खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥ मराठी निबंध – Khara To Ekachi Dharma Essay in Marathi

जगामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध असे कितीतरी धर्म आहेत. वेगवेगळ्या धर्मांमध्ये मतमतांतरे आहेत, तेढ आहेत; पण सर्वांनीच एकमेकांशी सद्भावनेने, प्रेमाने वागले तर मानवी जीवन सुखी होईल. जगावर प्रेम करणे हाच खरा धर्म सर्वांनी मानला पाहिजे.

केवळ देवांची पूजा करत बसण्यापेक्षा समाजातील हीन, दीन, दलितांच्या उद्धारासाठी पुढे आले पाहिजे. त्यांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांच्यावर खूप प्रेम केले पाहिजे. समाजात असे कितीतरी निराधार लोक आहेत. त्यांच्यासाठी आपण आधारवड बनले पाहिजे. संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे. दु:खितांचे दु:ख कमी करण्यासाठी त्यांना हसवले पाहिजे. काही लोक दुसऱ्यांना त्रास देण्यात, हीनवण्यात व तुच्छ लेखण्यात स्वत:ला धन्य मानतात. पण खरा हीन तो असतो, जो दुसऱ्यास हीन समजतो.

आपण सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहोत. इतरांना तुच्छ न लेखता त्यांच्यावर भरभरून प्रेम केले पाहिजे. ‘जे जे आपणाशी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे । सकळ जन ।। समर्थ रामदासांनी दिलेला बोध सर्वांनी आचरणात आणल्यास पृथ्वीवर कोणीही अडाणी, अज्ञानी राहणार नाही. कोणीही गरीब राहणार नाही. म्हणूनच कोणताही भेदभाव न मानता सर्वांवर प्रेम करायला शिकले पाहिजे आणि हाच खरा धर्म मानला पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply