माझा आवडता प्राणी सिंह : सिंह हा वन्य प्राणी आहे. जंगल हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहे. त्याच्या प्रचंड आकारमानामुळे आणि शक्तीमुळे त्याला “जंगलाचा राजा” म्हटले जाते. त्याचे मजबूत चार पाय, मोठे डोके, एक शेपटी आणि दोन चमकणारे डोळे ज्यामुळे सिंह भयंकर दिसते. सिंह त्याच्या गर्जना आणि शिकार करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या लेखात माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध विषयी तपशीलवार पाहू.

माझा आवडता प्राणी सिंह
माझा आवडता प्राणी सिंह

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध – Essay on Lion in Marathi

सिंह निबंध 10 ओळी – 10 Lines on Lion in Marathi

  1. सिंह हा वन्य प्राणी आहे.
  2. सिंहाला जंगलाचा राजा असेही म्हणतात.
  3. सिंह जंगलातील सर्वात बलवान प्राण्यांपैकी एक आहे.
  4. सिंहाला चार पायांचा प्राणी आहे.
  5. सिंहाचे चार पाय, मोठे डोके आणि दोन डोळे असलेले एक मजबूत शरीर आहे जे त्याला चमकदार रूप देतात.
  6. सिंहाला तीक्ष्ण दात आणि पंजे आहेत, ते त्याला शिकार खाण्यास मदत करतात.
  7. सिंह मांस खातो आणि त्याच्यात वेगाने धावण्याची क्षमता आहे.
  8. सिंहाचे शरीर राखाडी लहान आणि गुळगुळीत केसांनी झाकलेले आहे. आणि त्याच्या मानेभोवतीच्या केसांचा समूह ज्याला माने म्हणतात.
  9. सिंह सामान्यतः जंगलात आढळतात आणि काही प्राणीसंग्रहालयातही तुरुंगात असतात.
  10. जगाच्या विविध भागांमध्ये सिंहांच्या अंदाजे 10 प्रजाती आढळतात.
10 Lines on Lion in Marathi
10 Lines on Lion in Marathi

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध 100 शब्द – Essay on Lion in Marathi 100 Words

वनराज म्हटले की थाटमाट, ऐटबाज चाल आलीच. तसेच सिंहालाही प्राण्यांचा राजा म्हणतात. सर्व प्राणी वनात राहतात. म्हणून सिंहाला वनराज म्हणूनही ओळखतात. सिंह सर्व प्राण्यात शूर असतो. त्याची गर्जना दूरपर्यंत ऐकू येते. त्या सिंहगर्जनेने वनातील सर्व प्राणी घाबरतात. सिंहाचे दात मोठमोठे असतात. त्याच्या मानेवर भरपूर केस असतात. त्याला आयाळ असे म्हणतात. सिंहाचे पंजे ही तीक्ष्ण असतात.

सिंह वेगाने धावू शकतो. तो आपली शिकार पायांच्या पंजात पकडून आपल्या तीक्ष्ण व अणकुचीदार दातांनी खातो. सिंह जंगलातील गाई, हरीण अशा प्राण्यांची सहज शिकार करतो व तेच त्याचे अन्न असते. तो मांसाहारी व रानटी प्राणी आहे.

आपल्याला सिंह सर्कसमध्ये किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळतात. त्याच्या या शूरपणामुळे त्याला प्राण्यांचा राजा म्हणतात.

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध 130 शब्द – Essay on Lion in Marathi 130 Words

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याचा रुबाबही राजाला साजेसाच असतो. त्याचा रंग सोनेरी असतो. त्याचे डोके मोठे असते. त्या डोक्याभोवती मोठी आयाळ असते. त्याचे सुळे व त्याची नखे तीक्ष्ण व मजबूत असतात. त्याच्या पंजात खूप ताकद असते.

सिंह हा शूर प्राणी आहे. तो स्वत: शिकार करतो आणि तेच मांस तो खातो. इतरांनी केलेली शिकार वा मेलेला प्राणी सिंहाला आवडत नाही.

सिंहाचे राजेपण जंगलातील प्राणी मान्य करतात. तो जंगलात आनंदाने आणि अभिमानाने विहार करत असतो. संतापलेला सिंह फार भयंकर दिसतो. अशा वेळी तो माणसावरही हल्ला करतो आणि त्याला जखमी करतो किंवा ठारही करतो.

सिंहाच्या ओरडण्याला सिंहगर्जना म्हणतात. त्याच्या गर्जनेने सारे जंगल हादरून जाते. त्यामुळे सर्व प्राणी सिंहाला फार घाबरतात. लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्राचे नावसुद्धा ‘केसरी’ म्हणजे ‘सिंह’ असेच ठेवले होते.

असा हा शूर, शक्तिशाली प्राणी सिंह कोणाला आवडणार नाही बरे!

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध–Essay on Lion in Marathi
माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध, Essay on Lion in Marathi

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध 150 शब्द – Essay on Lion in Marathi 150 Words

सिंह हा जंगलचा राजा आहे. म्हणून त्याला वनराज म्हणतात. तो शौर्याचे प्रतिक आहे.

सिंहाला आयाळ असल्यामुळे तो रूबाबदार दिसतो. तीक्ष्ण दात, सुळे आणि तीक्ष्ण नखे ह्यांच्यामुळे त्याची गणना हिंस्त्र प्राण्यांमध्ये होते. जंगलात सिंहाची गर्जना ऐकली की चिमणीसुद्धा ओरडायला घाबरते. सिंह अगदी हत्तीलासुद्धा नमवू शकतो.

सर्कशीतला सिंह किंवा पिंज-यात ठेवलेला सिंह ह्यांच्याकडे पाहावत नाही.

सिंहाच्या कुटुंबात दोन तीन सिंहिणी असतात आणि छावे असतात. ह्या सिंहिणीच भक्ष्यावर हल्ला करून शिकार आणतात. त्यांनी आणलेल्या अन्नातील मोठा वाटा सिंह स्वतः घेतो म्हणूनच सिंहाचा वाटा’ असा शब्द मराठी भाषेत पडला आहे. परंतु भक्ष्य मारण्याबाबतीत मात्र सिंह आळशीपणाच करतो.

भारतात पूर्वी पुष्कळ सिंह होते परंतु पुढे पुढे जंगलांचा आकार कमी झाल्यामुळे सिंहांची संख्याही कमी झाली. सध्या गुजरातमधील गीर येथील अभयारण्यात आपल्याला सिंह दिसतात. आफ्रिकेतही सिंह आहेत. तेथील गवताळ भागात त्यांना हरणे, झेब्रे, सांबर असे अनेक प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात.

अशा ह्या वनराजाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या शिकारीवर सरकारने बंदी घातलेली आहे.

जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध – Maza Avadta Prani Sinha Nibandh Marathi

सिंह हा मांजराच्या कुलातील जंगलात रहाणारा हिंस्त्र प्राणी आहे. फिकट तपकिरी रंगाचा हा प्राणी खरोखरी जंगलचा राजा आहे. त्याची ती डौलदार चाल, मानेभोवतीची दाट आयाळ आणि धीरगंभीर गर्जना मनाला भुरळ घालते.

सिंह बहुधा कळप करून रहातात. त्याचे आयुष्य साधारणः २५ वर्षे असते. सिंह हे सिंहीणीपेक्षा मोठे असतात व त्यांना आयाळ असते. सिंहाच्या बछड्यांना छावा म्हणतात. जंगलात सिंहाचे क्षेत्र ठराविक असते. या ठराविक क्षेत्रातच ते फिरतात व शिकार मिळवितात. सिंह मुख्यतः भारत व मध्य आशियात आढळतात.

सिंह दुसऱ्या जंगली प्राण्यांना मारुन खातात. हरणे, कोल्हे, झेब्रा, काळविट हे त्यांचे भक्ष होय. आजकाल जंगले कमी-कमी होत चालल्याने त्यांचे हे नैसर्गिक अन्नही कमी होत आहे. मग हे भुकेले सिंह जंगलांजवळच्या गावातील बैल, गाय, शेळ्या यांसारखे पाळीव प्राणी मारतात. कधी-कधी ते नरभक्षक ही बनतात. सिंहांना नेहमी पाण्याच्या आसपास रहायला आवडते. ते उत्तम पोहू शकतात.

परंतु आपल्या देशातील सिंहांची संख्या हळू-हळू कमी होत चालली आहे. हे असेच चालू राहिल्यास आपल्याला सिंह फक्त फोटोतच पहायला मिळतील. त्यांची कातडी व दातांसाठी सिंहांची अंदाधुंद शिकार होत आहे. त्यांपासून अनेक शोभेच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे सरकारने त्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध लादले आहेत व शिक्षेची तरतूद केली आहे. गुजरात मधील गिरचे जंगल हे सिंहांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध 300 शब्द – Essay on Lion in Marathi 300 Words

सिंह रूपाने फार रूबाबदार असतो. त्याची भलीमोठी आयाळ, भेदक नजर, चपळ शरीर, तीक्ष्ण सुळे आणि टोकदार नख्या ह्यांच्यामुळे त्याला ‘जंगलचा राजा’ अशी पदवी मिळाली आहे. सिंहाला आपण शूरतेचे प्रतिक मानतो. म्हणूनच एखादा माणूस शूरवीर असला की त्याला सिंह असे म्हणण्याची पद्धत आहे. शिख लोकांमध्ये तर पुरूषांच्या नावापुढे सिंह हाशब्द लावण्याची प्रथाच पडलेली आहे.

सर्वसाधारणपणे सिंहाचे जीवन पंचवीस वर्षांचे असते. मादीपेक्षा नर अधिक मोठा असतो, त्याला आयाळ असते आणि त्याची गर्जनाही अधिक जोरदार असते.

सिंह कुटुंबवत्सल प्राणी आहे. एका सिंह कुटुंबात दोन तीन माद्या असतात. ह्या माद्याच शिकार करतात. क्वचित कधीतरी सिंह स्वतः शिकार करतो. मात्र माद्यांनी आणलेल्या शिकारीतील मोठा वाटा सिंह घेतो. म्हणूनच ‘सिंहाचा वाटा’ असा वाक्प्रयोग पडला असावा. वाघाप्रमाणेच सिंहही आपल्या हद्दीत दुस-या सिंहाना येऊ देत नाही. कळपातले छावे लहानपणी अगदी असहाय असतात कारण त्यांचे डोळे जन्मतः उघडलेले नसतात. हे छावे आपल्या मातेच्या अंगावरचे दूध पितात. त्यांची मान तोंडात धरून त्यांची आई त्यांना इथून तिथे नेते. मार्जार कुळातील सर्व प्राणी म्हणजे मांजर आणि वाघ हेसुद्धा असेच करतात.

आपल्या देशात पूर्वी ब्रिटिशांच्या काळात सिंहाची खूप शिकार झाली. त्यामुळे पृथ्वीतलावरून सिंह नामशेष होईल की काय अशी भीती निर्माण झाली होती. आता आपण आपल्या देशात अनेक ठिकाणी अभयारण्य उभारून सिंहाच्या रक्षणासाठी आणि एकुणच जीव वैविध्य राहावे ह्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपल्या इथे गीरच्या जंगलात सिंह असतात. तसेच मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही सिंह आहेत.

लहानपणापासून पाळलेल्या सिंहांना माणसाळवता येते त्यामुळे सर्कशीत आपल्याला सिंह दिसतात. परंतु सिंहाला स्टुलावर बसलेले पाहून मात्र वाईट फार वाटते.

आपल्या पुराणात नरसिंहाची गोष्ट आहे. हिरण्यकश्यपूराक्षसाचा पुत्र प्रल्हाद हा विष्णुचा भक्त असतो. ते हिरण्यकश्यपूला सहन होत नाही म्हणून तो प्रल्हादाचा छळ करतो. तेव्हा त्याला वाचवायला भगवान विष्णु नरसिंहाच्या रूपाने खांबातून प्रकट होतात आणि हिरण्यकश्यपूला ठार मारतात. त्या रूपात शरीर मानवाचे आणि तोंड सिंहाचे असे रूप भगवंताने घेतलेले आहे. सिंगापूर येथील राष्ट्रीय चिन्हसुद्धा मत्स्यसिंहाचे म्हणजे शरीर माशाचे आणि तोंड सिंहाचे आहे.

असा हा सिंह..रूबाबदार,शूर आणि धाडसी.

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध 400 शब्द – Essay on Lion in Marathi 400 Words

जंगलचा राजा सिंहाची गती त्याचे डौलदार शरीर, देशी परदेशी लोकांना इतके आवडते की जाहिरात उद्योगात सिंहाला अनेक रूपांत चित्रित करण्यात आले. कार, स्कूटर, ट्रक इ. ची गती दर्शविण्यासाठी केलेत्या जाहिरातीत याचा प्रयोग केला गेला. आपल्या या प्रिय प्राण्याबहल मनुष्याला खूप कमी ज्ञान आहे.

सिंधू नदीच्या खोऱ्यात मिळालेल्या मुद्रांवर सिंहाची अनेक रूपे चित्रित केली आहेत. यावरून कळते की, पाच हजार वर्षांपूर्वी त्या भागात खूप सिंह सापडत असत. आजही भारत सरकार “शेरे पंजाब” व “शेरे काश्मीर” हा किताब देते.

सामान्यपणे मृत सिंह जंगलात क्वाचितच सापडतात. सिंहाच्या शरीराला जळवा चिकटेलल्या असतात. ज्या सिंहाचे रक्त शोषतात त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी तो मातीत लोळतो.

आपापसांत लढताना जर सिंह जखमी झाला तर तो जखम जिभेने साफ करतो. सिंहाच्या पायाचे तळवे फार नाजूक असतात. म्हणून तो तापलेल्या जामिनीवर चालत नाही. जर चालावे लागलेच तर त्याच्या पायाला फोड येतात.

सिंहाचे आयुष्य २५ वर्षांचे असते. चांगली देखभाल झाली तर तो जास्त काळ जिवंत राहतो. थंडीच्या दिवसांत त्याची त्वचा खूप सुंदर होते. म्हणून शिकारी या दिवसांत त्याची शिकार करतात. सिंहिणीपेक्षा सिंह मोठा असतो. त्याची गर्जना खूप मोठी आणि बराच काळ टिकणारी असते.

सिंहिणीचे छावे सुरुवातीला आंधळे व असहाय असतात म्हणून ते आईचे दूध ते पितात. तिने आणून दिलेले मांस खातात. छाव्याची त्वचा कोमल असते. म्हणून सिंहिणी त्यांच्या मानेला तोंडात धरून इकडून तिकडे घेऊन जाते.

ज्याप्रमाणे कुत्रा आपल्या गल्लीत सिंह असतो त्याप्रमाणे सिंह पण आपल्या भागात दुसऱ्या सिंहाला येऊ देत नाही.

सिंहाला जंगलातील जनावरांचे मांस खाणे आवडते. जर ते त्याला मिळाले नाही तर तो गाई म्हशीला पळवून नेतो. भुकेला सिंह गावातील निष्पाप लोकांना उचलून नेतो. जर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली तर तो नरभक्षकच होतो.

सिंहाला पाण्यात राहणे आवडते. म्हणून उन्हाळ्यात तो एखाद्या तळ्याच्या काठी राहातो. तो चांगला पोहणारा आहे. पाण्याच्या प्रवाहात कित्येक मैल तो पोहत जातो. राजे लोक आपल्या पाहुण्यांना सिंहाच्या शिकारीसाठी बोलावीत असत. भारत सिंहासाठी प्रसिद्ध आहे. परकीय चलन मिळविण्यासाठी या सुंदर जनावराची शिकार केली जाते. म्हणून त्यांची संख्या खूप कमी झाली.

परदेशी लोक आपल्या घरांत सिंहाची कातडी आणि डोके लटकावतात. सिंहाची कातडी खूप महाग असते.

सरकारने सिंहांच्या शिकारीवर निर्बंध लावल्यानंतरही त्यांची शिकार होतच राहिली आणि कातडी महाग होतच राहिली. मंत्रालयाने हा उपाय काढला की जनावरांची सापडलेली, जप्त केलेली कातडी, हस्तिदंत याला आग लावावी म्हणजे ती उपयोगात आणता येणार नाही.

१८ एप्रिल १९९१ ला केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री मेनका गांधी यांनी प्रगती मैदानजवळ ७८ लाख रुपये किमतीची जनावरांची कातडी जाळली. त्यांचे मत असे होते की पुन्हा ही कातडी तस्करांच्या हाती लागणार नाही. याउलट काही जणांचे म्हणणे असे होते की, ही कातडी वस्तुसंग्रहालयात ठेवावी. प्रत्येक कातडीच्या नमुन्याखाली तिची माहिती लिहावी. त्यामुळे सामान्य लोकांना वन्य प्राण्यांबहल माहिती मिळेल. अशा प्रकारे देशातून नष्ट होत जाणाऱ्या दुर्मिळ संपदेला नष्ट होण्यापासून वाचविता येईल.

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध, Essay on Lion in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न 1. सिंह मांसाहारी आहेत की सर्वभक्षक आहेत?

उत्तरः सिंह हे मांसाहारी आहे, म्हणजे तो इतर प्राण्यांचे मांस खातो.

प्रश्न 2. जगामध्ये किती सिंह आहेत?

उत्तरः सिंहांची सध्याची लोकसंख्या सुमारे 20000 ते 30000 आहे.

प्रश्न 3. सिंह सरासरी किती तास झोपतो?

उत्तर: सिंह दररोज सरासरी अठरा तास झोपतो.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply