इंटरनेट निबंध मराठी-Internet Essay in Marathi
इंटरनेट निबंध मराठी-Internet Essay in Marathi

Set 1: इंटरनेट निबंध मराठी – Internet Essay in Marathi

आजचे युग हे संगणकाचे युग आहे. सुरुवातीला संगणक हा कचेरीपुरता मर्यादित होता. पण पुढे संगणक हा घराघरांत जाऊन पोहोचला. आता तो घरातील अविभाज्य भाग झाला आहे. याच संगणकाचे लेकरू म्हणजे इंटरनेट, इंटरनेट म्हणजे संगणकांचे जाळे. हजारो, लाखो संगणक एकमेकांना जोडलेले असतात.

मग सगळे जग जवळ येते. अगदी माझ्या घरातून मी अमेरिकेतील काकांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकते आणि त्याही अगदी अति-अल्प खर्चात!

इंटरनेट म्हणजे ज्ञानाचा खजिना. कोणत्याही विषयाची माहिती आपल्याला इंटरनेटच्या साहाय्याने मिळते. पूर्वी हीच माहिती मिळवायला आपल्याला अनेक पुस्तके वाचावी लागली असती.

इंटरनेटच्या माध्यमाने जगात चालणाऱ्या सर्व घटनांची आपल्याला सविस्तर व चटकन माहिती मिळते. वेगवेगळ्या देशांतील विचारवंत आपापल्या देशांतून इतर देशांतील नेत्यांशी, विचारवंतांबरोबर चर्चा करू शकतात आणि आपण ती पाहू व ऐकू शकतो.

Set 2: इंटरनेट निबंध मराठी – Internet Essay in Marathi

साधारणपणे १९९५ सालच्या सुमारास भारतात विदेश संचार निगम ह्या सरकारी कंपनीने भारतातील सहा शहरांत इंटरनेटची सेवा सुरू केली. त्यानंतर आत्तापर्यंत इंटरनेटचे जाळे एवढे पसरले आहे आणि सर्वांचेच इंटरनेटशिवाय पानही हलेनासे झाले आहे की काही विचारूच नका. इंटरनेट येण्यापूर्वी आपण काय करीत होतो तेच आता कुणाला कळेनासे झाले आहे.

तसे पाहिले तर माणूस निसर्गातील इतर सजीवांपेक्षा शारीरिकदृष्ट्या कमजोरच होता परंतु त्याला निसर्गाने तल्लख मेंदूची देणगी दिली त्यामुळे तो त्या बुद्धीचा वापर करून निसर्गातील अनेक रहस्यांचे गुपित उलगडू लागला. ते करता करता आपल्या जीवनाची खडतरता कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश होताच. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या साथीने त्याने ते साध्य केले. संगणकाचा शोधही वेगाने माहितीवर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने लागला. त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे हे सर्व संगणक एकमेकांना इंटरनेटच्या महाजालाने जोडणे हीच होती. संगणकांद्वारे जगाच्या कोन्याकोप-यात अगदी एका क्षणात माहिती पोचवणे शक्य झाले आहे ते ह्या इंटरनेटमुळेच.

इंटरनेटमुळे एखाद्या संगणकातील माहिती नष्ट झाली तरी ती दुस-या संगणकात आधीच पाठवून ठेवली असल्यास पुन्हा मिळवणे शक्य झाले. सुरूवातीला अमेरिकन लष्करामध्ये इंटरनेटचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू ह्याचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये एवढ्या झपाट्याने झाला की आज आपण त्याच्याशिवायच्या जगाचा विचारही करू शकत नाही. इंटरनेटमुळे व्यवसाय अथवा व्यापार करणे सुलभ झाले आहे. विद्यार्थ्यांना तर इंटरनेट हे एक वरदानच वाटू लागले आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून आपण घरबसल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊ शकतो. अतिशय कमी खर्चात आपले उत्पादन लोकांपर्यंत पोचते. व्हिडिओ कॉन्फरन्सिग किंवा स्काईप ह्या माध्यमातून जगभरातील डॉक्टर्स आणि अन्य विद्वान एखाद्या विषयावरील मतांचे एकमेकांशी आदानप्रदान करू शकतात. अगदी न्यायालयांनाही साक्ष घेण्यासाठी दूरच्या व्यक्तीशी ह्या माध्यमातून संपर्क साधता येतो. आजकाल जगभरात कामाच्या संधी उपलब्ध झालेल्या असल्यामुळे वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जातात. तेव्हा ते आपल्या घरच्यांशी संपर्क ठेवताना इंटरनेटचाच उपयोग करतात. आपण आपल्या फाईल्स, डेटा क्षणार्धात् दुसरीकडे पाठवू शकतो.

चित्रपट, खाद्यपदार्थ, ताज्या बातम्या, विनोद, वधुवरांची स्थळे अशी अनेक माहिती इंटरनेटवरून मिळू शकते. एखाद्या ठिकाणी सहलीस जायचे झाल्यास तिकिटे तसेच हॉटलांचे बुकिंग सरळसरळ इंटरनेटवरूनच काढले जाते.

संशोधन आणि उच्च शिक्षणासाठीही इंटरनेटचा वापर होतो. जगभरातील कुठल्याही विद्यापीठातून आणि ग्रंथालयातून विद्यार्थी माहिती गोळा करू शकतात. स्काईप, फेसबुक, ब्लॉग्ज ही सर्व आज सामाजिक माध्यमे बनली आहेत. ती व्हर्चुअल किंवा आभासी माध्यमे असली तरी माणसे त्यामुळे एकमेकांशी जोडली जात आहेत हे मात्र नक्की. आपल्या आवडत्या विषयांवर मत नोंदवणे, समान आवडीनिवडी असलेले मित्रमैत्रिणींचे गट निर्माण करणे, संवेदनशील विषयांवर लोकजागृती करणे, जुने मित्र शोधून काढणे, नव्या ओळखी करणे असे अनेक उपक्रम हाती घेणे शक्य झाले आहे.

परंतु आज काल इंटरनेटवरून फसवणुकीचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे ऑन लाईन बँकिंग करताना सावध राहावे. लबाड फोनकॉल्सपासूनही सावध राहावे. फेसबुकवर नव्या लोकाशी बोलतानाही सावधगिरी बाळगावी. तरूण मुलामुलींनी तर शक्यतो नव्या ओळखी करून घेताना अधिक जास्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

धोके असले तरी इंटरनेट कामाचा आहे हे मात्र अगदी नक्कीच..

इंटरनेट निबंध मराठी – Internet Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply