चित्रपटाचे फायदे तोटे निबंध मराठी

अंध धृतराष्ट्राजवळ बसुन युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची ‘दिव्यदृष्टी’ एकट्या संजयला होती. परंतु स्थलकालाचे बुरुज फोडून जगातील कोणतीही गोष्ट घडामोडी घरबसल्या दाखविण्याची जादू दुरदर्शनने केली आहे आणि चित्रपट हे आपले आवडते मनोरंजन झाले आहे. मुक्त व्यापारी धोरणाचा परिणाम दुरदर्शनवर झाला आहे.

निखळ शुद्ध मनोरंजनाचे सामाजिक प्रबोधनाचे चित्रपट दाखविण्याऐवजी हिंसा, प्रणय, लैंगिकता, विकृती यांचे दर्शन मोठ्या प्रमाणात घडविणारे चित्रपट जास्त दिसू लागले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये चित्रपटांविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाजसेवक यांना दुरदर्शनच्या दुरगामी दुष्परिणामांची भीती वाटू लागली आहे. म यास करीत नाहीत, बाहेर त्यांचे खेळायला जात नाहीत, खात नाहीत,डोळे दुखतात, त्यांचे डोके दुखते इत्यादि तक्रारी तर ऐकायला मिळतातच, परंतू चित्रपटातील पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहिल्यावर भारतीय संस्कृती नष्ट होईल की काय या विचाराने सुशिक्षित लोक धास्तावले आहेत.

दुरदर्शनवर ज्ञान व माहिती देणारे चित्रपट असतात. ते बालांसाठी, प्रौढांसाठी तसेच युवकांसाठी, महिलांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयोगी असतात. दिवसभर कष्ट करुन आल्यावर ‘चित्रपट’ म्हणजे एक दिलासाच वाटतो. परंतू. हल्ली या चित्रपटाचे नकळत वाईट परिणाम होत आहेत. टी व्ही वर चांगला चित्रपट लागला असला की आलेल्या पाहूण्यांशी बोलायलाही लोक तयार नसतात. प्रौढांचे व मुलांचे वाचन कमी झाले. ध्वनिप्रदूषण वाढले ‘लव्ह’ हाच केंद्रबिंदू असलेले चित्रपट पाहून तरुण-तरुणींची प्रेमप्रकरणे वाढली. चित्रपट नसल्यास वातावरण उदास होते.

पण चित्रपटांचे फायदे सुद्धा आहेत. चित्रपटातील नट समाजातील कुप्रवृत्ती विरुध्द लढलेले पाहून लोकांमधील अंधश्रद्धा कमी झाल्या. कुटूंबनियोजनाचा सोपा उपाय जनतेला समजला व ऐतिहासिक चित्रपटांतून इतिहास, संस्कृती व धर्म यांचे ज्ञान लोकांना झाले. चित्रपटातील वाईट परिणाम टाळायचा असेल तर पालकांनी, कुटुंबप्रमुखांनी कंबर कसली पाहिजे. योग्य चित्रपटाची निवड केली पाहिजे.

मुलांच्या अभ्यासाच्या वेळात व रात्री मुले झोपल्यानंतर प्रौढांसाठी असलेल्या फिल्मस्च्या पाहण्याचा मोह टाळावा. त्यामुळे टी व्ही वरील सर्वच चित्रपट पाहणे हिताचे नाही याची जाणीव पालकांना हवी व ती त्यांनी मुलांमध्ये निर्माण केली तरच भावी पिढी प्रक्षोभक, हिंसाचारी, स्वैराचारी, भोगवादी, सुखलोलूप, विलासी व आळशी न होता सदाचारी, ज्ञानी, देशाबद्दल व मानवतेबद्दल प्रेम बाळगणारी, राष्ट्रीय एकात्मता जपणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी एक सुजाण पिढी निर्माण होईल. मग चित्रपट एक वरदान किंवा देवदूता प्रमाणे वाटेल.

पुढे वाचा:

Leave a Reply