घरकाम करणारे आमचे सदाकाका मराठी निबंध

आमच्या मजल्यावर एकूण दहा घरे आहेत. आमच्याकडे केर काढणे व लादी पुसणे या कामांसाठी एक गृहस्थ येतात. आमच्या दहाही घरांतील हे काम तेच करतात. सदा त्यांचे नाव. आम्ही त्यांना ‘सदाकाका’ म्हणतो.

सदाकाकांची कामाची रीत मला खूप आवडते. ते अगदी ठरलेल्या वेळी येतात. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू उचलतात. मग केर काढतात. सदाकाकांनी केर काढला की, जमिनीवर धुळीचा कणही शिल्लक राहत नाही.

मग ते ओल्या कपड्याने लादी पुसून घेतात. नंतर कपडा धुवून स्वच्छ पाण्याने पुन्हा लादी पुसतात. सदाकाका इतके छान काम करतात की, सर्वजण त्यांच्यावर खूश असतात.

सदाकाका नेहमी स्वच्छ आणि टापटीप असतात. आपल्या मुलांनाही त्यांनी तशी सवय लावली आहे. आमच्या इमारतीतील काही मुलांना ते शाळेत पोहोचवतात आणि शाळेतून घरी आणतात.

हे कामसुद्धा ते वक्तशीरपणे करतात. ते नेहमी हसतमुख असतात. त्यांना रागावलेले मी कधी पाहिले नाही. माझी आजी त्यांना प्रेमाने सदासुखी म्हणते.

पुढे वाचा:

Leave a Reply