Set 2: वाचाल तर वाचाल निबंध मराठी – Vachal Tar Vachal Marathi Nibandh

काहीजण वाचन हा छंद मानतात, तो जोपासतात. वाचन हीच खरी संपत्ती मानून वाचनाचा ध्यास घेतात. तर काहीजण वाचनाकडे पाठ फिरवतात; पण वाचन संस्कृती वाढली तरच तुम्ही वाचाल. वाचना शिवाय तुम्हाला अस्तित्व असणार नाही.

ग्रंथ, पुस्तके हा जगातील सर्वात मोठा खजिना आहे. त्याचा कितीही वापर केला तरी तो संपत नाही. उलट तो खजिना दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाची आवड असणे गरजेचे असते. वाचनाशिवाय कोणत्याही क्षेत्रातील प्रगती होत नाही. कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान मिळत नाही, सर्कशीतील एकखांबी तंबूप्रमाणे वाचनाचे महत्त्व आपल्या जीवनात आहे. म्हणूनच वाचनाचा छंद वृद्धिंगत करण्यासाठी माणूस नेहमी ज्ञानाचा भुकेला असला पाहिजे.

वाचनामुळे माणूस सुसंस्कारित होतो. त्याला पूर्वजांचा इतिहास कळतो. देशातील आणि जागतिक पातळीवरील चालू घडामोडी वृत्तपत्र वाचनातून आपल्याला कळतात. रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या महान ग्रंथांतील तत्त्वज्ञान वाचनाशिवाय कसे कळणार? वाचनाचे महत्त्व ओळखून अमेरिकेतील अँड्रयू कार्नेजी नावाच्या थोर माणसाने आपली सारी संपत्ती मुलांच्या नावे करण्याऐवजी खेडेगावात वाचनालये उभारण्यात खर्च करावी असे मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे. म्हणूनच वाचन करा, वाचत रहा, तरच वाचाल !

Set 2: वाचाल तर वाचाल निबंध मराठी – Vachal Tar Vachal Marathi Nibandh

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच दलित-पीडित, गरीब, अशिक्षित, दीनदुबळ्या जनतेला हा संदेश दिला होता- ‘वाचाल तर वाचाल!’ माणूस शिकला नाही; अशिक्षित राहिला की, त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार हे सगळे त्याची पिळवणूक करतात. तो सर्वांचा गुलाम होतो.

अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी पडले, तर त्याला दृष्ट लागली, नजर लागली, असे तो मानतो. साप-विंचू चावला वा कुठली रोगराई आली, तर योग्य औषधोपचार न करता तो वैदू भगत, गंडा, दोरा असे उपाय करत राहतो.

शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही. योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन दयावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत. .

ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)!

वाचाल तर वाचाल निबंध मराठी – Vachal Tar Vachal Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply