Set 1: वाचन एक चांगला छंद मराठी निबंध – Vachan Ek Uttam Chand Nibandh Marathi

‘वाचाल, तर वाचाल!’ असा मोलाचा संदेश आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. तो आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे.

वाचनामुळे आपले मनोरंजन होते. गोष्टी व गाणी वाचण्यातील आनंद आपल्याला मिळतो. आपण इतिहासातील गोष्टी वाचतो. पुराणातील गोष्टी वाचतो. या वाचनामुळे फार फार वर्षांपूर्वीच्या घटना आपल्याला कळतात. जणू काही आपण जुन्या काळात फिरून येतो.

वाचनामुळे आपल्याला परदेशांची माहिती मिळते. तेथील लोकांचे जीवन कळते. परदेशांत न जाता घरबसल्या आपल्याला परदेशांचे दर्शन घडते.

वाचनामुळे विविध विषयांची माहिती मिळते. आपले ज्ञान वाढते आणि अज्ञान दूर होते. अशा प्रकारे वाचनामुळे आपले जीवन सुखी होते.

Set 2: वाचन एक चांगला छंद मराठी निबंध – Vachan Ek Uttam Chand Nibandh Marathi

वाचन हा एक चांगला छंद आहे. वाचनाने चांगली करमणूक होते. ज्याला वाचनाची आवड असते, त्याला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात पुस्तकाची चांगली सोबत होते. म्हातारपणीही वाचन हे खूप मदत करते. त्यामुळे म्हातारपणाचे दिवस कंटाळवाणे वाटत नाहीत.

वाचनाने ज्ञानप्राप्ती होते. वाचनाने खूप गोष्टींची माहिती होते. पूर्वीच्या काळात कोण कोण राजे होते, त्यांनी काय काय पराक्रम केले, हे इतिहासाची पुस्तके सांगतात. महापूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांत किंवा लढाया, आक्रमण अशा मानवांनी आणलेल्या संकटांत ती माणसे कशी वागली होती, ते आपल्याला ग्रंथवाचनातूनच कळते. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसे आपली आत्मचरित्रे लिहून ठेवतात.

काही माणसे इतर मोठ्या माणसांची चरित्रे लिहून ठेवतात. ही चरित्रे आपण वाचली, तर आपल्याला खूप शिकायला मिळते. काव्याची पुस्तके वाचल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो. सुंदर सुंदर कविता आपल्या ओळखीच्या होतात. पण या सगळ्यासाठी हवी वाचनाची आवड!

Set 3: वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध – Vachan Ek Uttam Chand Nibandh Marathi

भावबंध असा धरी छंद, जाई तुटोनिया मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.

वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मातील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.

आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.

आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो.

खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.

वाचन एक चांगला छंद मराठी निबंध – Vachan Ek Uttam Chand Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply