माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी : घोडा एक वेगवान आणि मजबूत प्राणी आहे. घोडा हे लांब पल्ल्यापर्यंत सहज धावू शकते. इतिहासावर नजर टाकली तर त्यांच्या निष्ठेमुळे त्यांनी त्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली हे लक्षात येईल. शिवाय, त्यांनी त्यांच्या मालकांना मदत केली आणि वाचवले. उदाहरणार्थ, चेतक हा एक प्रसिद्ध घोडा होता. याव्यतिरिक्त, अरबी घोडे जगभरात लोकप्रिय आहेत. घोड्यावरील निबंधाद्वारे आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

माझा आवडता प्राणी घोडा
माझा आवडता प्राणी घोडा

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी – Essay on Horse in Marathi

घोडा निबंध 10 ओळी – 10 Lines on Horse in Marathi

  1. घोडा एक अतिशय प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण प्राणी आहे.
  2. घोडे पांढरे, लाल किंवा काळा रंगाचे असते.
  3. त्याला चार पाय आहेत.
  4. त्याला केस असलेली सुंदर शेपटी असते.
  5. हा उंच प्राणी आहे.
  6. घोडे तपकिरी, पांढरा, काळा, सोनेरी आणि बरगंडी अशा अनेक रंगात असतात.
  7. निरोगी घोड्याचे आयुष्य 25 ते 30 वर्षांमध्ये असते, जे त्यांच्या राहणीमानानुसार बदलू शकते.
  8. त्याचे शरीर खूप मजबूत आहे.
  9. घोडा धान्य, गवत आणि फळे खातो.
  10. लोक त्याचा वापर सवारीसाठी करतात.
  11. ते पूर्वी युद्धभूमीवर वापरले जात होते.
  12. पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासासाठी वापरला जातो.
10 Lines on Horse in Marathi
10 Lines on Horse in Marathi

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी 150 शब्द – Essay on Horse in Marathi 150 Words

घोडा आपला मित्र प्राणी आहे. तो आपल्या खूप उपयोगाचा आहे. हत्ती आणि उंटाप्रमाणे हा ओझे वहाणे, नांगराला जुंपणे, गाडी ओढणे, सवारी करणे आदी कामाला उपयोगी पडतो. सैन्यामध्येही घोड्यांचा उपयोग केला जातो. घोड्यावर बसून प्रवास करण्यात मोठाच आनंद असतो. घोड्यांची शर्यत पहायला हजारो लोक जातात आणि त्याच्यावर सट्टा लावतात.

घोडा एक शक्तीशाली प्राणी आहे. हा खूप वेगाने धावू शकतो आणि खूप दूरपर्यंत, मोटार आदी किती धावू शकते हे पहाण्यासाठी ‘हॉर्सपॉवर’ चा उपयोग केल्या जातो. मिरवणूक आणि तांगा आदीसाठी घोड्यांचा उपयोग करण्यात येतो. घोडा पाळणे ही एक प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. हा एक अंत्यत स्वामीभक्त प्राणि आहे. महाराणा प्रतापांचा चेतक नावाचा घोडा तर जग प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज देखील घोड्यावरूनच प्रवास करीत, शिवाजी राजांना तर नेहमीच घोड्यावर बसलेलं दाखवतात.

जंगलात घोडे मोठ्या प्रमाणात दाखवले जातात. पंरतु काही विशिष्ट भागातच त्यांना त्या ठिकाणावरून पकडले जाते आणि पाळीव केले जाते. डोंगराळ भागात देखील घोडा सहजपणे ओझं आणि सवारी करू शकतो. एका पुराण कथेनुसार घोड्यांची उत्पत्ती संमुद्र मंथनातून झाली होती.

घोडा गवत, चणे, दाणे आदी खातो, स्कूटर, कार, तीन पाई रिक्षा आदी आल्याने घोड्यावरून प्रवास करण्याची सवय कमी झाली आहे. आता शहरे, गावं, खेडी आदीमध्ये तांगा किंवा घोडागाडी क्वचितच पहायला मिळते. टट्ट घोड्यांचीच एक प्रजाती आहे. डोंगराळ आणि दूर्गम ठिकाणी टट्टूचा वापर केला जातो. टटू उंचीला थोडा कमी असतो.

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी–Essay on Horse in Marathi
माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी, Essay on Horse in Marathi

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी 200 शब्द – Essay on Horse in Marathi 200 Words

हत्ती आणि उंटाप्रमाणेच घोडा पण एक उपयोगी प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला अश्व आणि इंग्रजीत ‘हॉर्स’ म्हणतात. पुराणांच्या अनुसार समुद्रमंथनाच्या वेळी जी चौदा रत्ने निघाली त्यातील एक रत्न घोडा होता. हा एक शक्तिशाली प्राणी आहे. मोटर, विद्युतशक्तीला ‘हॉर्स पावर’ म्हणूनच म्हणतात. घोड्याचा बसण्यासाठी, टांग्याला लावण्यासाठी, डोंगराळ भागात जाण्यासाठी, चारा वाहून नेण्यासाठी उपयोग होतो. प्राचीन काळात घोडा राजे महाराजांच्या सेनेचे प्रमुख अंग होता. त्यांच्या रथांनाही घोडे जोडले जात. विवाहाच्या शुभप्रसंगी वराला घोडीवर बसवितात.

घोड्यांचा पूर्वीपासून आजतागायत युद्धात उपयोग केला जातो. राजे महाराजांच्या कथांशी घोड्यांच्या कथाही जोडल्या गेल्या आहेत. महाराणा प्रतापचा घोडा चेतक, राणी लक्ष्मीबाईचा घोडा यांच्या शौर्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. आजही पोलीस दल व सैन्यदलात घोडयांचा उपयोग केला जातो. घोड्यांचा अनेक जाती आहेत. ‘अरबी घोडा’ उच्च प्रतीचा समजला जातो. घोडे अनेक रंगांचे असतात.

टांग्यांना जुंपल्या जाणाऱ्या घोड्यांच्या पायाला नाल ठोकतात. त्यामुळे घोड्याचे खूर खराब होत नाहीत व पाय चांगले राहतात. दुर्गम डोंगराळ भागात सामान आणि माणसांची वाहतूक तटू चांगल्या प्रकारे करू शकतात. घोडे खुप वेगाने धावू शकतात. त्यामुळे घोडयांच्या शर्यती हा मनोरंजनाचा लोकप्रिय खेळ आहे. गवत व चणे हे त्याचे अन्न होय. घोडा एक हुशार प्राणी आहे. योग्य प्रशिक्षण दिल्यास तो माणसाच्या आज्ञा पाळतो. तो अतिशय इमानदार व आज्ञाधारक असतो. कुत्र्यांप्रमाणेच घोडे ही माणसाचे चांगले मित्र आहेत.

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी 250 शब्द – Essay on Horse in Marathi 250 Words

घोडा हा रूबाबदार प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला अश्व, वारू, हयग्रीव इत्यादी नावे आहेत. पुराणात लिहिले आहे की देवदानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा बाहेर निघालेल्या चौदा रत्नांमध्ये एक रत्न ‘अश्व’ हेच होते. इंग्रजीत घोड्याला हॉर्स म्हणतात.यंत्रशक्ती मोजण्यासाठी हॉर्सपॉवर हाच शब्द वापरला जातो.

खूप पूर्वीपासूनच घोड्याचा वापर वाहन म्हणून माणूस करू लागला. अत्यंत वेगाने पळणे हा घोड्याचा मोठा गुण आहे. घोडेस्वारी करण्यासाठी, टांग्याला लावण्यासाठी, डोंगराळ प्रदेशात जाण्यासाठी आणि सामानसुमान वाहून नेण्यासाठी तट्टांचा चांगला उपयोग होतो. लग्नप्रसंगी नवरदेवाला घोड्यावरून आणतात. टांग्याच्या घोड्याच्या पायांना नाल ठोकतात. त्यामुळे त्याचे खूर खराब होत नाहीत.

जुन्या काळी घोडदळ हा सैन्याचा खूप मोठा भाग होता. युद्धात घोडे आणि घोडेस्वार खूप मोठी कामगिरी बजावीत असत. राजेमहाराजांच्या शौर्याशी ब-याच अश्वकथा जोडल्या गेल्या आहेत. महाराणा प्रतापाचा चेतक घोडा आणि राणी लक्ष्मीबाईचा घोडा हे इतिहासात प्रसिद्धी पावलेले अश्व आहेत. थोरला बाजीराव घोड्यावर बसूनच जेवण घेत असे. रोमन काळात अश्वरथांच्या स्पर्धा लावल्या जात असत. आजही पोलीसदलात आणि सैन्यदलात घोड्याचा वापर केला जातो. अरबी घोडे हे जातिवंत मानले जातात. पूर्वीच्या काळी अरबस्तानचे व्यापारीलोक घोडे घेऊन विकायला भारतात येत असत. चांगल्या घोड्याची परीक्षा करण्याचेही तंत्र होते. त्यानुसारच राजेमंडळी घोडे विकत घेत असत.

आजही उत्तम घोड्यांची पैदास करणारी स्टडफार्म भारतात आणि जगभरात आहेत. तिथे उत्तम जातीच्या घोड्यांची पैदास होते. हे घोडे लाखो रूपयांना विकले जातात. अश्वशर्यती लावून सट्टा खेळणे हा जगातील अतीश्रीमंत लोकांचा आवडता खेळ असतो. ऑलिंपिक स्पर्धेमध्येही अश्वारोहण हा खेळ समाविष्ट आहे.

