सर्वांगासन मराठी माहिती – Sarvangasana Information in Marathi

सर्वांगासन म्हणजे काय?

‘‘सर्वांग’’ म्हणजे ‘‘शरीराचे सर्व अवयव.’’ या आसनामुळे शरीराच्या संपूर्ण अवयवांना व्यायाम होतो म्हणून या आसनास सर्वांगासन म्हणतात.

सर्वांगासन मराठी माहिती, Sarvangasana Information in Marathi
सर्वांगासन मराठी माहिती, Sarvangasana Information in Marathi

सर्वांगासन करण्याची पद्धत

  1. जमिनीवर पाठ टेकवून चटईवर पडा.
  2. हात आणि पाय सरळ ठेवा.
  3. दीर्घ श्वास घ्या.
  4. हाताचे पंजे जमिनीवर दाबून ठेवा.
  5. हात आणि पाय ताणून पाय उत्तानपादासनाप्रमाणे जमिनीपासून वर उचलून तसेच धरा.
  6. पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने ठेवा.
  7. श्वास सोडा आणि पाय डोक्याकडे असे आणा की, पुठ्ठे आणि कमरेचा भाग थोडा वर उचललेला असेल.
  8. दोन्ही हातांनी पाठीला आधार द्या.
  9. कोपर जमिनीवर टेकवा.
  10. बाहू शरीराजवळ असू द्या.
  11. डोके, मान, खांदे आणि पाठ जमिनीवर टेकवा.
  12. शरीर, पुठ्ठे आणि पाय ताणून धरा.
  13. पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने ठेवा.
  14. हनुवटी छातीवर टेकवा.
  15. या आसनाची ही अंतिम अवस्था.
  16. श्वासोच्छवास सामान्य ठेवून त्याच स्थितीत आरामात थांबा.
  17. पूर्वस्थितीत येतेवेळी तंगड्या किंचित पुढे वाकवा.
  18. हात सोडून जमिनीवर येऊ द्या.
  19. पाठ, कंबर आणि शेवटी तंगड्या जमिनीवर आणा.
  20. शवासन करून विश्रांती घ्या.

सर्वांगासनची वैशिष्ट्य

सर्वांगासन हे एक महत्त्वाचे आसन आहे. कोणत्याही वयातील स्त्री-पुरुषाने या आसनाचा सराव करावा. गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये. वेळ हळूहळू वाढवून हे आसन दहा मिनिटे करता येईल. शेवटच्या अवस्थेत श्वासोच्छवास सामान्य ठेवा.

सर्वांगासनचे फायदे मराठी

  1. सर्वांगासनाच्या सरावाने मेंदू, फुफ्फुस आणि हृदय सशक्त होण्यास मदत होऊ शकते.
  2. रक्त शुद्ध होण्यास हे आसन उपयुक्त आहे.
  3. डोळे, कान आणि मानेतील वेदना कमी होऊ शकतात.
  4. या आसनामुळे भूक चांगली लागते.
  5. पचनक्रिया वाढते आणि पोटातील अशुद्ध वायू शरीराबाहेर पडतो.

सर्वांगासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply