वाचवील पाणी, साठवील पाणी । त्यालाच फक्त जगवील पाणी ।

पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे साठे मर्यादित असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करावा असा संदेश या उक्तीतून दिलेला आहे.

‘पाणी म्हणजे जीवन ! पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलेले आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचे साठे अल्प आहेत. हे पाणी आपण वाचवले, त्याचा योग्य वापर केला, तरच त्याचा वापर भविष्यात करता येईल.

आपले शरीर जवळजवळ नव्वद टक्क्यांहून अधिक पाण्याने व्यापले आहे. पृथ्वीवर सुमारे ७०% भाग पाण्याने व्यापला असला तरी त्यातील बहुतांशी पाणी खारट आहे. त्याचा पिण्यासाठी दैनंदिन जीवनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे मर्यादित असलेल्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचा काटकसरीने वापर केल्यास, भविष्यात त्याचा वापर करता येईल. असे म्हटले जाते की, जगात तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठीच असेल. म्हणूनच पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि आपले जीवन वाचवा !

उज्ज्वल भवितव्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब साठवला पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply