Set 1: गुरू नानक निबंध मराठी – Guru Nanak Nibandh Marathi

‘नानक नाम जहाज है’ नामक एक हिंदी चित्रपट खूप वर्षांपूर्वी येऊन गेला. ह्या संसाररूपी सागरातून प्रवास करण्यासाठी नानक नावाच्या जहाजाचा आसरा घेतला तर हा खडतर प्रवास सुसह्य होतो असे त्या चित्रपटाचे स्वरूप होते. खरोखर आपल्या देशात अनेक सिद्धपुरूष आणि संतमहात्मे होऊन गेले. गुरू नानक हे त्यांच्यापैकीच एक होत. शीख धर्माची संस्थापना नानकांनीच केली असे मानले जाते.

त्यांचा जन्म इस १४६९ मध्ये पंजाबातील तलवंडी ह्या गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव कल्याणचंद दास बेदी होते आणि मातेचे नाव तृप्तादेवी असे होते. कल्याणचंद हे सरकार दरबारी नोकरी करीत होते. गुरू नानक स्थानिक भाषांच्या जोडीला फारसी आणि अरबी भाषाही शिकले होते. त्यांचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षीच सुलक्षणादेवी ह्यांच्याशी लावून देण्यात आला होता. तिच्यापासून त्यांना लक्ष्मीचंद आणि श्रीचंद अशी दोन मुले झाली.

त्यानंतर १९८५ साली तत्कालीन मुस्लिम सुभेदार दौलतखान लोधी ह्याच्याकडील भांडारगृहात मेव्हण्याच्या सांगण्यावरून नानकांना नोकरी लागली. परंतु त्यांचा पहिल्यापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. तिथेच त्यांची भेट मर्दाना नामक एका ज्येष्ठ मुस्लिम सिद्धपुरूषाशी झाली आणि त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले.

१४९६ साली त्यांना साक्षात्कार झाला. ‘देव हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही तो निराकार आहे,’ ही शिकवण सांगण्यासाठी त्यांनी घराचा त्याग केला. गुरू मर्दाना ह्यांच्यासोबत ते गावोगाव आपला संदेश देण्यासाठी फिरू लागले. हिंदू धर्मातील जातीभेद, निरर्थक कर्मकांडे आणि मूर्तीपूजेवर त्यांनी हल्ला चढवला. ह्या दौ-यांत त्यांना ज्या काही चीजवस्तू मिळत त्या ते गोरगरिबांत वाटून टाकत असत. त्याहून जास्त मिळाले तर लंगर उभारून त्यात गोरगरिबांच्या जेवणाची सोय केली जाई. आजही सर्व गुरूद्वारात लंगरची पद्धत पाळली जाते.

त्यांच्या हयातीतच त्यांना गुरू हे पद मिळाले. त्यांनी आपला शिष्य लहन ह्यास अंगद असे नाव देऊन आपला उत्तराधिकारी बनवले. २२ सप्टेंबर, १५४३ रोजी त्यांचा पंचतत्वात विलीन झाला असला तरी त्यांच्या शिकवणीच्या माध्यमातून ते आजतागायत जिवंतच आहेत. शिख पंथाच्या दहा गुरूंपैकी ते पहिले गुरू होते. गुरूग्रंथसाहेब ह्या शिखांच्या धार्मिक ग्रंथात त्यांनी केलेल्या रचना आहेत.
असे होते शिखांचे संस्थापक गुरू नानक.

Set 2: गुरू नानक निबंध मराठी – Guru Nanak Nibandh Marathi

शिख ही भारतातील एक धडाडीची आणि उद्यमशील जमात मानली जाते. सैन्यातही शीख लोक मोठ्या संख्येने असतात. तसेच उद्योगव्यवसायातही शीख लोक मोठ्या संख्येने असतात. भारताबाहेरही कॅनडा इत्यादी ब-याच देशात त्यांनी खूप नाव कमावले आहे. अशा ह्या शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक हे एक श्रेष्ठ संत आपल्या भारतात होऊन गेले.

‘नानक नाम जहाज है’ नामक एक हिंदी चित्रपट खूप वर्षांपूर्वी येऊन गेला. ह्या संसाररूपी सागरातून प्रवास करण्यासाठी नानक नावाच्या जहाजाचा आसरा घेतला तर हा खडतर प्रवास सुसह्य होतो असे त्या चित्रपटाचे स्वरूपहोते.

खरोखर आपल्या देशात अनेक सिद्धपुरूष आणि संतमहात्मे होऊन गेले. गुरू नानक हे त्यांच्यापैकीच एक होत. शीख धर्माची संस्थापना त्यांनीच केली.

त्यांचा जन्म इस १४६९ मध्ये पंजाबातील तलवंडी ह्या गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव कल्याणचंद दास बेदी होते आणि मातेचे नाव तृप्तादेवी असे होते. कल्याणचंद हे सरकार दरबारी नोकरी करीत होते. गुरू नानक स्थानिक भाषांच्या जोडीला फारसी आणि अरबी भाषाही शिकले होते. त्यांचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षीच सुलक्षणादेवी ह्यांच्याशी लावून देण्यात आला होता. तिच्यापासून त्यांना लक्ष्मीचंद आणि श्रीचंद अशी दोन मुले झाली.

त्यानंतर १९८५ साली तत्कालीन मुस्लिम सुभेदार दौलतखान लोधी ह्याच्याकडील भांडारगृहात मेव्हण्याच्या सांगण्यावरून नानकांना नोकरी लागली. परंतु त्यांचा पहिल्यापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. तिथेच त्यांची भेट मर्दाना नामक एका ज्येष्ठ मुस्लिम सिद्धपुरूषाशी झाली आणि त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले.

१४९६ साली त्यांना साक्षात्कार झाला. ‘देव हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही तो निराकार आहे,’ ही शिकवण सांगण्यासाठी त्यांनी घराचा त्याग केला. गुरू मर्दाना ह्यांच्यासोबत ते गावोगाव आपला संदेश देण्यासाठी फिरू लागले. हिंदू धर्मातील जातीभेद, निरर्थक कर्मकांडे आणि मूर्तीपूजेवर त्यांनी हल्ला चढवला. ह्या दौ-यांत त्यांना ज्या काही चीजवस्तू मिळत त्या ते गोरगरिबांत वाटून टाकत असत. त्याहून जास्त मिळाले तर लंगर उभारून त्यात गोरगरिबांच्या जेवणाची सोय केली जाई. आजही सर्व गुरूद्वारात लंगरची पद्धत पाळली जाते. त्यांच्या हयातीतच त्यांना गुरू हे पद मिळाले. त्यांनी आपला शिष्य लहन ह्यास अंगद असे नाव देऊन आपला उत्तराधिकारी बनवले.२२ सप्टेंबर, १५४३ रोजी त्यांचा पंचतत्वात विलीन झाला असला तरी त्यांच्या शिकवणीच्या माध्यमातून ते आजतागायत जिवंतच आहेत. शिख पंथाच्या दहा गुरूंपैकी ते पहिले गुरू होते. गुरूग्रंथसाहेब ह्या शिखांच्या धार्मिक ग्रंथात त्यांनी केलेल्या रचना आहेत. असे होते शिखांचे संस्थापक गुरूनानक.

Set 3: गुरू नानक निबंध मराठी – Guru Nanak Nibandh Marathi

आपल्या देशात अनेक थोर साधू संत, सिद्ध पुरुष होऊन गेले. अनेक धर्मगुरूंनी वेळोवेळी देशातील जनतेला मार्गदर्शन केले व आध्यात्माचा मार्ग दाखविला. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक त्यापैकीच एक आहेत.

नानकदेव यांचा जन्म इ. स. १४६९ मध्ये ‘तलवंडी’ नामक गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव काळू आणि आईचे नाव तृप्तादेवी होते. त्यांचे जन्म स्थान आज’ननकाना’ नावाने प्रसिद्ध असून ते पाकिस्तानच्या शेखपूर जिल्ह्यात आहे. त्यांचे वडील पटवारी होते आणि आई सात्त्विक विचारांची बाई होती. नानक देव लहानपणापासूनच ईश्वर भक्तीत लीन राहत. मोठे झाल्यावर वडिलांनी त्यांना व्यापारात गुंतवायचे ठरविले आणि पैसे देऊन सामान आणण्यास पाठविले. नानकाने त्या पैशात साधू संतांना जेवण घातले व रिकाम्या हाताने परतले. वडील खूप रागावले. त्यानंतर वडिलांनी नवाब दौलत खाँकडे नोकरीला लावले. तेथेही त्यांनी पूर्वीप्रमाणेच केले. एक दिवस पीठ मोजताना गिहाईकाला सगळेच पीठ देऊन टाकले. परिणामी नोकरी गेली.

संसारात तरी ते रमतील असे वाटल्याने वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह मूलराम पटवारीची मुलगी सुलक्षणादेवीशी हिच्याशी केला. त्यांना दोन मुले झाली. लक्ष्मीदास आणि श्रीचंद. परंतु गौतम बुद्धाप्रमाणे विरक्ती प्राप्त झाल्यामुळे ते घर सोडून निघून गेले. नंतर त्यांनी देश-विदेशांत प्रवास केला. धर्म प्रचार केला. ते ईश्वराच्या निराकार रूपाचे उपासक होते. साधे जीवन आणि मेहनतीची कमाई यावर त्यांचा विश्वास होता. ते बगदादला गेले. तेथील खलिफाने त्यांचा मोठा सन्मान केला. अनेक वर्षे धर्मप्रचार केल्यावर ते भारतात परतले. येथे गुरुदासपूर जिल्हयातील करतारपूरनामक गावात स्थायिक झाले.

गुरु नानकांनी जगाला बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचा विश्वास होता की परम पिता एकच आहे आणि आपण सारे त्यांची लेकरे आहोत. जातिपातीवर त्यांचा विश्वास नव्हता. ते परिश्रम, नि:स्वार्थी प्रेम आणि बंधुभावावर भर देत. कबीर वगैरे संतांप्रमाणे त्यांनी पण काम, क्रोध इत्यादीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. ईर्षा आणि द्वेष भावना त्यागण्यावर भर दिला. ते आध्यात्मिक पुरुष असल्यामुळे त्यांना आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना मिळाली होती. त्यांनी त्यांचा मित्र लहन यास अंगददेव हे नाव देऊन आपला उत्तराधिकारी घोषित केले. २२ सप्टेंबर १५४३ ला ते पंचमहाभुतांत विलीन झाले. शिख पंथाचे ते आद्य गुरू होत. ‘गुरुग्रंथ साहेब’ या धर्मग्रंथात त्यांच्या रचना आहेत. गुरुवाणीच्या रूपात शिख धर्मीय त्याचे पाठ करतात. त्यांची पदे, लोक श्रद्धेने गातात.

Set 4: गुरू नानक निबंध मराठी – Guru Nanak Nibandh Marathi

महान संत नानकदेवने शिख धर्माची स्थापना केली. त्यांनी जगातून अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचे मोठे काम केले. आयुष्यभर ते आपल्या या पुण्यकार्याला करीत राहिले. ते मूर्तीपूजा, अंधश्रद्धा, आणि जातीयवादाच्या विरोधात होते. ते सांगत परमात्मा एक आहे आणि सर्व स्त्री-पुरूष त्याची लेकरं आहेत.

गुरू नानकदेव यांचा जन्म १४६९ मध्ये पंजाबच्या तलवंडी या गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानच्या पंजाबात आहे. आता हे ठिकाण पवित्र ‘ननकाना साहब’ या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलाचे नाव कालुचंद तसेच आईचे नाव तृप्तादेवी होते. हे दोघे फारच धार्मीक स्वभावाचे होते.

नानक बालपणापासूनच एकांतप्रिय आणि ईश्वर-प्रेमी होते. साधु-संताची संगत त्यांना आवडे. त्यांच्या जीवनात अनेक अद्भूत आणि असामान्य घटना घडल्या. या चमत्काराने सिद्ध केले की नानक एक महात्मा आहे. लवकरच नानकांच्या उपदेशाने आणि ज्ञानाने समाज प्रभावीत होवू लागला. लोक त्यांना ‘देव’ व गुरू म्हणू लागले. त्यांचे विचार सूर्यप्रकाशाप्रमाणे सर्वत्र पसरले. गुरू नानकदेवने साधे जीवन, ईश्वरभक्ती, नाम-स्मरण, पवित्रता तसेच विनम्रतेवर जोर दिला. ते मूर्तीपूजेच्या विरोधात होते. गुरू ग्रंथ साहबमध्ये त्यांचे शब्द, गीत, उपदेश आदी मिळतात. हा ग्रंथ शिख धार्मियांचा पवित्र ग्रंथ आहे. त्यात ईतर संताची वाणि आणि भजन देखील आहे.

गुरू नानक निबंध मराठी – Guru Nanak Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply