चॉकलेटचे झाड उगवले, तर… निबंध मराठी – Chocolate Jhad Ugavale Tar Marathi Nibandh

चॉकलेटचे झाड उगवले तर?… ही कल्पना मनात आली आणि मला खूप आनंद झाला. किती मजा येईल! सकाळी उठल्यावर झाडावरून चॉकलेट काढीन आणि खाईन. रोज शाळेत जाताना खिशातून चॉकलेटे नेईन. मित्रांनासुद्धा देईन. ते खूप खूश होतील. मी मग वेगवेगळ्या चॉकलेटांची झाडे लावीन. हवे त्या वेळी हवे ते चॉकलेट खाईन. व्वा! किती छान !

परंतु चॉकलेटचे झाड खरोखर उगवले तर काय होईल? तर मग सगळेच लोक चॉकलेटची झाडे लावतील. सगळ्यांकडेच चॉकलेटे असतील. मग त्यात काही मजा राहणार नाही. शिवाय, आंबा, फणस, पेरू, सफरचंद यांच्यासारख्या विविध चवी मिळणार नाहीत.

फळांचा रस काढता येतो. चॉकलेटचा रस कसा काढणार? कैरीचे लोणचे करता येते. काही फळांची भाजी करता येते. हे चॉकलेटपासून शक्य नाही. तसेच, चॉकलेटमुळे दात किडतील, पोट बिघडेल. चॉकलेटपासून जीवनसत्त्वे मिळणार नाहीत. आपले आरोग्यच बिघडेल. छे! ते चॉकलेटचे झाड नकोच!

पुढे वाचा:

Leave a Reply