भुजंगासन मराठी माहिती – Bhujangasana Information in Marathi

भुजंगासन म्हणजे काय?

‘‘भुजंग’’ म्हणजे ‘‘नाग’’. या आसनात शरीराचा आकार फडी काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनास भुजंगासन, सर्पासन किंवा नागासन असेही म्हणतात.

भुजंगासन मराठी माहिती, Bhujangasana Information in Marathi
भुजंगासन मराठी माहिती, Bhujangasana Information in Marathi

भुजंगासन करण्याची पद्धत

  1. जमिनीला पोट टेकवून चटईवर पडा. पाय ताणून धरा.
  2. पायाचे अंगठे एक दुसऱ्यास चिकटवून पायाची इतर बोटे पसरवून ठेवा.
  3. पायाच्या तळव्याची दिशा आकाशाच्या दिशेने असू द्या.
  4. तळहात छातीजवळ जमिनीस टेकवा.
  5. बाहू आणि कोपर एक दुसऱ्याला चिकटवा.
  6. हनुवटी जमिनीवर घट्ट दाबून ठेवा.
  7. आता डोके किंचित वर उचला.
  8. श्वास घेऊन छाती आणि पाठ बेंबीपर्यंत उचलून डोके मागील बाजूस वळवा.
  9. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे.
  10. बेंबीपर्यंतचा भाग वर उचलण्याची दक्षता घ्या.
  11. कुंभक करा.
  12. हात आणि बाहूचा आधार घ्या. पण शरीराचा सर्व भार त्यावर घेऊ नका.
  13. आकाशाकडे पाहा. या स्थितीत शक्य तितका वेळ थांबा.
  14. श्वास घेऊन पूर्वस्थितीत या.
  15. सुरुवातीस छाती, नंतर डोके आणि शेवटी हनुवटी जमिनीला टेकवा.
  16. अंतिम अवस्थेत दोन ते चार सेकंद थांबा.
  17. हळूहळू थांबण्याचा वेळ वाढवा.
  18. हे आसन दोन ते चार वेळा करा.

भुजंगासन फायदे मराठी

  1. या आसनामुळे स्वप्नदोष कमी होण्यास मदत होते. वीर्य संवर्धनाकरिता हे फार उपयुक्त आहे.
  2. स्त्रियांच्या मासिक पाळीतील बिघाड आणि गर्भाशयाच्या रोगावर हे एक गुणकारी आसन आहे.
  3. या आसनामुळे मेंदूतील शिथिलता जाऊन तरतरी आणि चैतन्य निर्माण होते.
  4. या आसनामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते. म्हणून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींकरिता फार उपयुक्त आसन आहे.
  5. छाती, फफ्फूस, हृदय, पाठ आणि पाठीचा कणा यांतील विकार

भुजंगासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply