दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी – Doordarshan Shap Ki Vardan

मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. अवकाशात सोडलेल्या अनेक उपग्रहांमुळे मानवाने प्रगतीकडे वाटचाल केलेली आहे. दूरदर्शन हा मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा मानवाला वरदान ठरलेला शोध.

दूरदर्शन हे माहिती मिळवण्याचे एक प्रभावी साधन आहे. दूरदर्शनवर दिसणाऱ्या विविध चॅनल्समुळे मानवाच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीसारख्या चॅनल्समुळे तर घरबसल्या विविध भूप्रदेशाची तेथील प्राणिजगताची माहिती मिळते. वेगवेगळ्या पर्यावरणाशी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी कसे जुळवून घेतात हे प्रत्यक्ष दूरदर्शनच्या माध्यमाने पाहायला मिळते. दूरदर्शनमुळे अनेक महान नेत्यांचे, शास्त्रज्ञांचे, लेखकांचे, खेळाडूंचे, अभिनेत्यांचे दर्शन अगदी घरात होऊ लागले. त्याच्याशी सुसंवाद साधता येऊ लागला.

दूरदर्शन हे शाप नसून मानवाला वरदानच ठरलेला आहे. मुलांच्या शैक्षणिक ज्ञानात भरच पडत आहे. पण आजकाल दूरदर्शनच्या बऱ्याच वाहिन्या केवळ मनोरंजनासाठीच निर्माण होत आहेत. रटाळ मालिका, अश्लील चित्रपट यामुळे मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. घरची कामे सोडून स्त्रियाही दूरदर्शनवरील कंटाळवाण्या मालिका तासन्तास बघत असतात. मुलांच्याही अभ्यासाचे नुकसान होते. .

दूरदर्शनचा आपण कसा वापर करतो यावरच तो शाप की वरदान आहे हे ठरणार आहे.

दूरदर्शन शाप की वरदान – Doordarshan Shap Ki Vardan

पुढे वाचा:

Leave a Reply