घोडा हा कुत्र्याप्रमाणेच इमानदार आणि बुद्धिमान प्राणी आहे. त्याला योग्य प्रशिक्षण दिले तर तो माणसाच्या आज्ञा पाळतो. घोड्यांना तबेल्यात ठेवतात. घोड्याला सांभाळणा-या सेवकाला मोतदार असे म्हणतात. घोड्याचा रोज खरारा करावा लागतो. हरभरा घोड्याला खूप आवडतो.

असा हा घोडा माणसाचा चांगला मित्र आहे.

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी 300 शब्द – Essay on Horse in Marathi 300 Words

हत्ती आणि उंटाप्रमाणेच घोडा पण उपयोगी प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला अश्व आणि इंग्रजीत ‘हॉर्स’ म्हणतात. हा एक शक्तिशाली प्राणी आहे. मोटर, विद्युतशक्तीला ‘हॉर्स पावर’ म्हणूनच म्हणतात. घोड्याचा बसण्यासाठी, टांग्याला लावण्यासाठी, डोंगराळ भागात जाण्यासाठी, चारा वाहून नेण्यासाठी उपयोग होतो. प्राचीन काळात घोड़ा राजे महाराजांच्या सेनेचे प्रमुख अंग होता. त्यांच्या रथांनाही घोडे जोडले जात. विवाहाच्या शुभप्रसंगी वराला घोडीवर बसवितात.

पुराणांच्या अनुसार समुद्रमंथनाच्या वेळी जी चौदा रत्ने निघाली त्यातील एक रत्न घोडा होता. घोड्यांचा पूर्वीपासून आजतागायत युद्धात उपयोग केला जातो. राजे महाराजांच्या कथांशी घोड्यांच्या कथाही जोडल्या गेल्या आहेत. महाराणा प्रतापचा घोड़ा चेतक, राणी लक्ष्मीबाईचा घोडा यांच्या शौर्याचे उल्लेख इतिहासात सापडतात.

घोड्यांच्या अनेक जाती आहेत. ‘अरबी घोडा’ उच्च प्रतीचा समजला जातो. घोडे अनेक रंगांचे असतात. घोड्यांना प्रशिक्षक प्रशिक्षित करतात. त्याला ताब्यात ठेवण्यासाठी लगाम घातला जातो. घोड्यावर स्वार होण्यापूर्वी त्याच्या पाठीवर जीन कसून बांधतात. रिकिबीत पाय ठेवून घोड्यावर स्वार होता येते. घोडे धावण्याच्या व उड्या मारण्याच्या कसरती करू शकतात.

घोडे गवत आणि चणे खातात. वाळूत झोपल्यास घोड्याचा थकवा दूर होतो. घोड्याला रोज फिरविणे आवश्यक असते. पोलिस आणि सेनेकडे उत्तम प्रतीचे घोडे असतात. सामान्य व्यक्ती घोडे पाळू शकत नाहीत. आता येण्या-जाण्यासाठी स्कूटर, मोटरसायकल, मोटारींचा उपयोग केला जातो. घोडे महाग असल्यामुळे श्रीमंत लोकच ते घेऊ शकतात.

टांग्यांना जुंपल्या जाणाऱ्या घोड्यांच्या पायाला नाल ठोकतात. त्यामुळे घोड्याचे खूर खराब होत नाहीत व पाय चांगले राहतात. तटू ही पण एक घोड्याचीच जात आहे. दुर्गम डोंगराळ भागात सामान आणि माणसांची वाहतूक तटू चांगल्या प्रकारे करू शकतात.

भारतीय संस्कृतीत घोड्याचे स्थान महत्त्वाचे आहे. धार्मिक व विवाहाच्या मिरवणुकीत सजलेले घोडे बघून उत्साह संचारतो. गुरु गोविंद सिंह जयंती, महाराणा प्रताप जयंती आणि रामनवमीच्या दिवशी सजविलेले घोडे लोकांच्या मनातील प्राचीन गौरवाची व वीरत्वाची भावना जागृत करतात.

पुढे वाचा:

प्रश्न 1 – घोड्यांबद्दल काही मजेदार तथ्ये सांगा.

उत्तर: घोडे जन्मानंतर लगेचच धावू लागतात. त्यांच्या सांगाड्यात सुमारे २०५ हाडे आहेत. शिवाय, जमिनीवर राहणाऱ्या इतर सस्तन प्राण्यांपेक्षा घोड्यांचे डोळे मोठे असतात.

प्रश्न 2 – घोड्याचे आयुष्य किती असते?

उत्तर: घोड्याचे आयुष्य 25 ते 30 वर्षे असते. हे मुळात त्यांच्या राहणीमानावर अवलंबून असते. सहसा, ते गवताळ भागात किंवा शेतात राहणे पसंत करतात जेथे ते सर्व प्रकारचे हिरवेगार खाऊ शकतात.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply