Set 1: इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी – Iccha Tithe Marg Essay in Marathi
माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे तो विचार करू शकतो, मनात इच्छा धरू शकतो आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गही शोधू शकतो. जर एखादी गोष्ट आपल्याला तीव्रतेने हवी असेल तर त्यासाठी माणूस प्रसंगी आकाशपाताळ एक करायला मागे पाहात नाही असे कित्येक दाखले आपण दाखवून देऊ शकतो.
संस्कृत भाषेत एक श्लोक आहे,’ उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः’ ह्याचा अर्थ असा की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपोआप येऊन पडत नाही. त्याला जर भुकेची इच्छा झाली तर ती भागवण्याचा शिकारीचा मार्ग त्याला शोधून काढावाच लागतो. जीवनांचे कुठलेही क्षेत्र असले तरी त्यात कठोर परिश्रमाला पर्याय नसतोच. म्हणूनच संगीत असो, साहित्य, समाजसेवा किंवा राजकारण ह्यातील काहीही असो, ज्या व्यक्तीला इच्छाशक्ती आहे तीच व्यक्ती त्यातून मार्ग काढू शकते, जिला ध्यास लागला आहे तीच व्यक्ती नवा इतिहास घडवू शकते.
इच्छा म्हणजे नुसतीच साधीसुधी किरकोळ इच्छा नव्हे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. काहीतरी मोठे कार्य करण्याची इच्छा असेल आणि त्या जोडीला जिद्द, ध्यास आणि परिश्रम करण्याची वृत्ती ह्या गोष्टीही असतील तर यशाचा मार्ग शोधून काढणे अवघड नसते. जगातील सर्व थोर व्यक्तींनी असेच तर केले आहे आणि आपापले मार्ग शोधून काढले आहेत. एकदा दृढनिश्चय केल्यावर आणि ध्यास घेतल्यावर त्यांनी आपला वेळ व्यर्थ गोष्टींसाठी वाया घालवला नाही आणि आपली शक्ती विनाकारण वाया घालवली नाही. वाटेत येणा-या कित्येक मोहांना त्यांनी नाही म्हटले कारण ध्येय गाठण्याचा त्यांचा रस्ताच एवढा सुंदर होता की त्यांना दुसरा कसला मोह पडणे अशक्यच होते.
म्हणूनच भीमसेन जोशी वयाच्या नवव्या वर्षीच संगीत शिकण्यासाठी घर सोडून पळाले. अब्राहम लिंकन बरेचदा निवडणुक हरले परंतु त्यांनी आपला लोकसेवेचा वसा सोडला नाही कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच त्यांना सत्ता राबवता आली असती आणि चांगले कार्य करता आले असते. सरते शेवटी ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेच आणि त्यांनी कृष्णवर्णीयांवर गुलामगिरी लादण्याचा अन्यायकारक कायदा रद्दबातल केला.
एकलव्यालाही गुरू द्रोणाचार्यांकडून शिकायचे होते. त्यांनी शिकवायला नकार दिला परंतु एकलव्य हिंमत हरला नाही. त्याने गुरू द्रोणांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. इच्छा असली की मार्ग दिसतोच, तो हा असा.
Set 2: इच्छा तिथे मार्ग निबंध मराठी – Iccha Tithe Marg Essay in Marathi
इच्छेचे दुसरे नाव दृढ़ इच्छाशक्ती असे आहे. कोणतीही गोष्ट निश्चित करून त्यासाठी परिश्रम केल्याशिवाय काहीही शक्य होत नाही हेच यश, सुख आणि श्रेयाचे राज्य आहे. जर तुम्ही मन लावून काही मिळवू इच्छिता तेव्हा तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. दृढता, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमासमोर पर्वतही नतमस्तक होतात नद्या आपल्या मार्ग बदलतात. जनता आपली अनुयायी बनते आणि यश तुमच्या
पायाशी येते. केवळ दृढ़ प्रतिज्ञा करणारे साहस करू शकतात. यश प्राप्त करतात आणि इतिहासात अमर होतात. उपाय आणि मार्ग आपोआप समोर येतात. जर तुमचे उद्दिष्ट स्पष्ट आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याची इच्छा, साहस आणि निचय असेल तर, शरीर आपल्या आत्म्याचे वाहन आहे. जेव्हा आत्मा काही मिळविण्यासाठी काही करून दाखविण्यासाठी कृतसंकल्प करतो तेव्हा शरीराची मागे राहण्याची हिंमत होत नाही. जर धनी निश्चयाचा पक्का असेल तर सेवकाची त्यांच्या आज्ञा पाळण्याची, त्याला सहकार्य न करण्याची हिंमत करू शकत नाही.
नदीचेच उदा. घ्या नदीला सागरापर्यंत जाऊन त्यात समाविष्ट व्हायचे आहे हा तिचा दृढनिश्चय आहे आणि शेवटी ती समुद्रापर्यंत जाऊन पोहोचतेच. कितीही पर्वत, प्रचंड शिलाखंड, भूखंड आले किंवा आणखी काही अडथळा आला तरी ती सर्वांना नष्ट करून त्यांना आपल्याबरोबर वाहून घेऊन जाते. ती या अडथळ्यांचे नामोनिशाण राहू देत नाही. आपल्या दृढ़ इच्छाशक्तीच्या प्रलयंकारी पुरासमोर पर्वत, गवताच्या काडीप्रमाणे क्षुल्लक बनतात आणि तिला मार्ग देण्यास तयार होतात. यासाठी केळ लागतो पण यश निश्चित असते. संकल्प आणि दृढ़ इच्छाशक्ती मार्गात येणाऱ्या अडचणींवर विजय मिळवितात. पाहता पाहता अडथळ्यांना दूर ढकलून देतात. आपला मार्ग इच्छा स्वयंम् बनविते आणि शेवटी सफल होते.
आत्मक्विास, यश, लोकप्रियता, प्रसिद्धी इत्यादी इच्छाशक्तीचीच दुसरी नावे आहेत सर्व थोर प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती दृढ़ इच्छाशक्ती, संकल्प आणि महत्त्वाकांक्षेचे स्वामी होते. एकदा दृढनिश्चय केल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आपला वेळ व्यर्थ कामांमध्ये नष्ट केला नाही व आपल्या शक्तीचा अपव्यय होऊ दिला नाही. त्यांचे तन, मन, बुद्धी आणि आत्मा एकाच उद्दिष्टाकडे एकाग्र झाले होते. त्यांच्या शब्दकोशात असंभव हा शब्दच नव्हता. ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही ते लाचार, अपंग, नपुंसक, दैववादी आणि आळशी होत. त्यांच्याकडून कधीही चांगल्या आदर्श आणि यशस्वी कार्याची अपेक्षा करता येत नाही. खरे म्हणजे ते पृथ्वीवर भार आहेत पृथ्वीला कलंक आहेत. याउलट दृढनिश्चयी लोक साहसी, वीर, आशावादी, चरित्र्यसंपत्र, कर्मठ, गतिशील आणि थोर असतात. ते इतिहास घडवितात व आपल्याबरोबर दुसन्यांचे भाग्य आणि नियती निश्चित करतात.
त्यांना पूर्ण विश्वास असतो की प्रत्येक समस्येचे उत्तर, प्रत्येक रोगावर उपचार आणि प्रत्येक कुलुपाला चावी असतेच कठोर परिश्रम व इच्छाशक्तीमुळे शेवटी ते इच्छित उत्तर, उपचार आणि चावी मिळवितात. योग्यच मटले आहे-“जिन खोजे तिन पाइयां, गहरे पानी पैंठ। गहरे पानी में गोता लगाकर वे मोती इंड लाते है, जबकि अन्य किनारे पर सीप-शंख से ही संतुष्ट हो जाते हैं।”
कर्मठ आणि दृढ़निश्चयो मनुष्य संकटाशी संघर्ष करणे पसंत कस्तो प्रत्येक अडथळ्याला आव्हान समजून त्यावर विजय मिळविणे आपले परमध्येय आणि कर्तव्य मानतो. ते संघर्ष करतात, झगडतात अडथळ्यांच्या पर्वताला दृढइच्छेच्या जोरदार आघातांनी चुरचूर करून आपला मार्ग तयार करून घेतात. परिस्थितीचे ते दास नसून स्वामी असतात. वेळ आणि परिस्थितीला स्वतः साठी अनुकूल बनविण्यासाठी कुशल असतात. तुमच्याजवळ साधन, वेळ, यंत्र, सुसंधी सगळे काही असू शकते पण जर इच्छाशक्ती व दृढनिश्चय नसेल तर तुम्ही काहीही मिळवू शकत नाही.
कोणतेही कार्य, धंदा वा पेशा हीन नाही. उदा. चांभाराचे काम जोडे तयार करणे हे असते. हे काम शिकविणे, राज्य करणे पूजा करण्याइतकेच पवित्र आणि महत्त्वाचे आहे परंतु खराब जोडे शेवटी खराबच. तुमच्या कामात पूर्णत्व पाहिजे. त्यात आवड, दक्षता आणि इच्छाशक्ती असली पाहिजे. म. गांधी, अब्राहम लिंकन, सरदार पटेल, इंदिरा गांधी, नेपोलियन बोनापार्ट, रवींद्रनाथ टागोर, मदर टेरेसा ही अशा व्यक्तींची उदाहरणे आहेत. ज्यांनी आपल्या दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या बळावर श्रेष्ठत्वाचे आणि महानतेचे शिखर सर केले. गांधीजी शरीराने दुर्बल होते परंतु त्यांच्यात अदम्य नैतिक साहस आत्मबल इच्छाशक्ती आणि सहनशीलता होती. या थोर मानवी गुणांच्या बळावरच त्यांनी इंग्रजासारख्या शक्तिशाली शासकांशी, अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले. महाभारतातील अर्जुनाचे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे.
महाभारताच्या आरंभी अर्जुनामध्ये इच्छाशक्ती, संकल्प आणि दृढनिश्चयाची कमी होती म्हणून तो निराश, हताश, भित्रा आणि निष्क्रिय झाला. त्याला काही सुचेना. तो आपल्या क्षत्रिय कर्तव्यापासून विन्मुख झाला आणि त्याने युद्ध करण्यास नकार दिला. गांडीव धनुष्य त्याच्या हातातून खाली पडले. त्याला घाम सुटला. तो हिरमुसला झाला परंतु कृष्ण त्याचा मित्र आणि सारथी होता त्याने अर्जुनाला गीतेचा उपदेश करीत कर्मयोगाची शिकवण दिली. कृष्ण म्हणाला की जनकादी सर्व थोर लोकांनी कर्माद्वारे सिद्धी आणि ख्याती प्राप्त केली आहे. लोकसंग्रहाच्या दृष्टीनेही कर्म आवश्यक आहे.
कर्मणैव हि संसिद्धि-मास्थिता जनका दयः। लोकसंग्रह-मेवापि सं परयन कर्तु मर्हसि।
पुढे वाचा:
- इंग्रजी भाषेचे महत्त्व निबंध मराठी
- आराम हराम आहे निबंध मराठी
- आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी
- आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी
- आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी
- आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध