Set 1: ऊंट निबंध मराठी – Essay on Camel in Marathi

उंट हा मजेशीर प्राणी आहे. दिसायला तो बेढबच दिसतो. त्याच्या पाठीवरच्या उंचवट्याला ‘मदार’ म्हणतात. अरबस्तानातील उंटांना दोन मदारी असतात. त्याचे मूळ स्थान वाळवंट असल्यामुळे तो खूप पूर्वी भारतात नव्हता. ग्रीक आक्रमकांनी पहिल्या प्रथम उंटाला भारतात आणला. नंतर तो इथलाच झाला.

वाळवंटातील प्रवास करण्यास योग्य अशीच त्याच्या शरीराची जडणघडण असते. त्याच्या अंगावरील त्वचा राठ असते त्यामुळे तो वाळवंटातील कोरडी हवा सहन करू शकतो. त्याची पावलेही अशी बनलेली असतात की वाळूत पाय न फसता सहज चालता यावे. जोरात वादळ सुटते की नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो.

डोळ्यात वाळू जाऊ नये म्हणून त्याच्या पापण्याही चांगल्या जाड असतात. जाड ओठांमुळे आणि बळकट दातांमुळे वाळवंटातील काटेरी झाडाझुडपांची पाने तो खाऊ शकतो. उंटाच्या पोटात एक पिशवीही असते. त्यात तो प्यायलेले पाणी साठवून ठेवतो. वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने बरेच दिवस पाणी मिळाले नाही तर ह्या पिशवीत साठवलेल्या पाण्यावर तो गुजारा करू शकतो.ह्या सर्व कारणांमुळे त्याला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते.

पूर्वीच्या काळी हत्ती आणि घोडे ह्यांच्याप्रमाणे उंट लढायांमध्ये वापरले जात असत. तसेच त्या काळातील अरबी व्यापारी उंटांचे मोठमोठे काफिले घेऊन फिरत असत. त्या काफिल्यातील उंटांच्या पाठीवर विकण्याचे भरपूर सामान लादले जात असे. खरोखरच उंट हे वाळवंटातील अत्यंत उपयुक्त असे वाहन आहे. आपल्या देशात कच्छच्या आणि राजस्थानच्या वाळवंटात त्याचा वाहन म्हणून खूप उपयोग होतो. शिवाय उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोर, कोट, पिशव्या इत्यादी वस्तू बनतात. वाळवंटात तर शेतीसाठीही त्याचा वापर केला जातो. म्हणूनच बिकानेर येथे राजस्थान सरकारने खास ‘कॅमल ब्रिडिंग फार्म’ उघडला आहे.

आजही अरबस्तानात उंटांच्या शर्यती लावल्या जातात. तिथे तर उंटिणीचे दूध प्यायलेही जाते. त्या दुधापासून चीज, बटर असे नानाविध पदार्थही बनतात. असा हा बहुपयोगी उंट सर्व लहान मुलांना खूप आवडतो. उंटाच्या पाठीवर बसून फेरफटका मारण्यात सर्वांनाच मौज वाटते. म्हणूनच तर तो प्राणी संग्रहालयात नेहमी असतोच.

Set 2: ऊंट निबंध मराठी – Essay on Camel in Marathi

उंट हा एक विचित्र प्राणी आहे. हा मूळत: भारतात सापडणारा प्राणी नाही. इ. स. पूर्व चौथ्या शतकात ग्रीक आक्रमकांबरोबर खैबर खिंडीमार्गे तो भारतात आला. भारताच्या वाळवंटी प्रदेशात तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. त्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आज वाळवंटातील जीवन त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.

उंटाला चार पाय, दोन, डोळे, शेपटी पाठीवर कुबड व लटकत असलेले ओठ असतात. वाळवंटात जेव्हा जोराचा वादळी वारा सुटतो तेव्हा नाकात वाळू जाऊ नये म्हणून तो नाकपुड्या बंद करून घेतो. उंटाचे गुडघे आणि मान कडक असते त्यामुळे त्याचा घर्षणापासून बचाव होतो. जाड ओठांमुळे तो वाळवंटातील काटेरी झाडा-झुडुपांची पाने खाऊ शकतो. त्याला ३४ दांत असतात.

उंट एका दिवसात ३६ लिटर पाणी पितो. जर त्याला खाण्यासाठी ताजी पाने मिळाली तर चार लिटर पाणी तो कमी पितो. उंटाच्या पोटात एक मोठी पिशवी असते तिला मदारी म्हणतात. त्यात तो अन्न व पाण्याची साठवण करतो. म्हणून खूप दिवस तो बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. ताजी पाने खाल्ली तर त्याची पाण्याची गरज आणखी कमी होते. वाळवंटात उंट हे सर्वात उपयुक्त वाहन आहे.

उंटाचे केस वस्त्रोद्योगात वापरले जातात. त्यापासून लोकर, दोरी, कोट, पिशव्या इ. तयार केले जाते. ओझे वाहण्यास, स्वारी करण्यास, शेती कामात उंटाचा उपयोग होतो. युद्धातही उंटांचा उपयोग होतो. २६ जानेवारीस सैनिक उंटावर बसून येतात ते आपणास दूरदर्शन वर दिसते. समुद्रकिनारी किंवा प्राणीसंग्रहालयात उंटावरुन फेरी मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.

ऊंट निबंध मराठी – Essay on Camel in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply