर्गाचे संरक्षण करीत त्यांचा उपयोग करा.

पर्यावरणाच्या संरक्षणाच्या उद्देशाने १९९२ मध्ये ब्राझिलमधील रिओडी जानेरो या शहरात “पृथ्वी शिखर संमेलन” संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले ज्याला अन्सेड म्हणजे UNCED-United Nations ConferenceOn Environment and Development असे नाव दिले. यात अनेक देशांतील शास्त्रज्ञ, संशोधक राष्ट्राध्यक्ष, नीती निर्माते व पर्यावरणशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. याचे पहिले संमेलन १९७२ मध्ये ‘स्टॉकहोम’ येथे भरले होते. वीस वर्षांत पृथ्वी किती बदलली, पर्यावरणात कोणती परिवर्तने झाली याचे परीक्षण रियो-भू-शिखर येथे करण्यात आले.

पृथ्वी शिखर संमेलनात पर्यावरणाचे संरक्षण (ऋतुबदल, ओझोनचा क्षय होण्यापासून बचाव करणे, वायु प्रदूषण) साधनांचे रक्षण, (वन विनाशाची समस्या सोडविणे, भू-स्खलन, वाळवंटीकरण व दुष्काळ) जैव विविधतेचे संरक्षण, शुद्ध जल स्त्रोतांचे रक्षण, विषारी धूर सोडणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध, जैव तंत्रज्ञान, घातक पदार्थांसाठी पर्यावरणीय संतुलित प्रबंध इत्यादी मुद्यांवर विचार करण्यात आला.

आज जगात सर्वात जास्त चर्चा पर्यावरणाची होते. जसजसे नैसर्गिक असंतुलन वाटले तसतसे चर्चा, परिसंवाद, संमेलने, वृत्तपत्रे, दूरदर्शन इत्यादी प्रसार माध्यमांद्वारे क्वि जनमत जागृत करण्याचे प्रयत्न तीव्र होत गेले. प्रचंड खर्च करून लाखो शास्त्रज्ञ पर्यावरणाचे प्रदूषण थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रदूषण थांबविण्यासाठी नवनव्या शास्त्रीय तंत्रांचा विकास होत आहे. आज निसर्गातील प्रत्येक घटक या ना त्या रूपाने, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रदूषित पर्यावरणात सापडला आहे. स्वर्गापेक्षाही सुंदर समजल्या जाणाऱ्या या वसुंधरेची २० व्या शतकात ही स्थिती आहे तर २१ व्या शतकात प्रवेश करण्यापूर्वीच आपण तिची कशी स्थिती करू? हे आता कळले आहे.

पुढे वाचा:

प्रश्न १ – पर्यावरण म्हणजे काय?

उत्तर – आपल्या सभोवतालचे वातावरण जे आपल्यासाठी अनुकूल असते त्याला पर्यावरण म्हणतात.

प्रश्न २ – जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर – जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो.

प्रश्न ३ – पर्यावरणीय प्रदूषण कोणते आहेत?

उत्तर – जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण इत्यादी पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार आहेत.

प्रश्न ४ – जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे?

उत्तर – बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश आहे.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply